मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
श्रवणद्वादशीव्रत

द्वितीय परिच्छेद - श्रवणद्वादशीव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अत्रविधिर्मदनरत्नेविष्णुधर्मे तस्मिन्दिनेतथास्नानंयत्रक्कचनसंगमे तथा दध्योदनयुतंतस्यांजलपूर्णं घटंद्विजे वस्रसंवेष्टितंदत्वाछत्रोपानहमेवच नदुर्गतिमवाप्नोतिगतिमग्र्यांचविंदति मंत्रस्तुभविष्ये घटेजनार्दनपूजामभिधाय नमोनमस्तेगोविंदबुधश्रवणसंज्ञक अघौघसंक्षयंकृत्वासर्वसौख्यप्रदोभव प्रीयतांदेवदेवेशोममसंशयनाशनः ।

ह्या श्रवणद्वादशीव्रताचा विधि सांगतो - मदनरत्नांत विष्णुधर्मांत - “ त्या दिवशीं कोठें तरी नद्यादिकांच्या संगमीं स्नान करावें ” तसेंच - “ त्या द्वादशीचे दिवशीं दधिमिश्रित ओदनानें युक्त व जलपूर्ण असा घट वस्त्रानें वेष्टित करुन ब्राह्मणाला द्यावा. आणि छत्र, उपानह ( जोडा ) ब्राह्मणाला द्यावा, असें केल्यानें दुर्गति होत नाहीं व उत्तम गति प्राप्त होते. ” मंत्र सांगतो भविष्यांत - घटावर जनार्दनाची पूजा करुन त्याचें दान करावें. - दानाचा मंत्र - नमो नमस्ते गोविंद बुधश्रवणसंज्ञक ॥ अघौघसंक्षयं कृत्वा सर्वसौख्यप्रदो भव ॥ प्रीयतां देवदेवेशो मम संशयनाशनः ॥

वामनावतारनिमित्तोपवासस्तुव्रतहेमाद्रौभविष्ये द्वादश्यास्तेविधिः प्रोक्तः श्रवणेनयुधिष्ठिर सर्वपापप्रशमनः सर्वसौख्यप्रदायकः एकादशीयदासास्याच्छ्रवणेनसमन्विता विजयासातिथिः प्रोक्ताभक्तानांविजयप्रदेत्युपक्रम्य अथकालेबहुतिथेगतेसागुर्विणीभवेत् सुषुवेनवमेमासिपुत्रंसावामनंहरिमित्युक्त्वा एतत्सर्वंसमभवदेकादश्यांयुधिष्ठिर तेनेष्टादेवदेवस्यसर्वथाविजयातिथिः एषाव्युष्टिः समाख्याताएकादश्यांमयातव पूर्वमेवसमाख्याताद्वादशीश्रवणान्वितेत्युपसंहारादेकादश्यामेव व्युष्टिः फलं भागवतेऽष्टमस्कंधेतुद्वादश्यांवामनोत्पत्तिरुक्ता श्रोणायांश्रवणद्वादश्यांमुहूर्तेभिजितिप्रभुः ग्रहनक्षत्रताराद्याश्चक्रुस्तज्जन्मदक्षिणम्‍ द्वादश्यांसवितातिष्ठन्मध्यंदिनगतोनृप विजयानामसाप्रोक्तायस्यांजन्मविदुर्हरेः श्रोणायांचंद्रेऽभिजिच्छ्रवणप्रथमोंशः गौडाअप्येवम् अत्रकल्पभेदाव्द्यवस्था ।

वामनावतारनिमित्तक उपवास सांगतो - व्रतहेमाद्रींत भविष्यांत - “ हे युधिष्ठिरा ! श्रवणयुक्त द्वादशीचा विधि तुला सांगितला, तो सर्व पापांची शांति करणारा व सर्व सौख्य देणारा होय. एकादशी जर श्रवणानें युक्त असेल तर ती तिथि विजयासंज्ञक होय. ती भक्तांस विजय देणारी होते. ” असा उपक्रम करुन - “ यानंतर बहुत काल गेल्यावर ती ( अदिति ) गर्भिणी झाली आणि नवममासीं साक्षात्‍ विष्णुरुप वामननांवाच्या पुत्रास प्रसवली ” असें सांगून “ हे धर्मा ! हा सर्व प्रकार एकादशीस झाला. तेणेंकरुन भगवंतास ती विजया एकादशी सर्वथा इष्ट होय. हें फल एकादशीस आहे असें मी तुला सांगितलें. श्रवणयुक्त द्वादशी पूर्वींच सांगितली ” अशा उपसंहारा          ( एकादशीविषयीं पर्यवसाना ) वरुन एकादशीसच वामनावतार आहे. भागवतांत अष्टमस्कंधांत तर द्वादशीचे ठायीं वामनोत्पत्ति सांगितली आहे. ‘‘ श्रवणयुक्त द्वादशीस श्रवणनक्षत्रीं चंद्र असतां श्रवणाच्या प्रथमांशीं अभिजिन्मुहूर्तावर भगवान्‍ होता झाला. ग्रह, नक्षत्र, तारा इत्यादिक त्याचे जन्माला अनुकूल झाले. हे राजा ! ज्या द्वादशीस सूर्य दिनमध्यभागीं असतां हरीचा जन्म झाला ती विजयानामक तिथि होय. ” गौडही असेंच सांगतात. पूर्वी एकादशीस वामनावतार सांगितला, येथें द्वादशीस सांगितला, याविषयीं कल्पभेदानें व्यवस्था जाणावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP