ते चंड मुंड तेथुनि गेले घेऊनि कटक चतुरंग ॥
ज्यांचे रजें मळविती दिगिमकटहि न स्वःभट कच तुरंग ॥१॥
जें प्रिय वाहुनि चरणीं फल जळ दळ एक सुमाहि मागा तें ॥
ऐसें जी माय ह्मणे जीचा कवि वृंद सु- महिमा गातें ॥२॥
तीतें तुहिन नर्गांच्या कांचन शृंगीं सलील वसलींतें ॥
ते खळ देखति सिंही कांहिंसे शृंगीं सलील वसलीतें ॥
पाहुन सिद्धी धरया झाले दुर्गेसि बहुत पामर ते ॥
न च शक्तें जरि शतदा नियमें साधुनि बहु तपा मरते ॥४॥
कोपे त्यांवरि देवी तें जेंशरदिंदुकान्तिचें सदन ॥
झालें कज्जलवर्ण क्रोधें तत्काल तें तिचें वदन ॥५॥
झालें ललाट तीचें सहसा क्रोधें करुन जें कुटिलें ॥
तेथुनि काळी प्रकटे वाटे काळादिकांसि ती कुटिलें ।\६॥
ती खंग पाश हस्ता अत्युग्रा त्या सुराऽरि कटकांत ॥
शिरली सशांत जैशी व्याघ्री स्येनाहि जोविं चटकतं ॥७॥
वीरांसाह कवळ जसा हय रथहि तसाचि ती करी सगळा ॥
जीचा न चाविला जो त्यासि मुखें वाटे करीत गळा ॥८॥
तीच्या दशनांसि कठिण परशस्त्रांचे न रासि पापडसे ॥
तद्धेहा अस्त्र जेअसें न ब्रह्माज्ञा नरासि पाप डसे ॥९॥
सर्वत्र पाविजेला क्षणमात्रें नाश चंड सेनांहीं ॥
करिती परांसि चरणहि काळीचे काळ दंडसे नाहीं ॥१०॥
जे प्रबळां असुरांतें कालीचे चुर्ण करिति दंत कसे ॥
ते न ह्माणावे चंडे मुंडें अत्युग्र मूर्त अंतकसे ॥११॥
ज्यातें अवलंबुनि ज्या निजशत्रु बळासि न हरि खपवी तें
ख्पवुनि काळिका त्या देईल न लाज न हैरिख पवीतें ॥१२॥
चंडाच्या शस्त्राचा न करि तिचें गरळ कटु निकरें काहीं ॥
मुंडायुधवृष्टिही नग भग्न न केलाचि झटुनि करकांही ॥१३॥
मुंडें सहस्त्रशः क्षय त्या कालीजा कारावया वक्त्रें ॥
शक्रें ज्यां जोडावें कर ऐशीं सोडिलीं महाचक्रें ॥१४॥
सुबहु दिवाकर बिंबे जैशीं मेघोदरीं तशी शिरलीं ॥
काली मुखांत चक्रें जेवि अपक्रुतें महाशनीं जिरलीं ॥१५॥
चक्रें गिळोनि काळी त्रिभुवन भय कारका महास्पातें ॥
पसरुनि करी धरुनियां सुर रिपु वध सारकाम हास्यातं ॥१६॥
जेणें हरिलीं होतीं अमर नरांची किरीट मुंडांसी ॥
काळी खवळुनि कवळुनि कटक भिडे सुरजयार्थ मुंडासी ॥१७॥
काळींने धरिला जों प्राशाया पर तमासि असिं तरणी ॥
प्रसवे धवळ यशा जरि आपण वर्णेंकरुनि असित रणीं ॥१८॥
धांवे वेगें परम क्षुधितां धृष्टांखुवारि जसी व्याली ॥
त्या पुंडां मुंडाचे मस्तक खंडी महाऽसिनें काली ॥१९॥
त्या चेंड मस्तकार्तें खंडी त्याच्या कंचांसि कवळुन ॥
खवळुनि रणीं मुखवी विश्वस यशे अशेष धवळुन ॥२०॥
त्याचें हत शेष बळ न टिकलें कालीपुढेंक भयें पळ तें ॥
सव पळालें जैसें तिमिर दिनकरप्रभोदये पळतें ॥२१॥
जें चंड मुंड मस्तक युग काली दे तिला उपायन तें ॥
केल पुरुषार्थचे सफळीचे ज्या सर्वही उपाय नतें ।\२२॥
काली ह्मणे महापशु दिधले म्यां चंड मुंड तुज आधीं ॥
शुंभ निशुंभ शिवे तुं वधुनि रण मखीं यश स्वयें साधीं ॥२३॥
देवी ह्मणे मजकडे तुं घेउनि चंड मुंड आलीस ॥
यास्तव तुज चामुंडा हे दिधलें ख्यात नाम आलिंस ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP