हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
अयन

अयन

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


अयन
भानोर्मकरसंक्रान्तेः षण्मासा उत्तरायणम् ।
तद्देवदिवसस्तत्र शुभं कार्यं प्रशस्यते ॥३१॥
कर्कादिराशिषटेऽर्के षण्मासा दक्षिणायनम् ।
देवरात्रिस्तदेवात्र प्रोक्तं कार्यें प्रसिद्धयति ॥३२॥

अयनें दोन आहेत. १ उत्तरायण व २ दक्षिणायन. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ह्या तीन ऋतूंत म्हणजे मकरसंक्रांतीच्या आरंभापासून तों कर्कसंक्रांतीच्या आरंभापर्यंत सूर्याची गति म्हणजे जाणें उत्तरेकडे असतें, म्हणून त्या कालास उत्तरायण किंवा उदगयन म्हणतात; आणि वर्षाऋतु, शरद्दतु व हेमंतऋतु ह्या तीन ऋतूंत म्हणजे कर्कसंक्रांतीच्या आरंभापासून तों मकरसंक्रांत लागेपर्यंत सूर्याचें जाणें दक्षिणेकडे असतें म्हणून त्या कालास दक्षिणायन म्हणतात. सामान्यतः उदगयनाला पौषांत व दक्षिणायनाला आषाढांत आरंभ होतो. ह्याप्रमाणें सहा महिने उत्तरायण व सहा महिने दक्षिणायन असतें. उत्तरायण हा देवांचा दिवस आणि दक्षिणायन ही देवांची रात्र कल्पिलेली आहे.

उत्तरायणांतील कृत्यें.
गृहप्रवेशस्त्रिदशप्रतिष्ठा विवाहचौलव्रतबन्धदीक्षाः ।
सौम्यायने कर्म शुभं विधेयं यद्गर्हितं तत्खलु दक्षिणे च ॥३३॥

उत्तरायण हें प्रायः सर्व कार्यास उक्त मानिलेलें आहे. नव्या घरांत जाणें, देवाची अर्चा म्हणजे प्रतिष्ठा करणें, विवाह, चौल, उपनयन, मंत्र-तंत्र शिकणें इत्यादि सर्व कृत्यें उत्तरायणांत करावीं. ह्याशिवाय अन्य कृत्यें दक्षिणायनांत करावीं. तथापि मार्गशीर्ष मासांत दक्षिणायन असूनही विवाह करणें उक्त आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP