श्रीरामदासस्वामींची आरती - ओंवाळू आरती सद्गुरु रामदा...


आरती श्रीरामदासस्वामींची.
Prayer to Swami Ramdas.

श्रीरामदासस्वामींची आरती
ओंवाळू आरती सद्गुरु रामदास राणा ।
पंचही प्राणांचा दीप लाविला जाणा ॥ ध्रु० ॥
अज्ञानतिमिरज्योति सद्गुरु उजळल्या वाती ।
ज्ञानबोध प्रकटला तेणें प्रकाशली दीप्ती ॥ १ ॥
निर्गुण निरंजन ज्योति सद्गुरु रामदास ।
दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस ॥ २ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000