भाग २ - लीळा २९१ ते ३००

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २९१ : नांदौरीं आदीतीं अवस्थान
मग गोसावी नांदौरा बीजें केलें : आदीत्यीं अवस्थान : दीस अठरा जालें : पीवळदरडी मांडौ घालवीला : तेथ वीहरणा बीजें केलें : ॥

लीळा २९२ : सामको पुत्रत्व : ॥ आरोगण
सामकोचा पुत्रू सरला होता : तो त्यांसि करजाळां स्वप्नीं आला : ते ह्मणति : ‘बाइ : मज जेउं सूवो कां’ : तीहीं ह्मणीतलें : ‘काइ जेउं सूंरे बा’ : ‘ना : दहीं भातु जेउं सू’ : मग ते साडेगावां आलीं : आबौसां पुढें सांघीतलें : आबैसीं ह्मणीतलें : ‘गोसावीयांसि आरोगणा दे : इतुलेनि गोसावीयांजवळि नांदौरा आलीं : उपाहारू आणिला : गोसावी वीहरणौनि बी केलें : भेटि जालि : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : मग आरोगणे लागि विनवीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तरि तुमचेया पूत्रा होआवें’ : तीहीं ह्मंणीतलें : ‘हें काइ जी : असें कैसें’ : ‘कां पां : तुमचेन पूत्रें तुमतें स्वप्नीं जेउं मागीतलें : तुह्मीं यांसि जेउं सूत असा : तरि हें तुमचें पुत्र होइल कीं’ : मग गोसावीयांसि ताट केलें : दधिभातु उन्हें तापला आला : तो वोळगवीतिचि ना : आरोगण करीतां गोसावी पूसीलें : ‘जी जी : दधिभातु उन्हें तापला : तो कीं नासीला जी’ : सर्वज्ञें ह्मणीतले : ‘बाइ : आणा’ : तेहीं वाढीला : गोसावी प्रसादु केला : (शोधु) नांदौरीं सामको : उमाइ : पटिसाळे चरणक्षाळण : वीहरणौनि उपाहारू : ॥

लीळा २९३ : काळदासभटां मधमोदवाट
काळदासभट पिवळदरडी निवांत बैसले असति : तेथ गोसावी बीजें केलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ भटो कवणी ठाइं असा’ : ‘जी जी : सूखमनेचां मुखीं असों : सूखमुनेचा पोटीं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘सूखमना मुखींचीं कार्ये : त्यें काइ ऐसीं : त्यें ऐसीं होआवीं कीं’ : तीहीं म्हणीतलें : ‘जी जी : त्यें कांहीं देखों ना’ : ‘तरि कैसे असा सूखमनेचां मुखी’ : ‘ना जी : नसति’ : ‘तरि कैसे सूखमनें मुखीं असे’ : तैसेचि स्तीति भंगली : उठीले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले ॥

लीळा २९४ : तथा पैशून्य
काळदासभटांचि लेंकि हातरीती नी ते धाकूटी : ते पासि आले : ते बाइसासि कांहीं ह्मणीयें व्यापारू करूं लागति : बाइसें तेयांसि कांहीं ह्मणियें देति : मग बाइसें ह्मणति : ‘बटीकी : बाबा निके : बाबापासि असावें : बाबाची सेवा करावी : बाबापासौनि कांही गोमटें होइल’ : ऐसें बाइसीं ह्मणीतलें : मग तेंही काळदासभटा पुढां सांघीतलें : तेंहीं ह्मणीतलें : ‘कां राहावीति ना : देखीलिसि तरूणि धारी : तरि राहाविति ना : या माहात्मेयाचे तें ऐसेंचि कीं’ : पैशून्य बोलों लागले : पैशून्य बोलति जवं जवं तवं तवं स्तीति होए : सूखचि होए : मग स्तीति भंगली : उदीयांचि गोसावीयाचेया दरिसनां आले : गोसावीयासि गुळळा होत असे : जवळीकें इंद्रभट असति : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : आणि ‘इंद्रभटो : आमचे गोसावी साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्ति : आराधीतां मूक्ति : कां वीरोधीतां मूक्ति’ : इंद्रभटीं गोसावीयां पुढें सांघीतलें : गोसावी उगेचि होते : ॥

लीळा २९५ : राणाइ पीते दधिभात
राणाइसें आणि राणाइसाचे पीते गोसावीयांचेया दरिसनांसि आलिं : उपाहारू आणिला : गोसावीयांसि पीवळदरडी आसन : भेटि जाली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : गोसावीयांसि आरोगणेलागि वीनवीलें : मग गोसावी बीढारा बीजें केलें : गोसावीयांसि पूजावस्वर जाला : बाइसीं ताट केलें : दधीभातु वाढीला : आरोगण जाली : ॥

लीळा २९६ : नंदेश्र्वरीं दादेया भेटि
एकुदीसीं गोसावी नंदेश्र्वरा बीजें केलें : तवं दादा एकू तेथ रांगवळी भरित होता : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ भटो : रंगमाळिका भरित असा’ : ‘जी जी’ : मग भेटि जाली : श्रीचरणा लागले : तेथ गोसावीयांसि आसन : ॥ (हे लीळा : रामेश्र्वरबास)

लीळा २९७ : गेउरवावीएसि जोगेश्र्वरीसि वसति : पीसाचीका प्रति
मग तेथौनि गोसावी गेउरवाविए बीजें केलें : जोगेश्र्वरी वसति जाली : गोसावीयांसि चरणक्षाळण : पटिसाळे उजवेयाकडे आसन : पुजा अवस्वरू : भितरिली चौकीं उदेयाचां पुजा अवस्वर जाला : गोसावी : आंगीं टोपरें लेउनि : आसनीं उपवीष्ट असति : तव पीसी एकि आली : हातीं वनें : भितरि गेली : देवतेचिए डोइए वरि वनें ठेविलें : दीवेयाचेनि तेलें आपुलें तोंड पुसीलें : डोइ उजु केली : कोळसेयाचें काजळ केलें : तें काजळ डोळां सूंदलें : देवतें सेंदूर कपाळीं लावीलें : निर्मालु डोइए खोवीला : आणि एसी मूरकैजे : खोलइजे : मग ह्मणीतलें : ‘देवव्हो : मीं तुमतें बोळवीत एइन : देया पोतें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘द्या : बाइ : पोतें : जाडि वोपा’ : मग बाइसीं जाडि : पोतें : दीधलें : मग गोसावी बीजें केलें : पुढे पुढे चाले : आणि माघौती उभी राहे : नावेक क्षोभैजे : माघौती पुढे जाए : आणि उभी राहे : ऐसी अर्धी एक वाट आली : मग ह्मणीतलें : ‘देव व्हो : आतां मी नैएं : आपूले घेया पोतें : तें मियां तुमतें झांकवीलें : (तथा) चाळवीलें कीं’ : ‘तें जाणीजैल कीं’ : मग भक्तजनीं मात्रा घेतली : ‘देव व्हो : आतां मीं जाइन’ : गोसावी अनोज्ञा दीधली : ॥

लीळा २९८ : पींपळगांवीं आरोगण
बारसीचां दीसीं : गोसावी पींपळगावां बीजें केलें : मलां पींपळातळि आसन : बाइसें मुख्य करूनि सकळे भक्तजनें बारसीची भीक्षा करूनि आलीं : बाइसीं गोसावीयांसि पुजावसर केला : गोसावीयांसि आरोगण : भक्तजना जेवणें जालीं : गोसावीयांसि गुळला : वीडा : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥

लीळा २९९ : धाबां आरोगण : उपाध्यां डोणि पाहों धाडणें
मग गोसावी खांबगावां आले : धाबां पहुड : उपहुड : तवं दोणि न रिगे : मग गोसावी उपाध्यातें ह्मणीतलें : ‘बटिका : दोणि पाहा जा’ गेले : ‘जी जी : दोनि पैलाडि गेली’ : मग गोसावीयांसि तेथ आरोगण : गुळळा : वीडा : पुडुती सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बटिका : दोणि पाहा जा’ : मग उपाध्ये गेले : ते टेकावरि बैसोनि देनि रिगतां पाहाति होते : दोनि रिगाली : इतुलेनि सांघों आले : गोसावीयां पुढां सांघो आले : मग गोसावी बीजें केलें : गोसावी दोनि बैसले : भक्तजनें बैसलीं : तेहीं दोनि आवलिली : मध्यें पातली : आणि तेंहीं तागा घालौनि नावेक मध्यें दोनि राहावीली : मग थडीए लावीली : मग दोणि वरूनि उतरले : आवघीं भक्तजनें उतरलीं : गोसावी तेयांसि उचीतां आले : गोसावी बाइसा पासौनि पूंडवाटूवा मागितला : पुडवाटुवा आपुलेनि श्रीकरें तेयांचिए वोंटीए झाडौनि रिचवीला : ॥

लीळा ३०० : ताएश्र्वरीं आसन : पानेश्र्वरीं वसति
मग गोसावी तायेश्वरा बीजें केलें : चौकीं नावेक आसन : तैसेंचि गोसावी नादेयाचेया साजेया कडौनि पानेश्र्वरां बीजें केलें : चौकाचां नृत्यकोणीं वोटा : तेथ वस्ति जाली : बाइसीं रात्रीचां पुजावसर जाला : मग बाइसीं तांदुळ वेळीले : दुध आणिलें : मग गोसावीयातें व्याळियेलागि वीनवीलें : गोसावीयासि व्याळियचि प्रवृत्ति नाहीं : मग बाइसीं भातांतु दुध घातलें : ताकाचें बोट लावीलें : दहीं करंबा केला : मग रात्रीं वोटेयावरि पहुड ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP