उद्योगपर्व - अर्जुनविजय

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


' उद्योग ' नाम सर्वा पर्वोमाजी अपूर्व हें पर्व, ।
आल्हादक रसिकांला जेवि उदधिलागिं होय वि धुपर्व ॥

अर्जुनविजय

जाय प्रथम कुरुप तो, निजला होता प्रभु स्वपर्यकी,
ज्यासि स्मरुनि निजावें स्वस्थ स्थापूनि शीर्ष अर्यकीं ॥१॥
प्रभुच्या शिराकडे तो स्वमहत्वस्तव बसे अर्कवि मानी; ।
होईल काय हंस ब्रह्मयाच्याहि बसला वक विमानी ? ॥२॥
मागुनि गेला अर्जुन, बसला पायांकडेचि पाहत, कीं ।
या विनती श्रीगुरुची बहु, त्या लेशहि नसे, कृपा, हतकीं ॥३॥
कैसा असेल अन्य प्रभुच्या दृष्टीसमोर सामान्य ? ।
उठतांचि तीस अर्जुन झाला दृष्टीस मोरसा मान्य ॥४॥
पार्थ ह्नणे, ' प्रार्थाया आलों प्रभुजी ! तुला साहायास ' ।
कौरव ह्नणे ' बहाया प्रथमचि जो पातला, पहा यास ॥५॥
तुज मी याचें माझें सम सख्य जसें, तसेंच सम नातें, ।
संत ह्नणति, ' पूर्वागतसाह्यशिवपदी सदा वस ' मनातें ॥६॥
देव ह्नणे, ' सत्यचि हें तरि पार्थ प्रथम पाहिला आहे,  ।
सर्वहि संत न्यायें भेद न आगमनदर्शनी पाहे ॥७॥
पूर्वागत तूं जैसा तैसा मज पूर्वदृष्ट हा मान्य, ।
दोघांचेहि करावें म्यां साह्य प्रिय, तुह्मी न सामान्य ॥८॥
तुजहुनि कनिष्ठ अर्जुन बाळकसा, हें मनी पहा नातें, ।
रीति दहांची हें कीं पहिलें समजाविती लहानातें ॥९॥
आहेत एक अर्बुद नारायण नाम गोप मजसम जे, ।
सर्वहि अनंतबल ते, समजे न परां, परंतु मज समजे ॥१०॥
ते कीं न्यस्तायुध मी, त्यांत तुह्मां मान्य काय दोघांस ? '  ।
ऐसें प्रभूत्तम पुसे त्या दैवादैवसंपदोघांस ॥११॥
पार्थ ह्नणे, ' गोविंदा ! न्यस्तायुध तूंचि पाहिजेस मज, ' ।
मागे सैन्य सुयोधन, वरहि वरायासि पाहिजे समज ॥१२॥
बहु मेळवूनि बल्लव अज्ञ पळत जाय, कृष्ण सोडून, ।
अधन शिशु जसा टाकुनि चिंतामणि बहु कपर्द जोडून ॥१३॥
चित्तांत ह्नणे, ' कैसा केला अरिमीनहद अगाध रिता ।
भ्रात श्रुत स्मरेना की हा प्रभु जाहला अगा धरिता ॥१४॥
कृष्ण ह्नणे, ' पार्था ! त्वां अर्बुद बल हातिचें दिलें अरिला ।
जो ह्नणतो, ' भांडेना, शस्त्र धरीना असा कसा वरिला ? ॥१५॥
पार्थ ह्नणे, ' तूं मुनिनी चित्ती षडरिक्षयार्थ धरिलास, ।
हरिला समस्तहि श्रितताप तुवां ह्नणुनि म्यांहि वरिलास ॥१६॥
' न धरावें शस्त्र ' असी प्रभुची आहे जरि प्रतिज्ञा, ते ।
राहो, त्वस्मरणेंचि ध्वसिति कामाद्यरिप्रति ज्ञाते ॥१७॥
सुगम त्वदाश्रिताला देवेंद्रालाहि अर्थ असुगम जे, ।
त्वत्प्रेक्षितामरांतकसेनाचे लोपतात असु गमजे ॥१८॥
तूं या धनंजयाचा सारथि करुणानदा ! समीरण हो, ।
वाढेल तेज माझें प्रचुर मग करीन दास मी रण, हो ! ॥१९॥
व्हावा सारथि समरी शौरि मनोरथ मनी असे चिर हा ।
मत्प्रग्रहप्रतोद स्वीकारुनि मद्रथी असेचि रहा. ' ॥२०॥
स्वजनामरद्रुम प्रभु हांसोनि म्हणे,  ' अवश्य तुजला जो ।
अर्थ अपेक्षित तो हो, मातलिसारथि महेंद्र तुज लाजो ' ॥२१॥
असि साधु साधुपतिसी गांठि पडे, ती जसी अया परिसा;  ।
यापरि साचा हाचि प्रेमळ, याच्याचि या जया परिसा ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP