मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
धन्य भगवाना नेलास मोतीदाण...

नानासाहेब पेशव्यांचा पोवाडा - धन्य भगवाना नेलास मोतीदाण...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


धन्य भगवाना नेलास मोतीदाणा । दख्खनचा बादशाह साहेबनाना ॥ध्रु०॥
दिवाणखाना खुष रंगमहाल जोरे मौज । तर्‍हेतर्‍हेचे पक्षी नानाची रिज ॥ काय गेंडिया सांबर आणिक सावज । भले भले पटाइत वाघ गर्ज ॥ खंडेरायाची जोडी विरळागत काज । नानापेशवे नाव तयाला साज ॥ उघडया ताटीं मुलुख करितो राज्य । गरिबाची करीत होता बुज ॥......। दुर्बळ ब्राह्मणावर फार त्याची रिज
पूल पालख्या तमाम केल्या फन्ना । ह्यांनी पुल बांधिले नावा केल्या मना ॥धन्य०॥ ॥१॥

अपघटित बुध त्याचे पत्रवाडे । खास हौसीचे राखिले घोडे ॥ तुरंगी टाकिले पायात तोडे ।.......॥ टाकिले ऐसे तोडे, जरदाईत । घोडा काळा निळा बोर नळकळीत ॥ अबलक पंचकल्याणी कुमाइत, । बारा हजार घोडा पुण्यात कडकडीत ॥ ह्याशिवाय झमकती पागा नाही गणित । भाऊसाहेबासारखी बाजू अशी झाली मुक्त ॥ दादासाहेब मनात चिंताग्रस्त ।.....॥ विश्वासराव नानाचा पुत्र नगिना । तो माधवराव बाळ बत्तीसलक्षणा ॥धन्य०॥ ॥२॥

नाना होते धुरंधर, नाही लक्ष्मीला पार । शितल छाया एक दयावंत पृथ्वीवर ॥ मोठे मोठे महंत तरले होत । त्याची अशी कीर्त साधुसंत ॥ श्रावणमासी दक्षणा पुण्यात । मिळाले ब्राह्मण नाहीं गणित ॥ बुंदेलखंड माळवा काशी प्रांत । कर्नाटक तेलंगण आणिक गुजरात ॥ हे अवघे तळ कोंकण सदोदित मिळालेत । ब्राह्मण पर्वतीस तेलंगी ब्राह्मण डोकी देतात ॥ ओग्राळं रुपये नाही घेतात । शिव्या श्रीमंताला देतात ॥ रमण्यामधिं शिलबन चतुर शहाणा काय अगाध करणी गोपिकाबाई सुलक्षणा ॥धन्य०॥ ॥३॥

नाना होते केवल अवतार, गोपिगकाबाईचें छत्र, कळस ढळला । पण नाही करुणा आली त्या देवाला ॥ काय द्वारका सोडून कृष्ण निघाला । नळाने टकिले दमयंतीला ॥ भोळाशंकर होता पार्वतीला । रामचंद्राने मोकलिले सिताबाईला ॥........। हरिश्चंद्र होता तारामतीला ॥ जंगलशिचा रमणा,  सोडिला रमणा कैक हजार, आणिक बुंदेलखाना ॥धन्य०॥ ॥४॥

हत्तीघोडयांचे केले रथ । आणिक जिनखानां नाहीं गणित ॥ नानासारखा समर्थ गेला पुतळा । सावलीच्या सुखं गोधने गोळा ॥ त्या पिकल्या वृक्षाखाली पक्ष्यांचा मेळा । त्याच्या गुणवती केशरी नाटकशाळा ॥ काय कातले भगवंता वेळोवेळा । त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा ॥ शिरींचे शिरपेच मोत्यांच्या माळा । राजपद गेले परमेश्वरा सगळे ॥ शिवराम गातो पिंपळगांव ठिकाणा । आम्ही वेडे बगडें गातों मनाशी आणा ॥धन्य०॥ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP