मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय १४ वा

पांडवप्रताप - अध्याय १४ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
इंद्रप्रस्थीं पंडुसुत ॥ धर्मराजा राज्य करीत ॥ चौघे बंधु बलवंत ॥ सदा सादर सर्वार्थीं ॥१॥
तों दूत आले धांवत ॥ धर्मासी जाण विती मात ॥ कीं यादव भारासमवेत ॥ राम श्री कृष्ण पातले ॥२॥
छप्पन्न कोटी यादवधीर ॥ चतुरंग दल भार ॥ आले इंद्रप्रस्था बाहेर ॥ वाद्यें अपार गर्जती ॥३॥
श्रृंगारू नियां इंद्र प्रस्थ ॥ पांडव सामोरे धांवत ॥ रुक्मिणीनाथ रेवतीकांत ॥ रथाखालीं उतरती ॥४॥
राम आणि ह्रषीकेशी ॥ आलिंगन देती धार्मासी ॥ भीमार्जुनां माद्री सुतांसी ॥ परमानंदें भेटले ॥५॥
उद्धव सात्यकी अक्रूर ॥ यांसी भेटती पंडुकुमार ॥ कृष्ण बंधु कृष्ण पुत्र ॥ मदन सांबादि भेटले ॥६॥
समस्तांसी सभेस आणून ॥ बैसविले आदरें करून ॥ मुख्या सनीं बैसवूनि राम कृष्ण ॥ केलें पूजन यथो चित ॥७॥
आदरें बोले ह्रषी केशी ॥ सुभद्रा निरवावी तुम्हांसी ॥ म्हणोनि आलों भेटीसी ॥ बोळवण करूं सोयरिके ॥८॥
अपार धन अलंकार ॥ धर्मासी ओपी रेवतीवर ॥ विंशति श्यामकर्ण सुंदर ॥ पांचां प्रती समर्पिले ॥९॥
रथ गज दास दासी ॥ नाना यानें सुवस्त्रराशी ॥ जें न गणवे शेषासी ॥ इतुकें आंदण दीधलें ॥१०॥
वेंचितां न सरे आसमास ॥ अक्षय्य दिधले द्र्व्य कोश ॥ खिल्लारें अर्पिलीं विशेष ॥ नंदिनींचीं पडिपाडें ॥११॥
आंदण दिधलें बहुत ॥ तें अंगीकरूनि पंडुसुत ॥ पांचही जण स्तवीत ॥ श्रीरंगीसी तेधवां ॥१२॥
महाराज तूं जगज्जीवन ॥ भक्तकैवारी जनन्मोहन ॥ आम्ही पांडव तुझे दीन ॥ थोर करिसी आम्हांतें ॥१३॥
मग राम कृष्ण दलसहित ॥ रावहविले दिवस सप्त ॥ भोजनादि उपभोग बहुत ॥ देऊनियां गौरविले ॥१४॥
देऊनियां वस्त्रालंकार ॥ यादव बोळविले समग्र ॥ सर्व गेले परी श्रीधर ॥ इंद्र प्रस्थींच राहविला ॥१५॥
पार्थ प्राणसखा जिवलग ॥ त्याचा न साहवे वियोग ॥ अर्जुनापाशीं श्रीरंग ॥ म्हणोनि राहिला सर्वदा ॥१६॥
सुभद्रा जाहली गरोदर ॥ लोटतां एक संवत्सर ॥ उपजला अभिमन्यु कुमार ॥ प्रति अर्जुन पराक्रमें ॥१७॥
कुमार सुंदर देखोनि पाहीं ॥ धर्में वांटिल्या सहस्त्र गाई ॥ भांडारें फोडोनि सर्वही ॥ याचक तृप्त केले पैं ॥१८॥
यावरी द्रुपदराज कुमारी ॥ गर्भशुक्तिके माझारी ॥ पंच मुक्ताफलें निर्धारीं ॥ पंचवीर्यें जाहलीं ॥१९॥
धर्मात्मज प्रतिविंध्य ॥ भीमवीर्थें श्रुतसोम शुद्ध ॥ पार्थात्मज श्रुतकर्मा प्रसिद्ध ॥ शतानीक नकुलाचा ॥२०॥
सहदेवाचा श्रुतसेन ॥ पांचां वर्षांत पांच जण ॥ भिन्न भिन्न उपजोन ॥ सुख दिधलें समस्तां ॥२१॥
जात कर्मादि षोदश प्रकार ॥ धौम्य पुरोहित करी समग्र ॥ साही जण जाहले थोर ॥ केले संस्कार अनुक्रमें ॥२२॥
करविलें वेदाध्ययन ॥ सकल शास्त्रीं जाहले निपुण ॥ अर्जुनापासूनि साही जण ॥ धनुर्वेद शिकले पैं ॥२३॥
हे रणपंडित महारथी ॥ पुढें समयीं वर्णिजेती ॥ त्यांमाजी अभिमन्य़ूची ख्याती ॥ परमपुरुषार्थी आगळा ॥२४॥
तो कृष्ण भगिनी नंदन ॥ त्याकडे पाहोनि अर्जुन ॥ सर्व दाही आनंदघन ॥ विघा संपूर्ण बिंबली ॥२५॥
तो महाराज रणपंडित ॥ द्रोणपर्वीं वर्णिजेल पुरुषार्थ ॥ त्याचे पाटीं परीक्षिति सुत ॥ तुझा पिता जन मेजया ॥२६॥
ऐशियापरी पुरंदरप्रस्थीं ॥ धर्म राज्य करी विदेहस्थितीं ॥ पूर्वीं हरिश्चंद्र कीं भूमिजापती ॥ कीं चक्रवर्ती शिबिराज ॥२७॥
रुक्मांगद धर्मांगद नळ ॥ तैसाचि धर्मराज दयाळ ॥ आपुली काया आपणा प्रिय केवळ ॥ तैसाचि स्त्रेहाळ सर्व भूतीं ॥२८॥
आज्ञा न भंगिती भूपाळ ॥ करभार देती पुष्कळ ॥ दुष्ट दंडावया मूर्तिमंत काळ ॥ सेवक संतभक्तांचा ॥२९॥
प्राणप्रिय श्री कृष्ण ॥ एकजीव एकप्राण ॥ मृगया भोजन पान शयन ॥ एके ठायीं सर्वदा ॥३०॥
श्रीरंगासी म्हणे पार्थ वीर ॥ ग्रीष्मऋतु जाळी फार ॥ यमुनातीरीं करू विहार ॥ अवश्य श्री धर म्हणतसे ॥३१॥
सवें सुभद्रा आणि द्रौपदी ॥ त्यांसवें बहु स्त्रियांची मांदी ॥ षड्र्सान्न समृद्धी ॥ आणि शिबिरें समागमें ॥३२॥
कृतांत भगिनीचे तीरीं ॥ वनें शोभिवंत नानापरी ॥ कनकस्तंभ शिबिरें निर्धारीं ॥ उभविलीं सुंदर ॥३३॥
सुभद्रा आणि दुपदनंदिनी ॥ क्रीडती तेथें नौकायानीं ॥ कर्णधार स्त्रियांनीं ॥ आवलिजे तदाज्ञें ॥३४॥
एक करिती गायन ॥ एक स्त्रिया करिती नर्तन ॥ येरीकडे कृष्णार्जुन ॥ यमुनातीरीं क्रीडती ॥३५॥
कृष्ण चरण स्पर्शें करून ॥ जलचरें जाती उद्धरून ॥ यमुना जाहली नीलवर्ण ॥ नीलगात्र क्रीडतां ॥३६॥
नीलवर्ण जगदीश्वर ॥ अर्जुनाची तनु गौर ॥ वाटे विष्णु आणि उमावर ॥ भानुजातीरीं क्रीडती ॥३७॥
असो जल क्रीडा करून ॥ बाहरे आले उभय कृष्ण ॥ तों तप्तहाट कसम वर्ण ॥ पुरुष एक पातला ॥३८॥
श्मश्रु केश पिंगट वर्ण ॥ वेष्टिलें असे कृष्ण वसन ॥ खदिरांगार तैसे नयन ॥ यज्ञोपवीत तेजस्वी ॥३९॥
ऐसा येऊनि ब्राह्मण ॥ उभय कृष्णां प्रार्थी कर जोडून ॥ म्हणे मी क्षुधित पूर्ण ॥ खांडववन भोजना दीजे ॥४०॥
मी प्रत्यक्ष हुताशन ॥ रोगें जाहलों अतिक्षीण ॥ देतां खांडववन भोजन ॥ रोगमोचन होईल ॥४१॥
स्वशक्तीनें मी जातों तेथ ॥ परी मघवा मेघा वर्षत ॥ माझें कांहीं न चाले सत्य ॥ बलक्षीण होय मी ॥४२॥
तुम्ही सोडूनि अस्त्रजाल ॥ निवारा मेघधारा सकल ॥ त्यावरी तक्षक विशाल ॥ शतपुत्रांशीं राहातसे ॥४३॥
तक्षक शक्राचा मित्र ॥ म्हणोनि राहतो निरंतर ॥ ऐसें बोलतां वैश्वानर ॥ कृष्णार्जुन आवेशती ॥४४॥
जन मेजय म्हणे वैशंपायना ॥ कां रोग लागला द्विमूर्धाना ॥ येरू म्हणे राया सज्ञाना ॥ परिसें गोष्टी नावेक ॥४५॥
श्वेतकेत राजा पवित्र ॥ तेणें मांडिलें दीर्घ सत्र ॥ द्वादश वर्षें विचित्र ॥ द्रव्य अपार वेंचिलें ॥४६॥
द्वादश वर्षें करितां यज्ञा ॥ श्रम पावले ब्राह्यण ॥ धूम्रें आरक्त नयन ॥ अश्रु स्त्रवती सर्वदा ॥४७॥
विप्र श्रमले फार ॥ रायें राहविला अध्वर ॥ लोटतां द्वादश संवत्सर ॥ पुढती याग आरंभिला ॥४८॥
बोलावी पहिल्या ऋत्विजांप्रती ॥ ते श्रमले न येती पुढती ॥ मग प्रसन्न करूनि उमापती ॥ ऋत्विज मागे तो ॥४९॥
आपुला अंश दुर्वा समुनी ॥ शिव पाठवी त्यालागूनी ॥ तेणें अनेक ऋषी मेळवूनी ॥ याग नेला सिद्धीतें ॥५०॥
हस्तिशुंडे प्रमाण ॥ वसुधारा चालली संपूर्ण ॥ द्वादश वर्षें खंडन ॥ अहो रात्र नसेचि ॥५१॥
द्वादश वर्षें पर्यंत ॥ होमद्रव्य भक्षिलें अद्भुत ॥ पुर्णाहुति होतां श्वेतकेत ॥ परम सुख पावला ॥५२॥
दक्षिणा देऊनि बहुवस ॥ तोषविला ॠषि दुर्वास ॥ परी उदररोगें यज्ञ पुरुष ॥ क्षीण अत्यंत जाहला ॥५३॥
कुष्ठें व्यापिलें शरीर ॥ कासावीस वैश्वानर ॥ द्वयवदनीं अरुचि फार ॥ अवदान न घे कोठेंही ॥५४॥
स्वाहा स्वधेचा पती ॥ कोणे यज्ञीं न घेचि आहुती ॥ पंडुवर्ण जाहली कांती ॥ क्षीवशक्ति सर्वदा ॥५५॥
खांडववन भक्षितां तत्काळ ॥ रोग जाईल समूळ ॥ परी तेथें मेघ वर्षत जळ ॥ शक्राज्ञें करू नियां ॥५६॥
तक्षक पुत्राशीं उद्धट ॥ शिरीं घेऊनि सहस्त्र जल घट ॥ शिंपी तेणें हव्यवाट ॥ अपमानें माघारतसे ॥५७॥
म्हणे ब्रह्म देवासी गेलों शरण ॥ तो म्हणे अवतार कृष्णार्जुन ॥ ते तुज देतील खांडवदान ॥ मेघ पुरुषार्थें वारूनि ॥५८॥
म्हणेनि यमुनातीरीं येऊन ॥ चित्र भानु प्रार्थी कृष्णार्जुन ॥ म्हणे जगन्निवास मनमोहन ॥ रोग हरण माझें करीं ॥५९॥
ब्रह्मानंदा वनमाली ॥ मी तव मुख ज्वालामाली ॥ माझी रोग हरीं ये वेळीं ॥ दीनदयाळा गोविंदा ॥६०॥
मग बोले वीर पार्थ ॥ तुज खांडववन देईन यथार्थ ॥ चालों नेदीं इंद्राचें सामर्थ्य ॥ परी एक न्य़ून येथें असे ॥६१॥
अस्त्रें मजपाशीं विशेष ॥ परी नाहीं रथ आणि धनुष्य ॥ ऐसें ऐकतां यज्ञपुरुष ॥ प्रसन्न जाहला अर्जुनासी ॥६२॥
यमुनाजलीं बुडी देऊन ॥ पाताळीं गेला हुता शन ॥ वरुणा प्रति प्रार्थून ॥ दिव्यवस्तु घेतल्या ॥६३॥
दैत्य वधा वया लागून ॥ पूर्वीं विधीनें ठेविल्या निर्मून ॥ त्या घेऊनि हुता शन ॥ पार्था जवळी पातला ॥६४॥
गांडीवचाप देत हस्तीं ॥ ज्या़ची कल्पांत सूर्या समान दीप्ती ॥ अक्षय्य भाता बाण न सरती ॥ कल्पवरी वेंचितां ॥६५॥
समरीं जें जें अस्त्र कल्पावें ॥ तें तें तत्काळचि प्रसवे ॥ बाण समूह न मोजवे ॥ सहस्त्रवक्र गणितांही ॥६६॥
जैसे शास्त्रज्ञ संवादती ॥ शब्दमाला न खंडे कल्पांतीं ॥ कीं ग्रंथीं कवीचे शब्द किती ॥ नाहीं गणती तयांसी ॥६७॥
सवेंचि ओपिला विजयरथ ॥ ध्वजीं बैसला अंजनी सुत ॥ जो भाललोचन उमाकांत ॥ अर्जुनें पूर्वीं प्रर्थिला ॥६८॥
उच्चैःश्रव्या समान ॥ चार्‍ही अश्व क्षीरवर्ण ॥ कीं नवनीताचे घडिले पूर्ण ॥ कीं कर्पूर चूर्णें लुटियेले ॥६९॥
जान्हवीतोय आटूनि घडिले ॥ कीं चंद्रकिरणांचे ओतिले ॥ कीं क्षीरसागरें पाठविले ॥ ह्रदय शाळे मधू नियां ॥७०॥
चंद्र सूर्यां ऐसीं चक्रें ॥ रथाचीं जडित विचित्रें ॥ वारू हिंसती अतिगजरें ॥ मेघ गर्जने सारिखे ॥७१॥
साक्षात तो त्रिनेत्र ॥ ध्वजीं बैस लासे वानर ॥ ज्याचा ऐकतां भुभुःकार ॥ प्रलय वाटे शत्रूंसी ॥७२॥
चक्र आणि एक गदा ॥ अग्नि देत तेव्हां मुकुंदा ॥ अर्जुनाचे भाग्याची मर्यादा ॥ ब्रह्मा दिकां नव्हेचि ॥७३॥
पार्थें नमिलें हुता शना ॥ विजयरथा केली प्रदक्षिणा ॥ सारथि करूनि नारायणा ॥ बैसे अर्जुन मुख्य़ा सनीं ॥७४॥
उतावीळ जावया कृष्णार्जुन ॥ त्याचि रथीं बैसला अग्न ॥ चत्वारिशृंग त्रिचरण ॥ सप्तपाणि प्रत्यक्ष ॥७५॥
खांडवव जवळी येऊनि त्वरा ॥ म्हणती स्वामी वैश्वानरा ॥ आतां रोग हरण करा ॥ स्वेच्छें वन भक्षू नियां ॥७६॥
ऐसी आज्ञा होतां ते क्षणीं ॥ ज्वाळा धडकल्या चहूंकडूनी ॥ महाधूम्र भरला गगनीं ॥ पक्षी पोळती असंख्यात ॥७७॥
जैसा कनकाद्रीचा गोळ ॥ तैसे गगनीं चालिले ज्वाळ ॥ अग्नि म्हने वन समूळ ॥ भक्षितां तृप्त होईन मी ॥७८॥
अर्जुन म्हणे आळस सोडून ॥ स्वेच्छें करीं वनभक्षण ॥ पर्थें बाणीं भरोनि गगन ॥ मंडप द्दढ पैं केला ॥७९॥
कृष्ण चक्र भोंवतें फिरत ॥ इकडे अग्नि चेतला अद्भुत ॥ वनचरें पक्षी आहाळत ॥ तेही भक्षीत कृशानु ॥८०॥
व्याघ्र वृक जंबुक शशक ॥ रिस वानर सूकर भयानक ॥ कस्तूरी मृग तरस चितळ देख ॥ भाजोनि मरती एकसरें ॥८१॥
करी करिणी सिंह शार्दूल ॥ गंड भैरव पक्षिपाळे सकळ ॥ भोंवता बाणांचा आवर्त सबळ ॥ ठाव न दिसे पळा वया ॥८२॥
अठराभार वनस्पती ॥ असंख्य वृक्ष विराजती ॥ नामें सांगतां यथामती ॥ ग्रंथ फार वाढेल ॥८३॥
विहंगम नव लक्ष जाती ॥ चतुष्पद तीस लक्ष गणती ॥ अकरा लक्ष कीटक निश्चितीं ॥ ज्वाला वर्तीं पडियेले ॥८४॥
खांडववन जळतां ते वेळे ॥ सप्तही सागर तापले ॥ स्वर्गासी ज्वाळ संघट्टले ॥ आहाळों लागले लोक तेव्हां ॥८५॥
अतित्वरें धांवे निर्जरेंद्र ॥ प्रलय मेघ प्रेरी सत्वर ॥ अर्जुनें सोडोनि पवनास्त्र ॥ बलाहक विदारिला ॥८६॥
विपरीतकालीं जाय भाग्य ॥ तैसे वितळोनि गेले मेघ ॥ इंद्र वज्र टाकूनि सवेग ॥ धांवतां मार्ग फुटेना ॥८७॥
शिलाधारीं मेघ वर्षती ॥ विद्युल्लता असंख्य पडती ॥ मग म्हणे जगत्पती ॥ गोकुळीं ऐसेंचि जाहलें ॥८८॥
मग म्यां उचलोनि गोवर्धन ॥ रक्षिले गोकुळींचे जन ॥ पार्थ म्हणे आतां कोण ॥ तुजवीण असे रक्षिता ॥८९॥
अमरनाथाचे साह्यार्थ ॥ धांवती राक्षसांचे सार्थ ॥ परी समोर येतां पार्थ ॥ संहारीत एके बाणें ॥९०॥
दैत्य राक्षा गंधर्व यक्ष ॥ धांवती वेगें लक्षांचे लक्ष ॥ रणपंडित अर्जुन दक्ष ॥ संहारीत सर्वही ॥९१॥
अनिवार बाणांची वृष्टी ॥ चक्र फिरवी कृष्ण जग जेठी ॥ देवेंद्र जाहला हिंपुटी ॥ परी किरीटी नावरे ॥९२॥
सहस्त्र धार हरीचें चक्र ॥ दैत्य चक्रें संहारी अपार ॥ कोटयनु कोटी शिरो भार ॥ पृथ्वीवर पडियेले ॥९३॥
तेहतीस कोटी मिळोनि देव ॥ करिती शरधारा वर्षाव ॥ धांवले दिक्पाल सर्व ॥ आठही शस्त्रें घेऊ नियां ॥९४॥
एका द्श रुद्र द्वादश मित्र ॥ अश्विनै देव अष्टवसु पवित्र ॥ सहस्त्र पुत्रांशीं धांवे त्रिनेत्र ॥ परी पार्थ श्रीधर नाटोपती ॥९५॥
तों गर्जत आकाश वाणी ॥ म्हणे सावध होईं वज्रपाणी ॥ मनीं पाहें विचारूनी ॥ कृष्णार्जुन कोण हे ॥९६॥
तूं जय न पावसी यथार्थ ॥ मग माघारा आला अमरनाथ ॥ अग्नीसी म्हणती कृष्णपार्थ ॥ सावचित्त भोजन करीं ॥९७॥
नाना श्वापदें भक्षून ॥ बहुत वल्लीरस प्राशून ॥ दिव्य शरीर जाहला अग्न ॥ रोगनिर सन जाहलें ॥९८॥
मरूचा भ्राता मया सुर ॥ जो रावणाचा होय श्वशुर ॥ तो पळत होता बाहेर ॥ तंव कृष्णें चक्र सर साविलें ॥९९॥
पावक भयें आक्रंदून ॥ नरनारा यणां आला शरण ॥ पार्थ म्हणे तुज लागून ॥ न मारीं मी सर्वथा ॥१००॥
अर्जुनें अभय देतां ॥ चक्र आवरी कमलोद्भवपिता ॥ मया सुर चतुर जाणता ॥ विश्वकर्मा दैत्यांसी ॥१०१॥
ज्याची चातुर्य कला अपूर्व ॥ सभापर्वीं सांगिजेल सर्व ॥ हें जाणोनि पार्थर माधव ॥ रक्षिते जाहले साक्षेपें ॥१०२॥
सुरेंद्र मित्र तक्षक ॥ वनीं नसतां लागला पावक ॥ एक पुत्र आणि भार्या देख ॥ अनलचक्रीं कोंडलीं ॥१०३॥
पावकच क्राम धून ॥ बाहेर जाऊं नेदी अर्जुन ॥ पशु पक्षी निघतां छेदून ॥ बाणें घाली माघारां ॥१०४॥
कृष्ण चक्र अद्भुत ॥ भोंवतीं घिरटी घालीत ॥ अग्नि चहूं कडे जाळीत ॥ तृण मात्र राहों नेदी ॥१०५॥
एक वृक्ष अथवा वल्ली ॥ राहों नेदी ज्वाला माली ॥ तक्षक भार्या ते वेळीं ॥ पुत्र घेऊनि शोक करी ॥१०६॥
नव्याण्णव पुत्र घेऊन ॥ तक्षक गेला येथून ॥ मग म्हणे पुत्रा तुज लागून ॥ मुखा कडून गिळीन मी ॥१०७॥
मग तिनें पसरूनि वदन ॥ पुत्र गिळिला मुखा कडून ॥ शेवटीं पुच्छ  ग्रसून ॥ गगन मर्गें उडाली ॥१०८॥
निघाली वना बाहेर ॥ तों पार्थें सोडिला सतेज शर ॥ छेदिलें सर्पिणीचें शिर ॥ पुच्छ तुटलें पुत्राचें ॥१०९॥
माता निमाली ते वेळां ॥ तक्ष कपुत्र पळोनि गेला ॥ क्रुरुक्षेत्रासी पावला ॥ तेथें भेटला तक्षक ॥११०॥
सांगे पितयासी वृत्तान्त ॥ माता निमाली तेथें वनांत ॥ माझें पुच्छ तुटलें समस्त ॥ प्राण घेऊनि येथें आलों ॥१११॥
भार्येलागीं करी शोक ॥ रडत बैसे तक्षक ॥ म्हणे पार्थाच्या वंशीं देख ॥ मी भक्षीन एकातें ॥११२॥
असो इकडे हुताशन ॥ जाळीत समस्तही वन ॥ अपार श्वापदें भक्षून ॥ वल्लीरस प्राशीत ॥११३॥
मग स्तवन करी कृशान ॥ पूर्वीं नृपांनीं केलें बहु हवन ॥ परी मी तृप्त हुता शन ॥ आजि जाहलों अर्जुना ॥११४॥
वसतों शिवा चिये तृतीय नयनीं ॥ वस्ती माझी सहस्त्र वदनीं ॥ कल्पांतीं बैसें सर्व भक्षूनी ॥ परी तृप्त मी आजि जाहलों ॥११५॥
माझा आशीर्वाद यावरी ॥ शत्रु निवटीं तूं अवनीवरी ॥ राज्य करीं एक छत्री ॥ आशीर्वादें माझिया ॥११६॥
तक्ष कपुत्र आणि मया सुर ॥ दोघे वांचले साचार ॥ ऋष्यात्मज चौघे निर्धार ॥ सारंग पक्षी वांचले ॥११७॥
तरी मंदपाल नामें ऋषी ॥ तप स्तेजें गेला स्वर्गासी ॥ पावता जाहला पितृ लोकासी ॥ मन त्यासी कोणी नेदी ॥११८॥
न देती दिव्य भोग किंचित ॥ मग त्यासी देवेंद्र म्हणत ॥ तुझे पोटीं नाहीं सुत ॥ कष्ट प्राप्त त्या करितां ॥११९॥
पुत्र हीन जो प्राणी ॥ त्यासी येथें मान नेदी कोणी ॥ तरी तूं भलतिये योनीं ॥ पुत्र जन्मवीं मंदपाला ॥१२०॥
मग तो मंदपाल मुनी ॥ म्हणे फार संतति कोणे योनीं ॥ उतरला तो खांडववनीं ॥ पक्षी नयनीं विलोकिले ॥१२१॥
मग जातीची सारंगपक्षिणी ॥ जरिता नामें केली पत्नी ॥ आत्मवीर्य तेथें निक्षेपूनी ॥ चार पुत्र उपज व्ले ॥१२२॥
शुक्त मित्र स्तंभ द्रोण ॥ चहूं पुत्रांचें नाम करण ॥ पुत्रां समवेत नीडांत जाण ॥ जरिता ठेविली मंडपालें ॥१२३॥
लपिता नामें पक्षीण ॥ मंदपालाची स्त्री दुसरी पूर्ण ॥ तियेची भेटी जातां जाण ॥ पुढील भविष्य समजलें ॥१२४॥
कीं पावक जाळील या वना ॥ म्हणोनि प्रार्थिलें हुताशना ॥ माझे चौघे पुत्र पांचवी अंगना ॥ रक्षीं त्यांसी वैश्वानरा ॥१२५॥
अवश्य म्हणतसे अनल ॥ भाषदान देत तत्काळ ॥ ऋषि गेला मंदपाल ॥ तों मागें सकल वन जळे पैं ॥१२६॥
पक्षहीन कोमल हीं बाळें ॥ जरिता म्हणे ये वेळे ॥ कनिष्ठ भार्येच्या आसक्तीमुळें ॥ मंदपाल गेला की ॥१२७॥
मग म्हणे नारायणा ॥ रक्षक होईं आमुच्या प्राणां ॥ करुणा सिंधो जगज्जीवना ॥ सर्वांतर्व्यापक तूं ॥१२८॥
बालकें म्हणती माते ॥ उड्डाण करीं आकाशपंथें ॥ वांचवीं आपुल्या प्राणातें ॥ मोह आमुचा सोडोनियां ॥१२९॥
आम्ही बाळें पक्षहीन ॥ तूं वांचवीं आपुला प्राण ॥ मंदपाला पाशीं जाऊन ॥ आणिक पुत्र उपजवीं ॥१३०॥
पक्षिणी करी रोदन ॥ तुम्हांसी हुता शनीं ओपून ॥ म्यां काय करावें वांचोन ॥ देईन प्राण तुम्हां सवें ॥१३१॥
आतां आला देहान्त ॥ बाल हो आठवा रुक्मिणीकांत ॥ हे दीनदयाळ वैकुंठनाथ ॥ शरणा गत वत्सल तूं ॥१३२॥
तूं राहतोसी क्षीरसागरीं ॥ कीं अससी बलीचे द्वारीं ॥ तेथूनि तूं आपुला हात पसरीं ॥ रक्षीं आम्हांसी दयाळा ॥१३३॥
हे वैकुंठपुर विलासा ॥ गोकुल पालका जगन्निवासा ॥ अग्नि गिळोनि जगदीशा ॥ गाई गोपाळ रक्षिले ॥१३४॥
पांडव रक्षिले लाक्षा सदनीं ॥ आम्ही दीनें तुझीं चक्रपाणी ॥ धांव धांव ये क्षणीं ॥ ब्रह्मा नंदा करुणाब्धे ॥१३५॥
यावरी जरिता बाळांसी म्हणत ॥ मूषकबीळ आहे भूमींत ॥ तुम्हीं तेथें राहा गुप्त ॥ मृत्तिका द्वारीं लावीन मी ॥१३६॥
बाल म्हणती तेथें राहणें निंद्य ॥ भक्षील एकादें श्वापद ॥ अग्नींत देह ठेवितां शुद्ध ॥ स्वर्गधाम पाविजे ॥१३७॥
तों निकट आली ज्वाळ ॥ बाळें अत्यंत कोमळ ॥ अग्नीचें स्तवन निर्मळ ॥ करितीं जाहलीं तेधवां ॥१३८॥
जय जय महाराज हुताशन ॥ तीन स्वरूपें तूं एक अग्न ॥ आदि मध्य अंत पूर्ण ॥ तुजवांचोन नव्हेचि ॥१३९॥
सकलाचे जठरीं राहूनी ॥ तूंचि जीव विसी सर्व प्राणी ॥ सकल दैवतें तृप्त तुझेनी ॥ द्विवदना सप्तहस्ता ॥१४०॥
हरावया तम संपूर्ण ॥ तूंचि जाहलासी सूर्य नारायण ॥ मेघ जाहले तुज पासून ॥ विश्व संपूर्ण रक्षा वया ॥१४१॥
सोळा जण तुझे पूजक जाण ॥ अष्टाविंशति पात्रें करून ॥ तुझें करिती अर्चन ॥ द्विजांसी अग्नि पूज्य तूं ॥१४२॥
तुवां रक्षिला हनुमंत ॥ प्रल्हाद रक्षिला ज्वालेंत ॥ गोकुल रक्षिलें दावाग्नींत ॥ जोहरीं पांडव रक्षिले ॥१४३॥
ऐकतां पक्षियांचें स्तवन ॥ प्रसन्न जाहला हुताशन ॥ म्हणे म्यां रक्षिले तुमचे प्राण ॥ चिंता सोडून द्या आतां ॥१४४॥
तुमचा मंदपाल पिता ॥ मज प्रार्थूनि गेला होता ॥ इच्छित कांहीं मागा आतां ॥ तें तत्त्वतां देईन मी ॥१४५॥
पक्षी म्हणती येऊनि मार्जार ॥ आम्हां मारावया जपती फार ॥ त्यांपा सोनि रक्षणार ॥ तुजवांचुनि कोण असे ॥१४६॥
ऐसें ऐकतां ज्वाला माली ॥ ज्वाला लाविल्या मार्जारबिळीं ॥ बिडालकें जाळूनि तत्कालीं ॥ ऋषिबाला सांतवीत ॥१४७॥
जरिता करी रोदन ॥ म्हणे स्वामी यज्ञनारायण ॥ दीन दयाळ हुताशन ॥ पुत्रदान तुवां दिलें ॥१४८॥
इकडे लपितेसी म्हणे मंदपाल ॥ खांडववन जळालें सकळ ॥ तिज सहित ऋषि तत्काल ॥ जरितेजवळी पातला ॥१४९॥
पाठमोरी बैसली जरिता ॥ बाळें न बोलती बोलवितां ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे वनिता ॥ पाहा वया आतां आलासी ॥१५०॥
संकटीं सांडोनि आम्हांसी ॥ नूतन स्त्रियेसी भुललासी ॥ मंदपाल म्हणे अग्नीसी ॥ प्रार्थूनियां गेलों होतों ॥१५१॥
मग शांतवूनि स्त्रीबालकां ॥ मंदपाल नेत वना आणिका ॥ ऐसे पक्षी वांचले तेथें देख ॥ कुरु नायका जन मेजया ॥१५२॥
असो दिव्य निमानीं बिसोन ॥ पातला तेथें पाक शासन ॥ आलिंगूनि कृष्णार्जुन ॥ करी स्ववन दोघांचें ॥१५३॥
अचाट केला पुरुषार्य ॥ अग्नि जाहला रोगरहित ॥ यज्ञ मुखें समस्त ॥ देव आम्ही सुखी असों ॥१५४॥
मज सेवा सांगावी कांहीं ॥ मग पार्थ बोले ते समयीं ॥ म्हणे दिव्य शस्त्रभार देईं ॥ कारण पाहीं पुढें असे ॥१५५॥
मग बोले तो सुरेश ॥ प्रसन्न होईल व्योम केश ॥ तेव्हां दिव्य शस्त्रें बहुवस ॥ ओपील तुज निर्धारें ॥१५६॥
ऐसें बोलोनि संक्रंदन ॥ कृष्णासी त्रिवार करी प्रदक्षिण ॥ विमानीं बैसला आज्ञा घेऊन ॥ अमरावतिये पातला ॥१५७॥
संपूर्ण पंच दश दिन ॥ अग्नीनें भक्षिलें खांडववन ॥ परम तृप्त होऊन ॥ आज्ञा घेऊन तो गेला ॥१५८॥
गांडीवचाप अक्षय्य तूणीर ॥ विजयरथ ध्वज सुंदर ॥ घेऊ नियां गदा चक्र ॥ श्री करधर संतोषला ॥१५९॥
सवें मया सुरासी घेऊन ॥ निघाले वेगें कृष्णार्जुन ॥ यमुनातीरीं येऊन ॥ पूर्व स्थलीं राहिले ॥१६०॥
मागुती जल क्रीडा करूनि बहुत ॥ द्रौपदी सुभद्रे सहित ॥ इंद्र प्रस्था सत्वरी येत ॥ वंदीत धर्मकुंतींतें ॥१६१॥
सांगीतला चक्रोर चंद्रा ॥ दीन दयाळा करूणा समुद्रा ॥ सकल कर्ता करविता तूं ॥१६३॥
तुज करितां अर्जुनासी जय ॥ तुझे कृपें प्रताप शौर्य ॥ धैर्य धारणा कीर्ति पाहें ॥ तुज करितां श्रीरंग ॥१६४॥
एके गृहीं कृष्णार्जुन ॥ एके शय्ये सदा शयन ॥ एके ठायीं भोजन ॥ सदा गमन एके रथीं ॥१६५॥
दोघांचा एक विचार ॥ मेहुणेपणें विनोद साचार ॥ कृष्ण वियोग अणुमात्र ॥ अर्जुनासी सोसेना ॥१६६॥
अर्जुनाचा वियोग ॥ नेणेचि कदा श्रीरंग ॥ नरनारायण अभंग ॥ अवतरले पृथ्वीवरी ॥१६७॥
आणिक बहुत राजकन्या ॥ पांडवीं केल्या भोगांगना ॥ प्रभावती नामें ललना ॥ नकुलें जाऊनि वरियेली ॥१६८॥
परी सर्वांत श्रेष्ठ द्रुपदनंदिनी ॥ कीं सुभदा कृष्ण भगिनी ॥ सुभद्रेहूनि याज्ञ सेनी ॥ आवडे मनीं श्रीरंगा ॥१६९॥
येथोनि आदिपर्व समाप्त ॥ पुढें सभापर्वरस अद्भुत ॥ चौदा अध्याय पर्यंत ॥ आदिपर्व जाहलें ॥१७०॥
शास्त्रां माजी वेदान्त ॥ कीं देवां माजी वैकुंठनाथ ॥ आनंदवन क्षेत्रांत ॥ पर्वांत आदिपर्व तैसें हें ॥१७१॥
शस्त्रांमाजी सुदर्शन ॥ नव ग्रहांत सूर्य नारायण ॥ कीं विष्णु क्षेत्रांत जाण ॥ पंढरी पावन जैसी कीं ॥१७२॥
तैसें पर्वांत आदिपर्व ॥ नवर सयुक्त अति अपूर्व ॥ जो महाराज व्यास देव ॥ तेणें पूर्वीं कथियेलं ॥१७३॥
व्यास भारताचे अध्याय विशेष ॥ दोन शत आगळे तीस ॥ अवघे मिळोनि श्लोक सुरस ॥ किती मर्यादा ऐका ते ॥१७४॥
अठरा सहस्त्र नवशत ॥ चौर्‍यायशीं श्लोक विशेष परिमित ॥ इतुकी गणना नेमस्त ॥ वैशंपायनें असे ॥१७५॥
इतुक्यांचा मथितार्थ सुरस ॥ श्रीधरें अध्याय केले चतूर्दश ॥ पंढरी नगरीं विशेष ॥ आदिपर्व संपविलें ॥१७६॥
पुढें सभापर्वरस गहन ॥ जें भक्तिप्रेम वृक्षोद्यान ॥ तेथीचे छायेसी पंडित जन ॥ सर्व दाही वैसोत कीं ॥१७७॥
ब्रह्मा नंद स्वामी पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ श्री धरें वंदोनि उभयतां ॥ आदिपर्व संपविले ॥१७८॥
पुंडली कवरदा पांडुरंगा ॥ रुक्मिणी ह्र्दयार विंद भृंगा ॥ श्री धर वरदा अभंगा ॥ ब्राह्मा नंदा अक्षय्य तूं ॥१७९॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चतुर्दशा ध्यायीं कथियेलाअ ॥१८०॥
स्वस्ति श्री पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्री धरकृत ॥ जलक्रीडा खांडववनदहन समस्त ॥ अदिपर्वीं संपविले ॥१८१॥
इति श्री श्री धर कृतपांडवप्रतापादिपर्वणि चतुर्दशाध्यायः समाप्त ॥१४॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ श्रीपांडवप्रताप आदिपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP