खंड ९ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सतू म्हणे शौनकासी । योगात्मक खंड नववा तुजसी । कथिला तो सर्वद जगतासी । पूर्ण योगप्रद साक्षात्‍ ॥१॥
या एका खंडाचें करितां श्रवण । संपूर्ण पुराणवाचनाचें फळ पावन । महामते पावोनिया जन । मुक्त होती गणेशभक्त ॥२॥
जेथ योगपति गणनायक स्तुत । या खंडाचें महिमान अद्‍गभुत । अशक्य असे वर्णनातीत । विप्रा ऐसें सत्य असे ॥३॥
चतुर्वेंद अध्ययनाचें फळ । लाभतां षंडगसहित पठनाचें विमल । या खंडाच्या वाचनें केवळ । सर्वही निःसंशय लाभतसे ॥४॥
अठरा पुराणें उपपुराणें ऐकत । त्याचें जें पुण्य लाभत । त्याहून अधिक अनंत । या खंडाच्या श्रवणानें ॥५॥
शब्द ब्रह्मा पासून । ननाशास्त्रें विनिसृत महान । त्यांचे करितां जें पुण्य शोभन । त्याहून अधिक अनंत या खंडानें ॥६॥
तीर्थे सगळीं विधियुक्त । जो करी नर विधियुक्त । त्यास जें पुण्य लाभत । त्याहून अनंतपटीनें ह्या खंडश्रवणें ॥७॥
दानें विविध मानवोत्त म देत । त्यायोगें जें पुण्य लाभत त्याहून अनंतगुण होत प्राप्त । या खंडाच्या वाचनें श्रवणें ॥८॥
क्षेत्रें विविधभक्तियुक्त । जो नर विधियुक्त पाहत । त्यास जें पुण्य लाभत । त्याहून असंख्य फळ या खंडश्रवणें ॥९॥
यज्ञ संपूर्ण करित । नर जे शास्त्रसंमत । त्यांना जें फळ लाभत । त्याहून अनंतपट हया खंडश्रवणें ॥१०॥
इष्टापूर्तादिक सत्कर्मे करित । त्यांचें जें फळ लाभत । त्याहून अधिक अनंत । फळ ह्या खंडाच्या श्रवणें लाभें ॥११॥
किती करावें वर्णन । या खंडासम अन्य नसून । योगखंड हा योगसाधन । जेथ विस्तारें निरूपिलें ॥१२॥
संपूर्ण योगखंड व्यासवर्णित । कथिला तुजसी सांप्रत । आतां जातों मीं स्वाश्रमांत । तुझी आज्ञा घेवोनिया ॥१३॥
संपूर्ण मुद्‍गल पुराण । सर्व सिद्धिप्रद पावन । यापुढें नसे अन्य पुराण । शौनका आतां नमस्ते ॥१४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीसन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे नवमखंडमाहात्म्यवर्णनं नाम चत्वारिंशोऽध्यायः

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP