खंड ९ - अध्याय ३९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ नवमखंड श्रवण महिमान । सांगे सूत या अध्यायीं पावन । प्रल्हाद नाम योगपरायण । योगी मयूरेश भक्त होत ॥१॥
तो एकदा स्वप्नांत । देवेशास मयूरावफ़्र स्थित पहात । सिद्धिबुद्धींच्या सहित । गजमुख तो भक्तवत्सल ॥२॥
त्यास प्रणाम करून नाचत । आनंदाश्रू ओघळीत । महायश त्यास सांगत । मयूरेश वर मागण्या ॥३॥
तो त्यास नमून हर्षयुक्त । विघ्ने शास प्रार्थित । देई भक्ति दृढ योगशांतियुक्त । हेंचि वरदान मगतों ॥४॥
त्यांचें तें ऐकून वचन । तयास म्हणे गजानन । मुद्‍गलपुराणीं नवम खंड पावन । तो वाच तूं वाच तूं नित्य नेमें ॥५॥
त्यायोगें योगींद्र वंद्य होशील । माझी दृढ भवित लाभेल । ऐसें बोलून महापति सबळ । मयूरेश अंतर्धान पावला ॥६॥
तेवढयांत स्वप्न होऊन समाप्त । प्रल्हाद जागृत । मनांत अत्यंत विस्पित । मुद्‍गल पुराण शोधिलें ॥७॥
त्यांतला नवम खंड लिहून घेत । भक्तीनें त्याचा पाठ वाचित । त्या पुण्याईनें लाभत । योगगीतार्थक योग ॥८॥
तेव्हां अति मुदित होऊन । नवधा भजे गजानन । क्षेत्रसंन्यास घेऊन । नित्य वाची भक्तिभावें ॥९॥
पाठ नवम खंडाचा करित । नित्य नेमें तो तेथ । एकदा दैत्येंद्रमुख्य सिंधु खंडित । क्षेत्रस्थ मूर्ति गणेशाची ॥१०॥
दैत्यांनी तेथ स्थापिलि । सिंधु प्रतिमा तेथ पूजिली । प्रल्हाद मति तैं झाली । शौनका अत्यंत दुःखित ॥११॥
क्षेत्रवासी जन सोडून । गेले मयूरक क्षेत्र तें पावन । पळाले भय वाटून । इकडे तिकडे दुःखानें ॥१२॥
परी प्रल्हाद योगिवंद्य न जात । तेथेंच उपोषणपर बसत । क्षेत्रसंन्यासव्रत पाळित । मानसपूजा करी तेव्हां ॥१३॥
विघ्नेश्वरास नैवेद्य दाखवित । त्याचें उच्छिष्ट नित्य सेवित । त्याचा दृढ आग्रह पाहत । मयूरेश तै तोषला ॥१४॥
भक्ताच्या त्या ताळूंत । अमृत निर्माण करित । त्यायोगें त्यास तोषवित । ऐसा काळ बहु गेला ॥१५॥
पुढें गणेश शिवपुत्र होत । सिंधु दानवाच्या वधार्थ । देवर्षि पूजित प्रसन्नचित्त । मयूरेश तो भक्तप्रेमें ॥१६॥
त्या सिंधू मूर्ति फोडित । त्या मूर्तीत स्वयं प्रवेशत । त्यास पाहून पूजित । प्रल्हाद आनंदें योगिश्रेष्ठ ॥१७॥
पारणा करी हर्षभरित । प्रत्यक्ष गणराज त्यास पावत । वरप्रद तयास म्हणत । माग वर जो ह्रदयस्थित ॥१८॥
तो म्हणे तूं माझ्या सन्निध । राही सदा मयूरेशा निर्वेध । तुझ्या भजनीं मीं सुखद । मग्न निरंतर रहावें ॥१९॥
ऐसें करी हेंच मागत । वरदान मी सांप्रत । ब्रह्माकल्पान्तीं ब्रह्मचि करित । प्रल्हादास मयूरेश ॥२०॥
सन्निध त्याच्या राहत । ऐसा ब्रह्मप्रिय गण करित । दुसराही एक वृत्तान्त । तुज सांगतों शौनका ॥२१॥
विश्ववामित्र महामुनि करी । पारायण । या नव मुद्‍गलम खंडाचें शोभन । सरडा एक तेथ येऊन । समीपस्थ वृक्षावरचा ॥२२॥
ऐके न कळता तें पुराण । ज्वरपीडित्त होता दारूण । परी नवम खंडाचें होता श्रवण । श्रवणमात्रें ताप गेला ॥२३॥
त्या पुण्य गौरवें भोंग भोगित । ऐहिक सारे जे ह्रदयस्थित । अंतीं स्वानंद लोकांत । जाऊन गणेश सायुज्य लाभला ॥२४॥
गणेश्वरास तेथ पाहून । ब्रह्मीभूत तो झाला तत्क्षण । ऐसें नानाविध जन । ब्रह्मलाभ लाधले खंडश्रवणें ॥२५॥
त्यांची गणती अशक्य असत । भुक्तिमुक्तिप्रद हा ग्रंथ । नवम खंड विशेष युक्त । गणेश ज्ञानाचें सार त्यात ॥२६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे नवम खंडमाहात्म्यवर्णनं नामैकोनचत्वरिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP