मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ८० वा

काशीखंड - अध्याय ८० वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ ऐसीं निरूपिलीं स्त्रियांचीं लक्षणें ॥ मग निरूपिलीं शुद्धा चरणें ॥ जे नव प्रकारें घेइजे गुणें ॥ वंचिजे अशुभा ॥१॥
यानं तरें निरूपिला योगा भ्यास ॥ ज्या तप साधना दीर्घ प्रयास ॥ त्या हूनि शुभ सहस्त्र गुणें काशी वास ॥ निरूपिला दीर्घत्वें ॥२॥
मग सांगीतली काळ वंचना ॥ जेणें वंचिजे त्या यम गणां ॥ मग स्वामी नें निरूपिल्या खुणा ॥ नक्षत्र काळा चिया ॥३॥
यानंतरें कथा रिपुंजय राजा ॥ ब्रह्म यानें स्थ्पापिला आपुले पैजा ॥ दिवो दास नाम ठेवूनि वोजा ॥ वाराणसी मध्य़ें ॥४॥
तो सूर्य वंशीं मनूचा कुमर ॥ केला काशी पुरीचा राज्य धर ॥ जैं निर्जळ झाला जळ धर ॥ साठ वरुषें ॥५॥
तैं मंदरा चलीं क्रमिलें शिवें ॥ इंद्र दिक हरि विरिंचि देवें ॥ मंदरा चलासी वर पूर्ण भावें ॥ दिधला शंकरें पैं ॥६॥
ऐसें राज्य करितां तया दिवो दासा ॥ अनु चित उपजलें देवा धीशा ॥ दिवो दास राज यासी वळसा ॥ करणें कल्पिला ॥७॥
म्हणोनी दिवो दासाच्या राष्ट्रीं हून ॥ इंद्रें तत्काळ नेला हुता शन ॥ मग राजा होऊनि क्रोधा यमान ॥ पाचारिलें मंत्रि जनां ॥८॥
मंत्रि यांसी प्रश्न करी राजे श्वर ॥ अमरेशें नेला जी अंगार ॥ तरी कवण ते ऋषि देव सुर ॥ राहिले येथें ॥९॥
जितुकी माझी राज्य मेदिनी ॥ तों पर्यंत न राहिजे कोणीं ॥ शीघ्र आज्ञा दीजे जेथें शूळ पाणी ॥ तेथें जाइजे तुम्हीं ॥१०॥
मग सोम सूर्य आणि पवन ॥ वृष्टिकर आणि हुता शन ॥ हे दिवो दासें राष्ट्रीं हून ॥ घातले बाहेरी ॥११॥
मग देवीं योजिला अपवाद ॥ पाहाती राजाचा छिद्र भेद ॥ तंव तो राजा सच्चिदा नंद ॥ पृथ्वी मंडळीं ॥१२॥
मग शिवें पाठ विल्या योगिनी ॥ महा विशाळा दीर्घा ननी ॥ त्या समस्त आलिया आनंद वनीं ॥ पाहिला छिद्र भेद ॥१३॥
कांहीं केल्या न चले राज यासी ॥ मग त्या राहिल्या गंगा तीरासी ॥ तैं योगिनी तीर्थ जाहालें वाराणसीं ॥ प्रसिद्ध वेदीं ॥१४॥
यानं तरें मंदर पर्वतीं ॥ काशी वियोगें प्रवाहला पशु पती ॥ तेथें जवळी उभा होता गभस्ती ॥ त्यासी आज्ञा केली शिवें ॥१५॥
मग शिवाज्ञा घेऊनि तो सविता ॥ काशी मार्ग जाहाला क्रमिता ॥ रायाचें छिद्र पाहातां ॥ व्यर्य जाहाले मनोरथ ॥१६॥
कांहीं केल्या न चले राज यासी ॥ मग तो राहिला काशी निवासी ॥ द्वाद शरूपें घेऊनि पंच क्रोशी ॥ रक्षीत राहिला ॥१७॥
प्रथम तो यमा दित्य जाहाला ॥ शिवें प्रसन्न होऊनि स्थापिला ॥ तो अविमुक्ती मध्यें पूजिला ॥ श्रीमंता दिकीं ॥१८॥
यानंतरें खखोल्क सांगीतला ॥ जैसा अरुण गरुडांचा जन्म झाला ॥ तो कथा प्रसंग निरूपिला ॥ षडानना तुम्हीं ॥१९॥
मग ते गरुडाची जननी ॥ विनता आली आनंद वनीं ॥ तिणें पूजिला सविता तरणी ॥ तो विनता दित्य ॥२०॥
मग अरुणें तप केलें वाराणसीं ॥ प्रसन्न केलें वृष भध्व जासी ॥ सूर्यरथीं सारथी केला त्यासी ॥ त्या नाम अरुणा दित्य ॥२१॥
या नंतरें उत्तरार्क झाला ॥ मग विमल कुंडी लोलार्क स्थापिला ॥ मग सुरारि सुतें पूजिला ॥ तो सांबा दित्य ॥२२॥
मग गंगा तीरीं गंगा दित्य ॥ अंतर्गृहीं असे वृद्धा दित्य ॥ इत्यादि द्वाद शरूपें गभस्ति सत्य ॥ काशी स्थानीं पैं ॥२३॥
ऐसी द्वाद शादि त्यांची कथा ॥ मज निरूपिली स्वामि नाथा ॥ आणि मज कथिली समर्था ॥ विरिंचि देवाची ॥२४॥
व्यर्थ जाहाले सूर्याचे मनोरथ ॥ ऐसें जाणोनि तो विश्वनाथ ॥ म्हणे आतां कोण क्रमील पंथ ॥ काशी पुरीचा पैं ॥२५॥
तंव जवळी होता तो सृष्टीकर ॥ जो शेष शायीचा नाभि अंकुर ॥ त्यासी आज्ञा देत सर्वे श्वर ॥ आदि महेश जो ॥२६॥
मग आज्ञा वंदोनि विधाता ॥ तो काशी मार्ग जाहाला क्रमिता ॥ पंच क्रोशी मध्यें वंदिली सिता ॥ स्वर्ग संगा ते ॥२७॥
पाहे राज याचें अधर्मद्वार ॥ तंव तो सत्वा धीश नृपवर ॥ मग राजया जवळी विरिंचि साचार ॥ याग करा वया आला ॥२८॥
ब्रह्मा कल्पी पंचयाग करण ॥ राजा वदे दश याग करण ॥ मग आश्चर्य करी चतुरा नन ॥ म्हणे राजा सत्त्वाधिक ॥२९॥
मग विधिनें केले दश अध्वर ॥ लिंग स्थापिलें दशा श्वमेधेश्वर ॥ मग त्याचि लिंगीं तो सृष्टिकर ॥ राहिला वेदनि र्घोषें ॥३०॥
ऐसा तो राजा सत्त्वधीर समर्थ ॥ व्यर्थ जाहाले ब्रह्म याचे मनोरथ ॥ तंव वियोगें संतप्त जाहाला यथार्थ ॥ मंदरा चलीं शिव पैं ॥३१॥
काशी वियोगाचा दीर्घ अंगार ॥ तृतीय नेत्रींचा वैश्वानर ॥ तो संतप्त करी तसे अध्वर ॥ नावेक शिव शरीरीं ॥३२॥
या नंतरें जवळी होते शिव गण ॥ त्यांसी आज्ञा करी पंचानन ॥ मग तेही करा वया आले विघ्न ॥ रिपुंज यासी ॥३३॥
तेही छिद्र पाहातां अशक्त जाहाले ॥ मग ते लिंग स्थापूनि राहिले ॥ शिव पूजेसी स्मरते जाहाले ॥ वाराण सीमध्यें ॥३४॥
या नंतरें निरूपिली कथा ॥ शिवें आज्ञा केली गणनाथ ॥ तो दिवो दासासी करी व्यथा ॥ लंबोदर पैं ॥३५॥
लंबोष्ठकाचा मूळ वृत्तांत ॥ तो निरूपिला जी मज समस्त ॥ तो महा विघ्नांसी कृतांत ॥ दिग्गज मुंड तो ॥३६॥
तो काशी पुरीं प्रवेशला ॥ राज लोकांसी अगम्य जाहाला ॥ या नंतरें राज भोग सरला ॥ दिवो दासाचा पैं ॥३७॥
गणेशें देखिला छिद्र भेद ॥ पाचारूं पाठ विला गोविंद ॥ तो कमळजे सहित परमानंद ॥ आला गरुडेंसीं ॥३८॥
मग मंत्रें उपदे शिला राजा ॥ स्वस्तिकारें स्थापिल्या पृथ्वी प्रजा ॥ राजा वंदिता जाहाला गरुड ध्वजा ॥ शक्ती सहित ॥३९॥
मग वैकुंठ प्राप्त जाहाला त्यासी ॥ मुक्त स्थानीं बैस विलें पूर्व जांसी ॥ पीयू षाहार जाहाला देवस भेसी ॥ पुत्र कलत्रां सहवर्त मान ॥४०॥
या नंतरें मंदरा चळीं हून ॥ काशी मार्ग क्रमी तो पंचा नन ॥ ऐसीं सहस्त्र संवत्सर पूर्ण ॥ राहिला तेथें ॥४१॥
पंच क्रोशी तटीं आला शिव ॥ तेथें तपीं होता केशव ॥ त्यासी सिद्धि समर्पी महा देव ॥ राहिला तेथेंचि पैं ॥४२॥
या नंतरें अग्नि बिंदु ब्राह्मण ॥ त्यासी प्रसन्न जाहाला नारायण ॥ वर दिधला जी संपूर्ण ॥ बिंदु माधव तो ॥४३॥
मग शिव भेटीसी गणेश हरी ॥ आले पंच क्रोशी बाहेरी ॥ त्यांहीं नमस्कारिला त्रिपुरारी ॥ गणेशें विष्णूनें ॥४४॥
मग त्या गणाधी शाची स्तुती ॥ बद्ध पाणीं करी पशु पती ॥ म्हणे तुज म्यां केलें काशी पती ॥ धुंडि राजा ॥४५॥
यानंतरें तो आदि महेश ॥ काशी मध्यें करी प्रवेश ॥ मग भागी रथीमध्यें उमेश ॥ अवलोकी चक्षीं ॥४६॥
तेथें उभा ठाकला विश्वनाथ ॥ तें जाहालें वृषभ ध्वज तीर्थ ॥ या नंतरें विश्वं भर यथार्थ ॥ प्रवे शिले काश मध्यें ॥४७॥
तों उर्जमास प्रतिपदा शुद्ध ॥ भौमदिन क्रमूनि सहबुध ॥ ते दिनीं अनुराधा संपूर्ण सिद्ध ॥ अमृत सिद्ध योग होता ॥४८॥
या नंतरें तो स्मरारी ॥ सर्व देवेंसीं राहे त्रिपुरारी ॥ ती कथा निरूपिली सविस्तरीं ॥ स्वामिनाथा ॥४९॥
तैं दैत्य वधिला गजा सुर ॥ शिवासी प्राप्त जाहालें गजांबर ॥ तेथेंचि लिंग स्थापिलें उमा-हर ॥ तो त्रिलोचनेश्वर पैं ॥५०॥
दुर्वा तीर्थ जाहाले कृत्तिवा सेश्वरीं ॥ तें मज निरूपिलें विस्तरीं ॥ तेथें वायस जाहाले दिव्य शरीरी ॥ विधि वहन राज हंस ॥५१॥
या नंतरें शैले श्वराची कथा ॥ मज निरूपिली स्वामिनाथा ॥ तेथें येणें जाहालें समर्था ॥ शैलेश्वरासी ॥५२॥
तें समूळ निरूपिलें जी शिव सुता ॥ ते कथा किल्बिष दहनीं अपूर्वता ॥ शैलेश्वर स्थापूनि मागुता ॥ स्थापिला रत्नेश्वर ॥५३॥
मग रत्नेश्वराचा इतिहास ॥ तो मज निरूपिला पूर्ण सायास ॥ मणिकर्णिके श्वराची कथा प्रकाश ॥ तेही निरूपिली ॥५४॥
या नंतरें कथा सविस्तर ॥ मज निरूपिला तो वीरेश्वर ॥ तेथें देवांगनालय जाहाला साचार ॥ त्या वीरे श्वरीं ॥५५॥
मग शिव आणि नंदिकेश्वर ॥ तो त्रिविध मूर्ति अवतार ॥ ते समूळ कथा निरूपिली सविस्तर ॥ शिव सुता मज ॥५६॥
या नंतरें कथा जी शिवात्मजा ॥ ब्रह्म याचा सुत तो दक्ष राजा ॥ तेणें निषेधिलें वृषभ ध्वजा ॥ ते कथा निवे दिली मज ॥५७॥
त्या दक्षाची जे मूळ उत्पत्ती ॥ ते मज निरूपिली मयूर पती ॥ तेणें लिंग स्थापिलें अविमुक्तीं ॥ तया नाम दक्षे श्वर ॥५८॥
मग दुर्गा सुराची कथा पूर्ण ॥ तो असुर वधिला भवानीनें जाण ॥ तें समूळ आदि अवसान ॥ कथिलें मज प्रती ॥५९॥
यावरी लिंगें भुक्ति मुक्तिदा यक ॥ तीं मज निरूपिली अनेक ॥ जीं भवानीसी कथी त्र्यंबक ॥ काशी मध्यें ॥६०॥
भागीरथी मध्यें जीं लिंगे असती ॥ तीं साठ सहस्त्र कोटी गणती ॥ तींही सांगीतलीं मयूर पती ॥ मज कारणें पैं ॥६१॥
मज निरूपिलें भविष्य पुराणीं ॥ जैं कुक्कुटें बैसलीं विमानीं ॥ काशी मध्यें मुक्त मंडप स्थानीं ॥ उद्धरिलीं तीं पैं ॥६२॥
तीं पावन होती कैलासीं ॥ अमृत पान करिती शिवस भेसी ॥ तें नाम पडलें मुक्त मंडपासी ॥ कुक्कुट मंडप ऐसें ॥६३॥
मग निरूपिलें दुसरें भविष्य ॥ जें व्यासें निंदिला विरूपाक्ष ॥ तो भवानी शंकर अपरोक्ष ॥ देखिला द्वैत भेदें ॥६४॥
यास्तव व्यासासी बाधलें लांछन ॥ शिव मुखें जाहालें शाप दान ॥ मग तो पावला व्यथा पूर्ण ॥ खंराचे रूपें ॥६५॥
मग तो घातला काशी बाहेरी ॥ त्या दुर्दशा कीटका माझारीं ॥ उत्तर वाहिनीचे पूर्व पारीं ॥ स्थापिलें गंधर्व तीर्थ ॥६६॥
मग कथा निरूपिली साक्षेपा ॥ जे ऋषि कन्या जाहाली धूतपापा ॥ ते अभिलाषिली होती जी सुस्वरूपा ॥ धर्म राज यानें ॥६७॥
ते शापा स्तव जाहाली सरिता ॥ तैसेंचि जाहालें सूर्या चिया सुता ॥ ते कथा निरूपिली संपूर्णता ॥ धर्मे श्वराची पैं ॥६८॥
या नंतरें कथा अपूर्व सार ॥ गया सूर पृष्ठीं ब्रह्म यानें केला अध्वर ॥ तें गया तीर्थ जाहालें गया स्रुर ॥ वधिला जेथें विष्णुनें ॥६९॥
आतां असोत ह्या सर्वही कथा ॥ मज निरूपिल्या जी समर्था ॥ परी तृप्ति नव्हेचि विश्वनाथा ॥ महात्म्या परिसतां पैं ॥७०॥
ते कथा वीरेश्वराची समग्र ॥ कीं ते वेद पुराणांचें कळ साग्र ॥ या त्रैलोक्य मंडळीं काशीनगर ॥ प्राप्त होत भाग्यें पैं ॥७१॥
ऐसें तें संकलित मार्गें सर्व शास्त्र ॥ सर्व वेद पुराणां माजीं पवित्र ॥ अगस्तासी वदे षड्‍वक्र ॥ परियेसीं ग्रंथ माहात्म्य ॥७२॥
समुद्रां माजीं श्रेष्ठता जयाची ॥ स्पर्धा न तुळे कोणी क्षीराब्धीची ॥ शास्त्रां माजीं तैसी या ग्रंथाची ॥ न तुळती स्पर्धा पैं ॥७३॥
पर्वतां माजीं जैसा सुवर्णा चळ ॥ कीं पाताळां माजी तळातळ ॥ तेथें विश्वनाथाचें चरण कमळ ॥ असतें म्हणोनी ॥७४॥
द्वीपां माजीं जैसें जंबुद्वीप जाण ॥ कीं पुराणां माजीं स्कंद पुराण ॥ कीं खंडांमाजीं खंड सगुण ॥ काशीखंड दहावें ॥७५॥
ब्रतां मध्यें व्रत एका दशी ॥ तीर्थांत तीर्थ वाराणसी ॥ ग्रंथां मध्यें सामवे दशाखा जैसी ॥ तैसें काशीखंड हें ॥७६॥
पशूंमाजीं जैसी कामधेनू ॥ कीं रत्नां मध्यें चिंतामणू ॥ वन स्पतीं मध्यें सगुणू ॥ कल्प वृक्ष तो ॥७७॥
अष्टधातूं मध्यें जैसें चौसष्टिक ॥ कीं उदकां मध्यें गंगो दक ॥ कीं दिव्य मण्या मध्यें अमोलिक ॥ कौस्तु भमणी ॥७८॥
कीं दिव्यां गनां मध्यें नृत्य उर्वशीचें ॥ त्यां मध्यें लावण्य़ तिलोत्तमेचें ॥ तैसें ग्रंथा मध्यें सगुणत्व या ग्रंथाचें ॥ ऐहिक पारत्रिक सामर्थ्य ॥७९॥
सरितां माजीं जैसी त्रिवेणी ॥ कीं बृह स्पती जैसा उडुगणीं ॥ कीं दैत्यां माजीं जैसा एक नयनी ॥ भार्गव तो ॥८०॥
गिरीं मध्यें जैसा महागिरी ॥ जेथूनि निघाली गोदावरी ॥ ते त्रिस्थान ससर्थ महा सुंदरी ॥ जाहाली गौतमी ते ॥८१॥
तीं त्रिस्थानें महा गिरी ॥ दुसरें गंगा नाम अब्जकेश्वरीं ॥ तिसरें गंगा - सागर संगमेश्वरीं ॥ पूर्व सागरीं पैं ॥८२॥
यां मध्यें जैसा प्रयाग प्रकाश ॥ कीं देवां मध्यें जैसा अमरेश ॥ कीं वासां मध्यें जैसा निवास ॥ वाराण सीचा ॥८३॥
जैसा काशी मंडळीं पंचा नन ॥ कीं स्वर्गा मध्यें कैलास भुवन ॥ तैसें ग्रंथां माजीं समर्थ पण ॥ या ग्रंथाचें पैं ॥८४॥
या ग्रंथाचें जो उच्चारी नाम ॥ त्यासी नित्य नित्य वंदी तो यम ॥ आणि परा भवे महा कर्म ॥ सहस्त्र जन्मींचें ॥८५॥
ग्रंथ देखिजे चक्षु मंडळीं ॥ मग नमस्कारिजे बद्धा जळीं ॥ तेणें पूजिला सहस्त्र कमळीं ॥ काशी मध्यें विश्वनाथ ॥८६॥
नक्षत्रां मध्यें जैसें स्वातीजळ ॥ वृक्षां माजीं देव द्रुम विशाळ ॥ ते सर्व जनांसी करिती सुफळ ॥ अंबरगर्भीं पैं ॥८७॥
तैसी हे ग्रंथ कथा मंदाकिनी ॥ मृत्यु लोक जनां उद्धरिणी ॥ ग्रंथ नव्हे हा साक्षात शूलपाणी ॥ शंकर बोलिजे ॥८८॥
ग्रंथ श्रवण कीजे बलात्कारीं ॥ तेणें शंकर पूजिला गंगानीरीं ॥ तरी मातृ - पितृपक्षांची वसती पुरी ॥ कैलासीं पैं ॥८९॥
षडानन म्हणे गा अगस्ती ॥ अपार या गंथाची पुण्य शक्ती ॥ उमेसी अनुवा दले पशुपती ॥ तें परियेसीं आतां ॥९०॥
सर्व देवेंसीं सहस्त्र नयन ॥ सर्व ऋषी श्वरेंसीं चतु रानन ॥ लक्ष्मी सहवर्त मान नारायण ॥ इत्यादि ग्रंथ असे जेथें ॥९१॥
सप्त सागर गंगा सरिता पाप भंगा ॥ काशी मध्यें स्थापिलें महा लिंगा ॥ तरी या ग्रंथा चिया प्रसंगा ॥ यत्न कीजे जेणें ॥९२॥
तरणि तारा पती ग्रह मेदिनी ॥ कुला चल मेरु पीर्थीं त्रिभुवनीं ॥ वैकुंठ कैलास ते स्थानी ॥ हा ग्रंथ असे जेथें ॥९३॥
स्वर्ग मृत्यु पाताळ विवरें ॥ जेथें जीं तीर्थीं प्रत्यक्षा कारें ॥ तीं सर्वही वसती ॥ महिमानु सारें ॥ हा ग्रंथ असे जेथें ॥९४॥
हा ग्रंथ नित्य करितां श्रवण पठन ॥ आचार शील एकाग्र मन ॥ तरी श्रोते वक्ते पावन ॥ कैला सपदासी ॥९५॥
या ग्रंथाचे प्रसंग पद टीका ॥ अक्षरें व्यंजनें कान्हे मातृका ॥ तितृकीं युगें त्या कैला सनायका ॥ अत्यंत प्रिय होय ॥९६॥
हा ग्रंथ प्रिय ज्या श्रींमंतांसी ॥ अल्प दिन श्रवण - पठनासी ॥ जाणावे ते कैला सवासी ॥ शिवाचे सखे ॥९७॥
हा अध्याय एक चित्तें श्रवण - पठनें ॥ महाराष्ट्र केलीं वेद पुराणें ॥ द्वादश ज्योति र्लिंग पूजनें ॥ केलीं मणिकर्णि काजळें ॥९८॥
स्वामी म्हणे गा ऋषि अगस्ती ॥ या ग्रंथाची किती सांगूं फल श्रुती ॥ साक्षात वसे उमा - पशुपती ॥ हा ग्रंथ जेथें ॥९९॥
अगस्तीसी वदे षडानन ॥ या ग्रंथा नमस्कारी जो मस्तक तुकोन ॥ तरी तेणें डोलविलें त्रिभुवन ॥ नक्षत्रां सहित ॥१००॥
अगस्तीसी वदे षडानन ॥ परियेसीं या ग्रंथाचें पवित्र पण ॥ या ग्रंथ वेधें सुगुण ॥ कवण कवणांसी ॥१०१॥
जैसा वनपस्तीं मध्यें मलयागिर ॥ आपणां सारिखे करी सर्वही तरुवर ॥ कीं जैसा व्योमीं असतां शीत कर ॥ तो वेध पद्मिनीसी ॥१०२॥
म्हणोनि पवित्र ते लोक सकळ ॥ तो देश पवित्र भूपाळ ॥ तें नगर पवित्र सर्व काळ ॥ हा ग्रंथ असे ज्या देशीं ॥१०३॥
ज्या नगरीं सन्मान होत या ग्रंथा ॥ त्या नगरीची पराभवे विघ्न व्यथा ॥ तें नगर उद्धरे यमपंथा ॥ वंचिती सर्व जन ॥१०४॥
स्वामी म्हणे अगस्ती अवधारीं ॥ आतां किती सांगों शिणली वैखरी ॥ साक्ष तें नगर शिव पुरी ॥ हा ग्रंथ श्रवण पठन जेथें ॥१०५॥
हें सत्य गा कथिलें त्रिनेत्रें ॥ मज न सांगवे षड्‍वक्रें ॥ जें बहु श्रुत त्यांचीं मनःश्रोत्रें ॥ अतृप्त परि सितां ॥१०६॥
तरी ईश्वर वाक्य अगाध ॥ शिवें निरूपिलें अनादि सिद्ध ॥ शिव दाक्षा यणींचा प्रति बोध ॥ प्रश्निला अगस्तीनें ॥१०७॥
तो स्वामीनें निरूपिला सवि स्तर ॥ शांत जाहाला ऋषीचा अंगार ॥ तेंचि वदला व्यास ऋषी श्वर ॥ वैशं पायन शुक्रा प्रती ॥१०८॥
तो व्यास सत्यव तीचा सुत ॥ शत कीर्ति परा शरोरत जात ॥ अष्टा दश पुराणें कथीत ॥ शिष्यां प्रती पैं ॥१०९॥
दुर्बळासी काशी करण्याचें आर्त ॥ त्यासी द्र्व्य देऊनि पाठवी समर्थ ॥ तरी त्यासी पुण्य जोडे सत्यार्थ ॥ काशी यात्रा दश एक ॥११०॥
काशी मार्गीं जाणा रांसी पट्ट्कूलादि वस्त्रें ॥ द्र्व्य पाटाव आदि शूद्ध मनो मात्रें ॥ तरी पंच क्रोशी प्रासादाग्रीं छत्रें ॥ आणि पताका उभ विल्या तेणें ॥१११॥
काशी करां आज्ञा दीजे स्नानाची ॥ शिवासी प्रणामें सांगिजे आमुचीं ॥ तरी त्यासी पुण्य घडे सत्यची ॥ काशी यात्रेचें ॥११२॥
ऐसें व्यासें कथिलें शिष्यां प्रती ॥ ते महा आनंदें धरिती चित्तीं ॥ अरे हा ग्रंथ परिसावा पुढत पुढती ॥ पुण्य स्वार्था स्तव ॥११३॥
संस्कृत बोलिजे जैसी मांदुसा ॥ शास्त्रें गुण रत्नें भरिलिं परियेसा ॥ तीं भेदा वया भाषा ॥ महाराष्ट्र असे कीं ॥११४॥
हेंही स्मरलें गौप्य बोलणें ॥ बहुत श्रुत नेणती आरु षजनें ॥ तरी संस्कृताची मांदुस उघडणें ॥ महाराष्ट्र किल्ली करूनि ॥११५॥
म्हणोनि पवित्र महाराष्ट्र भाषा ॥ सर्व काळ व्यक्तचि असे व्यवसा ॥ जैसी सूर्य विध्वंसी निशा ॥ मग सर्वही दिसे ॥११६॥
तैसें महाराष्ट्रें विण जें कथन ॥ तें सर्व जनां अव्यक्त देखण ॥ म्हणोनि महाराष्ट्र तें साक्षात दिन ॥ विध्वंसी संस्कृत निशा ॥११७॥
आतां असो हे भाषा युक्त ॥ श्रोते सर्वज्ञ जाणती बहु श्रुत ॥ तरी आणिक एक द्दष्टांत ॥ परिसा आतां ॥११८॥
ऐसी जाणिजे संस्कृत भाषा ॥ जैसीं नक्षत्रें लोपती दिवसा ॥ नातरी महाराष्ट्र तेचि निशा ॥ तेव्हां नक्षत्र बिंबे दिसती ॥११९॥
श्रोते हो ऐसेंही घदे प्रमाण ॥ हें शास्त्रीं अनुवा दले ऋषि जन ॥ तो कर्ता कर विता पंचा नन ॥ सकळ साक्षी ॥१२०॥
तो कर विता पंचा नन महा द्‍भुत ॥ शुभ गुणांसी मी असें प्राप्त ॥ विश्वनाथाचे उपा सनीं सतत ॥ शिवा ज्ञेंचि असावें ॥१२१॥
म्हणोनि त्या मनोरंगें आज्ञा पिलें ॥ माण केश्वर मुद्नलें मज संस्कृत कथिलें ॥ मग म्यां महाराष्ट्र आरंभिलें ॥ जनांचे उपकारा स्तव ॥१२२॥
तरी व्यासऋषि वदलासे अपार ॥ तितुकें सांगतां होईल बहु पसर ॥ म्हणोनि संकलित सांगतसें विचार ॥ श्रोतयांलागीं ॥१२३॥
तरी ग्रंथ माहात्म्य निरूपण ॥ पुनरपि ऐका सावधान ॥ ज्या ग्रंथीं पार्वतीरमण ॥ साक्षात वसे ॥१२४॥
तरी हे काशीखंड कथा श्रवण ॥ जो करी श्रवण पठन ॥ त्या चिया पुण्यासी त्रिनयन ॥ मस्तक डोलवी ॥१२५॥
मज न वर्णवे जी महिमा अपार ॥ ज्या ग्रंथा पाशीं हरि विरिंचि ऋषी श्वर ॥ गणेश सहवर्त मान ॥ कर्पूर गौर ॥ वसे नित्य पैं ॥१२६॥
हा ग्रंथ ज्या देशीं असे पूर्ण ॥ त्या देशीं दुःख कैंचें दैन्य ॥ परी भावें कीजे श्रवण ॥ श्रद्धा युक्त पैं ॥१२७॥
श्रद्धा युद्ध करितां याचें श्रवण ॥ त्यासी घडे ग्रहणीं कोटि गोदान पुण्य ॥ आणि शत भार सुवर्ण दान ॥ घडे प्रयागीं विप्रांसी ॥१२८॥
ऐकतां न ये बधिर कर्ण ॥ वदतां न ये मुकें वदन ॥ तरी तेणें अक्षय द्वय ह्रदयीं पूर्ण ॥ धरिजे भावें पैं ॥१२९॥
तरी त्यासी त्रिकाळ मणिकर्णिका स्नान ॥ द्वादश ज्योति र्लिंगीं घडे स्नपन ॥ कोटइ एक ब्राह्मण भोजन ॥ प्रयागीं केल्याचें फळ होय ॥१३०॥
या ग्रंथाची जया आवड ॥ तो शंकराचा लळिवाड ॥ तो यमगणांचें ठेंची तोंड ॥ काशीखंड जया पाशीं ॥१३१॥
ज्या गृहीं काशीखंड कथा श्रवण ॥ त्यासी यमराव घाली लोटां गण ॥ इंद्रा सहवर्त मान देव गण ॥ येती शरण ग्रंथासी ॥१३२॥
अरे हा ग्रंथ नव्हे गौरी रमण ॥ ज्याचे श्रवणें आकल्प दोष दहन ॥ आणि इच्छिली वांच्छा पूर्ण ॥ करीतसे ग्रंथ मिषें ॥१३३॥
जो नित्य करी ग्रंथ पठण ॥ आणि श्रोताही परिसे सावधान ॥ तरी शिव म्हणे स्वमुखें आपण ॥ न कळे महिमा त्याचा पैं ॥१३४॥
तरी तोचि सकळ तीर्थी न्हाला ॥ तोचि तपें तपिन्नला ॥ तेणेंचि अष्टांग योग अभ्या सिला ॥ ग्रंठपठ नावरी ॥१३५॥
तेणेंचि केला काशी वास ॥ कल्प पर्यंत पूजिला महेश ॥ अंतीं कैला सपदीं वास ॥ महा कल्प पर्यंत ॥१३६॥
सकळही धर्म तोचि आचरला ॥ सहस्त्र वेळां सेतुबंध केला ॥ लक्ष वेळां दक्षिण तीर्थें त्याला ॥ घडलीं जाणावें ॥१३७॥
शत वेळां गंगा प्रदक्षिणा ॥ सिंहस्थीं घड लिया पूर्णा ॥ कीं कोटि एक व्रत बंधनां ॥ केलें विप्रांचिया ॥१३८॥
कीं कन्या गतीं सहस्त्र कन्या दान ॥ अवि मुक्तीसी घडलीं तया लागून ॥ कीं अनाथांचीं लक्ष एक लग्नें जाणा ॥ केलियाचें पुण्य प्राप्त ॥१३९॥
स्वामी म्हणे अगस्ती प्रती ॥ किती सांगों पुढत पुढती ॥ शेषासी न वर्णवे त्याची स्थिती ॥ सहस्त्र वदनीं ॥१४०॥
म्हणोनि या ग्रंथाचा महिमा अपार ॥ वर्णितां श्रमे सहस्त्र कर ॥ त्या पाशीं तिष्ठे विरिंचि हर ॥ सदा सर्वदा ॥१४१॥
तोचि योगि यांचा मुकुट मणि ॥ तोचि तपियां  माजीं अग्र गणी ॥ तोचि सिद्धांचा सिद्ध मुनी ॥ सकळां वरिष्ठ ॥१४२॥
या ग्रंथाचा संग्रह जेणें केला ॥ तेंव्हांचि तो मुक्ति पदासी गेला ॥ जे जे इच्छा करी ते ते त्याला ॥ देतसे तो शिवा स्वामी ॥१४३॥
हा ग्रंथ जो परिसे आवडी करून ॥ त्याचा कुष्ठ जाय न लागतां क्षण ॥ ब्रह्मह त्यादि दोष दहन ॥ होती निमिषार्धें ॥१४४॥
पंरतु भावें कीजे जी श्रवण ॥ तैसेंचि आचरे जो आचरण ॥ तरी त्यापा सोनि त्रिनयन ॥ क्षण एक परता नव्हे ॥१४५॥
त्यासी तीर्थांची नाहीं चाड ॥ व्रतां चेंही न लगे कोड ॥ वेद शास्त्रेंही अखंड ॥ न लगती पढावीं ॥१४६॥
ज्यापासीं ग्रंथ मार्ग स्थानीं ॥ तरी त्याच्या मागें पुढें चाले शूलपाणी ॥ अटवी स्थळीं रक्षी तया लागोनी ॥ शक्ती सहवर्त मान गणेश ॥१४७॥
त्यासी कांहीं संकट पड भारी ॥ तरी शिव निजांगें निवारी ॥ ऐसी य ग्रंथाची थोरी ॥ काय सांगों पैं ॥१४८॥
अरे भावचि धरोनि चित्तीं ॥ ग्रंथ परिसा पुढत पुढतीं ॥ तरी तेणें तारिलें वसु मतीं ॥ जडजीव जितुके ॥१४९॥
त्यासी तप साधनेंही नलगती करावीं ॥ तीर्था दिकेंही नलगे फिरावीं ॥ जेथें पडेल तेथें सर्वही ॥ प्राप्त असे तयासी ॥१५०॥
जीं जीं योगा दिक साधनें ॥ जीं जीं तप अनुष्ठानें ॥ जीं जीं धर्मा दिक दानें ॥ तीं तीं प्राप्त तयासी ॥१५१॥
तया सीचि सकळ धर्म घडला ॥ तेणेंचि सकळ योग अभ्या सिला ॥ तेणेंचि काशी वास केला ॥ कल्प पर्यंत ॥१५२॥
तेणेंचि कोटि लिंगें पूजिलीं ॥ तेणेंचि धूम्र पानें साधिलीं ॥ तेणेंचि प्रासादें बांधिलीं ॥ लक्ष एक ईश्वराचीं ॥१५३॥
तेणें कोटि लिंगें आवर्तन ॥ पुण्य स्थळीं केलें निर्माण ॥ कीं दश कोटि ब्राह्मण भोजन ॥ केलें तैणेंचि ॥१५४॥
तेणें द्वाद शलिंगां नंदा दीप ॥ निश्चित लाविले जी सदो दित ॥ कोटि रुद्र अभिषिं चित ॥ केले तेणेंचि ॥१५५॥
त्या सीचि वेद पठ नाचें पुण्य ॥ त्यासी शिव शास्त्राचें महिमान ॥ अष्टादश पुराणांचें श्रवण पूर्ण ॥ घडलें तयासी ॥१५६॥
काशीखंड चार अक्षरें ॥ कोणी जप जो करी निधारें ॥ त्यासी वंदिजे यम किंकरें ॥ सदा सर्व काळ ॥१५७॥
त्या सीचि पृथ्वी प्रदक्षिणा घडली ॥ त्या सीचि सप्त समुद्रीं आंघोळी ॥ तया पाशीं चंद्र मौळी ॥ शकी सहवर्त मान गणेश ॥१५८॥
त्या सीचि त्रिकाळ मूर्तीचें दर्शन ॥ सकळ तीर्थीं घडलें स्नान ॥ सकळ ऋषींसी नित्य भोजन ॥ घडे भाव धरि लिया ॥१५९॥
सकळ मंत्रांचा मुकुट मणी ॥ चार अक्षरें जपे जो कोणी ॥ सकळही सामर्थ्य तयाला गुनी ॥ होईल भाव धरि लिया ॥१६०॥
काशी क्षेत्राचा जैसा महिमा ॥ याहूनि द्विगुण ग्रंथ राज उपमा ॥ हें सत्य सत्य शिव-उमा ॥ अनुवा दिलीं असती ॥१६१॥
हें नव्हें कर्वाचें मत ॥ साक्षात बोलिला विश्वनाथ ॥ जो ग्रंथ माहात्म्य वर्णील असत्य ॥ त्याची जिव्हा झडेल ॥१६२॥
भावें परिसितां भुक्ति मुक्ती ॥ असत्य म्हणतां नरक प्राप्ती ॥ ज्या ग्रंथीं वक्ता पशु पती ॥ त्याचा महिमा कोण वर्णी ॥१६३॥
या ग्रंथासी भावें जो करी नमस्कार ॥ त्याचे सहस्त्र जन्म दोषांचा होय संहार ॥ आणि संकल्पीं चिंती जें जें नर ॥ तें तें तयासी प्राप्त होय ॥१६४॥
जो त्रिकाळ करी ग्रंथ दर्शन ॥ पूजा करूनि जो वंदी नरनारीजन ॥ तोचि जीवन्मुक्त पावन ॥ सकळांही वरिष्ठ ॥१६५॥
सकळ ऋषीं हूनि वरिष्ठ ॥ सकळ देवां परीस श्रेष्ठ ॥ सकळ गणां माजी स्पष्ट ॥ आवडे शिवातें ॥१६६॥
त्यासी आधींचि कैलासीं ठाव ॥ शिवें केला स्वयमेव ॥ ऐसा भावाचा भोक्ता देव ॥ न म्हणे उंच नीच ॥१६७॥
पहा एक बेलपत्रासाठीं ॥ मृग-भिल्लां स्थापिलें गगन पुटीं ॥ ऐसा उदार धूर्जटी ॥ भक्त वत्सल तो ॥१६८॥
उगोंचि मुखीं शिव नाम जपतां ॥ त्यासी ब्रह्मा दिक शरण येती तत्त्वतां ॥ तीर्थें मागती चरण तीर्था ॥ आम्ही पुनीत त्या चेनि ॥१६९॥
सकळ पापांसी तीर्थ दूर करी ॥ तीर्था चेही दोष भक्त निवारी ॥ भक्त महिमा अगम्य लहरी ॥ कोणा वर्णवेल पैं ॥१७०॥
ऐसा नामस्मरणाचा महिमा ॥ या ग्रंथासी काय देऊं उपमा ॥ ज्या ग्रंथीं साक्षात शिव-उमा ॥ अहर्निशीं वसताती ॥१७१॥
ग्रंथासी उपमा दीजे ऐसी ॥ भूमंडळीं कवण वस्तु असे साम्यासी ॥ ग्रंथ उपमा द्याव यासी ॥ नसे त्रैलोक्य मंडळीं ॥१७२॥
अरे ज्या ग्रंथीं जाश्वनीळ ॥ जयासी त्रिभुवन ज्ञान सकळ ॥ म्हणोनि चित्त करोनियां निर्मळ ॥ ग्रंथ पढावा नित्य नित्य ॥१७३॥
संस्कृत भाषा अपार ॥ बोलि लासे व्यास मुनीश्वर ॥ तितुका वदलों नाहीं प्रत्युत्तर पसर ॥ ग्रंथ अपार वाढेल ॥१७४॥
यालागीं संकलित निरू पण ॥ केलें श्रोतयां लागून ॥ या ग्रंथीं ठेवा मन ॥ आकल्प दोष दहनीं ॥१७५॥
जितुकें कांहीं विश्वेश्वराचें ध्यान ॥ तितुकेंही ग्रंथा पाशीं निरूपण ॥ यास्तव ग्रंथ वंदन ॥ करा अति आदरेंसीं ॥१७६॥
आणि शिव म्हणे पार्वती प्रती ॥ गुह्य गुप्त केलेंसे वेदांतीं ॥ तें उघडोनियां तुज प्रती ॥ न सांगेंचि मी ॥१७७॥
कीं पुढें योग होईल नष्ट ॥ तीर्थांची खुंटेल वाट ॥ अधर्माची फुटेल पहांट ॥ यालागीं न वदें तुज ॥१७८॥
तंव गौरी वदे शिवा प्रती ॥ तें मज निरूपावें यथानि गुतीं ॥ मज श्रवणाची बहुत प्रीती ॥ सांगा स्वामी ॥१७९॥
तंव शिव म्हने उमे प्रती ॥ माझी आज्ञा वेदां प्रती ॥ जे म्यां गौप्य करवि लीसे स्थिती ॥ काशीखंडाची ॥१८०॥
ते प्रकट करूं नये वो जाण ॥ हें गुह्य मत वेदांचें संपूर्ण ॥ हें गुप्त मत आपण ॥ प्रकट सर्वथा न कीजे ॥१८१॥
तंव उमा वदे आनंद कंदा ॥ मज संकलितचि निवेदा ॥ येथें दुजा कोणी परमा नंदा ॥ न करी श्रवण ॥१८२॥
मग शिव वदे पार्वती प्रती ॥ श्रुत न करावें कवणा प्रती ॥ कांहीं किंचित तुजप्रती ॥ श्रवण करवूं ॥१८३॥
तरी या ग्रंथाचें श्रवण-पठन महिमान ॥ एक वेळां सांगों तुज लागून ॥ चित्त एकाग्र करूनि श्रवण ॥ कीजे गिरिजे ॥१८४॥
जे पृथ्वी तळीं दोषी जन ॥ करिती वेश्या गमन सुरापान ॥ कन्या विक्रय करून ॥ उदर भरिती ॥१८५॥
जे पर गृहीं अग्नि लाविती ॥ जे परनिंदा अखंड करिती ॥ जे संतांसी अखंड निंदिती ॥ वादी होती तत्पर ॥१८६॥
जे माता-पितरांसी चरणें हाणिती ॥ जे धान्य कुंभासी अग्नि लाविती ॥ जे फळित वृक्षां तोडिती ॥ आग्र कर्दळी आदि अनेक ॥१८७॥
जे पर्वतीं अग्नि लाविती ॥ नांदतें घर बुडविती ॥ जे लक्षा नुलक्ष ब्रह्म घात करिती ॥ जयांचा आचार अमंगल ॥१८८॥
जो विधवा गमनीं तत्पर ॥ जो चाहादी करूनि भरी उदर ॥ जो कन्या गमनी असे नर ॥ सर्वदा पैं ॥१८९॥
जो असत्य गोष्टी वदे सभेसी ॥ खर्‍याचें खोटें करी पंचाइ तीसीं ॥ जो लांच घेऊनि दुजियासी ॥ बुडवी समूळ ॥१९०॥
निरपराधें हत्या करी ॥ जो गाईसी चरतां जीवें मारी ॥ जो स्त्रीहत्येची आशंका न धरी ॥ मनांत कांहीं ॥१९१॥
गोत्र हत्या ज्याचे शिरीं ॥ असती कां सह्स्त्र संवत्सरवरी ॥ बाळ हत्येची गणना तरी ॥ नसे जयासी ॥१९२॥
जे कन्या विक्रय गोवि क्रय करिती ॥ मिथ्या अनाथसीं बंदीं घालिती ॥ जे रात्रीं येऊनि खणती घेती ॥ व्यर्थ छेदिती तस्कर ॥१९३॥
जे अभक्ष्य भक्षण करिती ॥ जे असंगांचा संग धरिती ॥ जे अन्य यातीसी ऋतु देती ॥ कामातुर ॥१९४॥
जे भगिनीसी रति मागती ॥ नेदीं म्हणतां बलात्कार करिती ॥ तिचें वचन अमान्य मानिती ॥ माता अभिलाषिती पाणी नर ॥१९५॥
जे द्रव्यासाठीं पित्यासी वधिती ॥ बंधु गोत्र जांसी विष देती ॥ अल्पासाठीं घात करिती ॥ ते पापी नर ॥१९६॥
जे नाना पशूंची हत्या करिती ॥ जे यात्रा कर्त्यांसी मार्गीं वधिती ॥ जे अनाचारें सदा वर्तती ॥ आचार भ्रष्त ॥१९७॥
जे स्वामीचा विश्वा सधात करिती ॥ जे गुरुवचन अमान्य मानिती ॥ जे सत्पात्राची निंदा करिती ॥ सर्व काळ ॥१९८॥
जो तीर्थीं करी दलाली ॥ डोळा चुक वूनि वस्त्र-पात्र उचली ॥ आणि आपणचि तळमळी ॥ काय जाहालें म्हणोनी ॥१९९॥
जे वतन भूमिका हिरोनि घेती ॥ बळ केलिया जीवें मारिती ॥ पात्रापात्र न विचारिती ॥ जे महा अधम ॥२००॥
जे परस्त्रि यांसी बळें हरिती ॥ कुलां गनेसी दास्य देती ॥ उत्तम मघ्यम न विचारिती ॥ मागती रति सर्व त्रांसी ॥२०१॥
जे ब्राह्मणांचीं लग्नें मोडिती ॥ गत भ्रतार कन्येसी वर नेमिती ॥ विप्र असोनि ऐसीं कर्में करिती ॥ त्यांचा भार भूमि न साहे ॥२०२॥
वधोनियां निद्रिताला ॥ म्हणती आमुचा अभिमान सिद्धीस गेला ॥ ऐसिया पापी नराला ॥ निर्गति नाहीं ॥२०३॥
महातीर्थीं अनाचारें वर्तती ॥ करूं नये तेंचि करिती ॥ शेवटीं देव तीर्थां सीही निंदिती ॥ पापी नर ॥२०४॥
ऐसे पापी नर सांगतां ॥ संवत्सर एक लागेल हिहितां ॥ तरी दोषी न सरती सर्वथा ॥ सांगतां उमे ॥२०५॥
होत कां पंच महा दोषी जन ॥ गोहत्यारे ब्रह्म घातकी जाण ॥ महा पातकी कृतन्घ ॥ असोत कां भलतैसे ॥२०६॥
ऐसीं पातकें जयाचे शिरीं ॥ ज्यासी निर्गति नाहीं चंद्रा र्कवरी ॥ ब्रह्मा विष्णु न अंगीकारी ॥ तया पातकि यासी ॥२०७॥
तीर्थांचें न चले कांहीं ॥ प्रायश्र्चित्त तरी बोलि लेंचि नाहीं ॥ ऐसिया नराची निर्गति पाहीं ॥ असेचि ना वेदशास्त्रीं ॥२०८॥
ऐसे हे जरी पाणी जन ॥ भावें करिती ग्रंथ पठन ॥ तत्काळ दोषी होती दहन ॥ जैसें तृण अग्नि सगें ॥२०९॥
परी केलें कर्म पुन्हां नये करूं ॥ केलें तरी कोणे काळीं न उद्धरे नरू ॥ अनंत युगें तो निर्धारू ॥ नरकचि भोगी ॥२१०॥
इतुकी संख्या जाहा लिया जाण ॥ मग त्यासी योनि कोण कोण ॥ तेंहीं परिसा सावधान ॥ सांगों तुम्हां प्रती ॥२११॥
श्वान सूकर व्याघ्र उरग ॥ अजा कुक्कुट बक काग ॥ बेडूक वृश्चिक सरडग ॥ ऐशा अनेक योनी ॥२१२॥
कल्पानु कल्प पर्यंत ॥ तेचि योनी तयासी प्राप्त ॥ कोणे काळीं नरयोनींत ॥ न ये सर्वथा ॥२१३॥
या कारणें मागील कर्म दूर करून ॥ सद्भावें परिसतां ग्रंथ निरूपण ॥ तरी केलें दोष दहन ॥ तत्काल पैं ॥२१४॥
ऐसा ग्रंथ महिमा अपार ॥ जेथें तिष्ठती इंद्रादि सुरवर ॥ अष्ट दिक्पाळ समग्र ॥ ग्रंथा पाशीं तिष्ठती पैं ॥२१५॥
अठ्ठयायशीं सहस्त्र ऋषी श्वर ॥ शक्ति सहर्व मान वसती निरंतर ॥ यक्ष गण गंधर्व किन्नर समग्र ॥ ग्रंथा पाशीं तिष्ठती ॥२१६॥
सिद्ध साधक सर्व जन ॥ नव निधि अष्ट महा सिद्धी पूर्ण ॥ सोळा सिद्ध नव नाथ नारायण ॥ अहर्निशीं ग्रंथा पासीं ॥२१७॥
विधि हर शक्ति सहवर्त मान ॥ ग्रंथा पासीं क्रीडती पूर्ण ॥ ज्या ज्या पतिव्रता आपण ॥ ग्रंथ दर्शन इच्छिती ॥२१८॥
ना तरी गा पन्नग दैत्य दानव ॥ देखोनि येती ग्रंथ वभैव ॥ तीर्थ राज तरी सह स्वयमेव ॥ असती या ग्रंथीं ॥२१९॥
साक्षात शिवचि आपण ॥ शक्ति सहवर्त मान ग्रंथीं जाण ॥ मागें पुढें शिव गण ॥ इच्छिती दर्शन ग्रंथाचें ॥२२०॥
हरिहर उपा सनिक नारी नर ॥ ग्रंथीं तिष्ठती अष्टही प्रहर ॥ चंद्र-सूर्यादि घटिकाकर ॥ सर्व काळ तिष्ठती ॥२२१॥
ग्रंथा पासीं देव शिवा सहवर्त मान ॥ निरंतर असती पैं आपण ॥ यास्तव ग्रंथाचें वंदन ॥ करावें स्वहितार्थ ॥२२२॥
जें जें सांगितले ग्रंथा प्रती ॥ तितुक्या सही नमस्कार पावती ॥ सकळ दर्शनांची प्राप्ती ॥ ग्रंथा वंदी तया घडे ॥२२३॥
हा साक्षात शिव-भवानी संवाद ॥ जे वदला अनादि सिद्ध ॥ आगम धुंडोनियां स्वयें बोध ॥ केला पार्वती प्रती ॥२२४॥
शिव वदला भवानी प्रती ॥ इकडे व्यास सांगें वैशं पायना निगुतीं ॥ तेंचि स्वामी निरूपी अगस्ती प्रप्ती ॥ संकलित भावें ॥२२५॥
या कारणें ग्रंथ वंदिजे नित्य नित्य ॥ पठन कीजे भाव संयुक्त ॥ तरी दोष जाऊनि कैलास प्राप्त ॥ तया नरासी पैं ॥२२६॥
छळवादी नष्ट दुर्जन ॥ या ग्रंथासी ठेवीतील दूषण ॥ तत्काळ कुष्ठ रोगी होतील जाण ॥ हे सत्य आज्ञा शिवाची ॥२२७॥
ग्रंथ न दीजे महानष्टासी ॥ ग्रंथ न दीजे मतवा दियांसी ॥ ग्रंथ न दीजे महा दुष्टांसी ॥ शिवाज्ञा ऐसी असे ॥२२८॥
ग्रंथ न दीजे निगुर्‍यासी ॥ ग्रंथ न दीजे खळासी ॥ ग्रंथ न दीजे अविश्वा सियासी ॥ शिवाची आज्ञा असे ॥२२९॥
तेथें शिव-भवानीवदना मृत ॥ पूर्व सुकृतें होय प्राप्त ॥ नष्टासी येथींचा द्दष्टांत ॥ कल्पां तींही नव्हेचि ॥२३०॥
आका शासी काजळ लावितां ॥ लावी त्याचे माखे हाता ॥ तैर्वीं ग्रंथासी शब्द ठेवितां ॥ बोले तोचि दोषी होय ॥२३१॥
हें शिव-पार्वतींचें गुह्य ज्ञान ॥ धर्म शास्त्र कथा निरूपण ॥ सकळ आगमांचें सार पूर्ण ॥ शिवें निरूपिलें भवानीसी ॥२३२॥
हे कथा सकळ वेदांचें सार ॥ सकळ शास्त्रांचें सार निज जिव्हार ॥ सकळ पुराणांचें गुण गांभीर्य ॥ काशीखंड कथा ॥२३३॥
सकळ तीर्थांचें माहेर ॥ सकळ योगि यांचा योग सागर ॥ सकळ तपांचें तपै श्वर्य थोर ॥ काशीखंड कथा हे ॥२३४॥
यास्तव ग्रंथ कीजे नित्य श्रवण ॥ ग्रंथा पासीं पंचानन ॥ इच्छिलें फळ देतसे जाण ॥ मना आवडे जें जें ॥२३५॥
काशीखंड कथा निधान ॥ आवडीं करावें श्रवण ॥ कल्प दोषां होय दहन ॥ एक श्लोक परिसतां ॥२३६॥
मज न वर्णवे ग्रंथ महिमान ॥ ब्रह्मा दिकां अतर्क्य जाण ॥ शेष श्रमला जी आपण ॥ महिमा गहन ग्रंथाचा ॥२३७॥
ग्रंथा भिमानी पंचानन ॥ इच्छा फल देतसे पूर्ण ॥ अंतीं कैला सपद पावन ॥ देतसे शिव स्वामी ॥२३८॥
स्वामी म्हणे अगस्ती प्रती ॥ ग्रंथ माहात्म्य निरूपिलें तुज प्रती ॥ तुजही प्राप्त होईल अविमुक्ती ॥ एकुण तिसावे द्वापारीं ॥२३९॥
तंववरी क्रमिजे या प्रांतासी ॥ काशीखंड कथा धरोनि मानसीं ॥ तूं पावसी अविमुक्तीसी ॥ निश्चयेंसीं पैं ॥२४०॥
ग्रंथ माहात्म्या जाहालें संपूर्ण ॥ यापुढें ग्रंथ फलश्रुती तों केवळ दीन ॥ तरी संकलितचि करूं श्रवण ॥ फल श्रुति पैं ॥२४१॥
हा अध्याय जो करील श्रवण ॥ प्रयागीं सहस्त्र वरुषें घडे माघ स्नान ॥ गयेसी घडे गया वर्जन ॥ सहस्त्र एक ॥२४२॥
तयासी काशी वास शत जन्म पर्यंत ॥ कीं सह्स्त्र कमळीं नित्य पूजी उमाकांत ॥ कीं ग्रहणीं कोटिधेनू सालं कृत ॥ अर्पिल्या ऋषि वृंदांसी ॥२४३॥
कीं शत भार सुवर्ण दान ॥ रवि ग्रहणीं अर्पी द्विजां कारण ॥ द्वादश यात्रा सेतु बंधन ॥ झाल्या तयासी ॥२४४॥
निर्धनासी धन प्रप्ती ॥ अपुत्रि कांसी होय पुत्र संतती ॥ वांझेसी होय फल प्राप्ती ॥ या अध्यायाचे श्रवणें ॥२४५॥
अरे कोडियांचीं कोडें जातीं ॥ समंधादि पीडा हरती ॥ सकळ विघ्नें परा भवती ॥ अध्याय श्रवणें ॥२४६॥
बंदीं पडला होय मुक्त ॥ चिंतिलें पाविजे आर्त ॥ ग्रह पीडादि समस्त ॥ न बाधिती तयासी ॥२४७॥
विघ्नाचें होय निर्विघ्न ॥ आकल्प पापें होती दहन ॥ ज्ञान इच्छी तरी संपूर्ण ॥ योगिराजचि होय पैं ॥२४८॥
जरी इच्छिती शिव दर्शन ॥ तरी साक्षात ग्रंथचि पंचानन ॥ निर्गुणरूपें आपण ॥ ग्रंथचि असे ॥२४९॥
भुक्ति इच्छी तरी दरिद्रहरण ॥ मुक्ति इच्छी तरी कैला सपद पावन ॥ सेवा म्हणूं तरी ग्रंथचि आपण ॥ त्रिकाळ वंदिजे ॥२५०॥
हा अध्याय श्रवण करिती ॥ त्यांसी घडे अवि मुक्ती ॥ आणि चिंतिला पदार्थ पावती ॥ अध्याय श्रवणें ॥२५१॥
क्या अध्यायाची फलश्रुती सांगतां ॥ न वर्णवे जी ब्रह्मा दिकां तत्त्वतां ॥ शेष श्रमला गुण वर्णितां ॥ शिव स्वामीचे ॥२५२॥
तेथें मी मति मंद केवळ दीन ॥ काय वदूं जी शिवाचे गुण ॥ जया ग्रंथीं त्रिनयन ॥ अखंड वसे पैं ॥२५३॥
अध्याय फल श्रुतीचें निरूपण ॥ संकलित केलें श्रोतयां लागून ॥ स्वहितार्थ करा श्रवण ॥ महा पातकें नासती ॥२५४॥
आतां फल श्रुति सांगाव यासी ॥ ऐसें सामर्थ्य असे कवणासी ॥ स्वामी म्हणे अगस्ति ऋषी ॥ न बोलवे षड्‍वक्रें ॥२५५॥
काय सांगों ग्रंथ महिमान ॥ ज्या ग्रंथीं ऋषी देव त्रिनयन ॥ शक्रा सहवर्त मान जाण ॥ सर्व काळ तिष्ठती ॥२५६॥
तरी ऐसी या ग्रंथाची फल श्रुती ॥ काय सांगो श्रोतयां प्रती ॥ ब्रह्मा दिदेवां अगम्य स्थिती ॥ ते फल श्रुती वदावी ॥२५७॥
तंव अगस्ति म्हणे स्वामिनाथा ॥ तुम्ही वदलोते यथार्था ॥ न कळे काशीखंड महिमता ॥ मज तत्त्वतां कळों सरली ॥२५८॥
परी एक असे जी विचार ॥ ज्या ग्रंथीं वक्ता शंकर ॥ श्रोत्री तरी पार्वती ऐसी चतुर ॥ काशीखंड ग्रंथीं ॥२५९॥
तें श्रवण तुम्हां जाहालें सकळही ॥ तरी संकलित मार्गें सांगा कांहीं ॥ श्रवण करा वया इच्छा पाहीं ॥ उद्भवली थोर ॥२६०॥
स्वामी दीनावरी कृपा करून ॥ मज करा पां कथा श्रवण ॥ ऐकावया भुकेलें मन ॥ अधिकाधिक ॥२६१॥
तों स्वामी म्हणे अगस्ति मुनी ॥ फल श्रुती न वदवे मज वदनीं ॥ ऐसें सामर्थ्य कोणा लागुनी ॥ ग्रंथ फल श्रुतीचें ॥२६२॥
या ग्रंथाचा महिमा गहन ॥ सांगे ऐसा असे कोण ॥ वदे विरिंचि नारायण ॥ न कळे महिमान ग्रंथाचें ॥२६३॥
मग अगस्ती म्हणे स्वामी प्रती ॥ तूं केवळ ज्ञान मूर्ती ॥ किंचित किंचित मज प्रती ॥ निरूपा ग्रंथ महिमान ॥२६४॥
तंव स्वामी वदे अगस्ती प्रती ॥ अपार या ग्रंथाची फल श्रुती ॥ बोलतां श्रमल्या वेद स्मृती ॥ तेथें तुज प्रती मी काय सांगों ॥२६५॥
आतां संकलिताचेंही किंचित ॥ ऐक एकाग्र करोनि चित्त ॥ तुज निरोपूं इत्थं भूत ॥ किंचित किंचित ऐकें पां ॥२६६॥
जो ग्रंथ करील श्रवण पठन ॥ जो ग्रंथ करी त्रिकाळ वंदन ॥ ज्यासी अखंड शिव स्मरण ॥ त्यापासीं त्रिनयन सर्वदा ॥२६७॥
त्यापासूनि अर्धक्षण ॥ परता नव्हेचि त्रिनयन ॥ त्याचें जड भारी निवारून ॥ अंतीं पद पावणें कैलासीं ॥२६८॥
जो नित्य वाची ग्रंथ ओळी ॥ जो त्रिकाळ ग्रंथ द्दष्टीं न्याहाळी ॥ त्याज पासोनि चंद्र मौळी ॥ अणु मात्र परता नव्हे ॥२६९॥
हा ग्रंथ जो पढे नर ॥ त्या चिया पुण्यासी नाहीं पार ॥ तोचि सकळ योगा भ्यासी नर ॥ सकळां वरिष्ठ ॥२७०॥
त्यासी न लगे धूम्रपान साधन ॥ त्यासी न लगे वेद पठन ॥ त्यासी न लगे शास्त्र श्रवण ॥ तप साधन न लगे त्यासी ॥२७१॥
त्यसी जावें न लगे एकांतीम ॥ त्यासी पाहाणें न लगे आत्म स्थिती ॥ त्यासी आसन मुद्राही न लगती ॥ एका भक्ती वांचूनी ॥२७२॥
मुक्ती स्तव सकळ साधनें ॥ मुक्ती स्तव तीर्थें भ्रमणें ॥ मुक्ती स्तव योगा भ्यास करणें ॥ प्राणियांसी ॥२७३॥
मुक्ती स्तव देह दमिती ॥ मुक्ती स्तव साधनें करिती ॥ मुक्ती स्तव ब्रह्मचर्य आचरिती ॥ नारी नर पैं ॥२७४॥
मुक्ती स्तव संन्यास घेती ॥ मुक्ती स्तव आश्रम स्थिती ॥ मुक्ती स्तव एकांत सेविती ॥ ज्ञाते नर ॥२७५॥
मुक्ती स्तव नाना यत्न ॥ प्राणी करिती नाना विध जाण ॥ ते मुक्ती पंचानन ॥ ग्रंथ श्रवणें देत असे ॥२७६॥
ऐसें ग्रंथ राज महिमान ॥ ज्या ग्रंथीं शिव शक्ति सहवर्त मान ॥ निर्वाण फळ देतसे जाण ॥ श्रवणा वारीं ॥२७७॥
तरी त्या फल श्रुतीची होतां प्राप्ती ॥ शिव देतसे भुक्ति मुक्ती ॥ जें जें इच्छी ते ते प्राप्ती ॥ उमाकांत प्रसादें ॥२७८॥
म्हणोनि न वदवे महिमान ॥ अपार ग्रंथ सामर्थ्य गहन ॥ एकाचि श्लोकाचा महिमा पूर्ण ॥ न वदवे ब्रह्मा दिकां ॥२७९॥
एक श्लोक श्रवण करून ॥ होतसे कैला सपद पावन ॥ अनंत युगें शिव भुवन ॥ प्राप्त तयासी ॥२८०॥
ऐसें शिव स्वामीचें वचन ॥ ग्रंथासी वर दिधला पूर्ण ॥ श्रवण पठनें पाप दारुण ॥ परा भूत होतसे ॥२८१॥
ग्रंथाचा एकचि श्लोक पठण ॥ जेणें केला भाव धरून ॥ त्यासी कृतान्त अनन्य शरण ॥ येतसे पैं ॥२८२॥
तेणें कोटि के प्रासाद मंदिरें ॥ ध्वज छत्रेंसीं मनोहरें ॥ निर्मिलीं बहुत प्रभार त्नाकारें ॥ शिव स्वामी कारणें पैं ॥२८३॥
तयासी सहस्त्र जन्म प्रयाग स्नान ॥ कीं पंच सहस्त्र गया वर्जन ॥ कीं असंख्य वरुषें विश्वनाथ तेणें ॥ पूजिला सुवर्ण कमळीं ॥२८४॥
त्यसी जन्मो जन्मीं अविमुक्ति स्थळीं ॥ त्रिकाळ स्नान मणिकर्णिका जळीं ॥ नित्य स्नपी चंद्रमौळी ॥ भागीरथी तोयें ॥२८५॥
तेणें दश कोटि गोदानें ॥ रवि ग्रहणीं अर्पिलीं विप्रां कारणें ॥ कीं सहस्त्र एक तुंरग मदानें ॥ दिधलीं सत्पात्रीं ॥२८६॥
कीं कोटि भोजन ब्राह्मणांसी ॥ दिधलें तयानें वाराण शीसी ॥ दिव्यांबरें परिधानासी ॥ दिधलीं तेणें दीन जनांतें ॥२८७॥
तेणें शत कावडीं मणिकर्णिका जळेंसीं ॥ रामेश्वर पूजिला सद्भावेंसी ॥ कीं दिव्य कमळीं मल्लिका र्जुनासी ॥ पूजिलें पुण्य मासीं ॥२८८॥
कीं माघ वद्य चतु र्दशी कारणें ॥ शिव रात्रीसी केलीं जागरणें ॥ कीं द्वाद शलिंगीं पूजनें ॥ केलीं तेणें निशि दिनीं ॥२८९॥
तेणें दुष्काळीं अन्न सत्रें घातलीं ॥ शीत काळीं वस्त्रें अर्पिलीं ॥ उष्ण काळीं उदकें पाजिलीं ॥ सुगंध मनोहरें ॥२९०॥
कीं तो लक्ष विप्र लग्नी सावधान ॥ कोटि कन्या दानीं प्रवीण ॥ तेणें पृथ्वीचें दिधलें दान ॥ द्विजोत्त मांसी ॥२९१॥
तेणें कोटि एक व्रतबंध ॥ विधि युक्त केले शुद्ध ॥ कीं लक्ष एक अश्वमेध ॥ केले तेणें पैं ॥२९२॥
तेणें सालंकृत भद्र जाती ॥ लक्ष एक अर्पिले शशि ग्रहणा प्रती ॥ कीं परो पकारीं शरीर संपत्ती ॥ वेंचिली पुण्य स्थळीं ॥२९३॥
कीं कोटि एका गृहदानें ॥ अर्पिलीं सत्पात्रां कारणें ॥ अन्न-वस्त्रां सहवर्त मान तेणें ॥ जन्म पर्यंत ॥२९४॥
तेणें नंदी सारखीं वहनें ॥ अर्पिलीं शिवा कारणें ॥ कीं काम धेनूंचीं गोठणें ॥ जन्म पर्यंत दीधलीं ॥२९५॥
तेणें कोटि एक बंदि मोचनें ॥ केलीं बहुत देऊनि धनें ॥ कीं सवत्स गोदानें ॥ दिधलीं विप्रां दशलक्ष ॥२९६॥
तेणें सहस्त्र भार सुवर्ण ॥ अपिंलें प्रयाग तीर्थीं पूर्ण ॥ लक्ष काशी यात्रेचें दर्शन ॥ दिधलें दान संकल्पीं ॥२९७॥
तेणें काशी यात्रे करू केले तृप्त ॥ द्रव्य भुक्ति देऊनि नेले समस्त ॥ दीनें गौर विलीं कल्पांत ॥ संख्या न तुळे ॥२९८॥
त्या सीचि सकळ धर्म घडला ॥ त्या सीचि पूर्ण बोध जाहाला ॥ त्या सीचि गुरु एकांत घडला ॥ त्यासी आवडे तैसा पैं ॥२९९॥
तो शिवाचा आप्त जाहाला ॥ तोचि पैल पार उतरला ॥ तो वाचा सिद्धही जाहाला ॥ शिव कृपें करू नियां ॥३००॥
त्या चिया सामर्थ्याची गणना ॥ कवण करील जाणा ॥ त्यासी सूर्य सुत येत लोटा गणा ॥ आपण स्वांगेसीं ॥३०१॥
त्याची ब्रह्मादि देव स्तुति गाती ॥ त्यासी अष्टही दिक्पाळ वंदिती ॥ सकळ सुरवर शरण येती ॥ कांपे चित्तीं यमरावो ॥३०२॥
त्या चिया सामर्थ्यासी तुळै ॥ न पुरतीचि तिन्हीं तालें ॥ माथा तुकिजे जाश्वनीळें ॥ सद्भव पूर्ण देखोनी ॥३०३॥
तोचि सकळ धर्म आचरला ॥ त्या सीचि सकळ योग साधला ॥ तेणेंचि काळ आंकणा घातला ॥ शिव नाम घोषें करूनी ॥३०४॥
तो ज्याकडॆ कृपाद्दष्टीं पाहे ॥ तो तत्काळचि ब्रह्म होये ॥ मस्तकीं हस्त ठेवूनियां पाहे ॥ कैलासीं प्रतिष्ठा करी ॥३०५॥
तपांती कैला सासी जावें ॥ तरी तेणें कैलास केलें येथें आघवें । ऐसें शिव नाम घोषगौरवें ॥ उद्धरिलें विश्व ॥३०६॥
तो तपें सूर्या हूनि तेजाळ ॥ अस्त न वाहे तो किटाळ ॥ वर्षतां मेघ होय निश्वळ ॥ परी हा सदा पुरता ॥३०७॥
स्वामी म्हणे अगस्ती निर्मळा ॥ उपमा न पुरे दिग्मंडळा ॥ तोचि स्वयें जाश्वनीळा ॥ समान तुके ॥३०८॥
एका श्लोकाची फल श्रुती ॥ इतुका विस्तार जाहाला ग्रंथीं ॥ मग या ग्रंथाची फल श्रुती ॥ कोण सुमती वदेल ॥३०९॥
ग्रंथ महिमा अगाध जाणा ॥ किती वदूं मी पुनः पुन्हां ॥ जया ग्रंथीं पंचा नना ॥ शक्ती सहवर्त मान असणें ॥३१०॥
म्हणोनि भावें करा ग्रंथ श्रवण ॥ आकल्प पाप होय दहन ॥ नारी नर शूद्र ब्राह्मण ॥ श्रवणें मुक्ति सर्वांसी ॥३११॥
ऐकतां महा पापी दुर्जन ॥ श्रद्धा युक्त करितां श्रवण ॥ तो उद्धरे गुरु कृपें करून ॥ येथें संशय नाहीं ॥३१२॥
दुरात्मे नष्ट पापी दुर्जन ॥ हें मिथ्या मानिती ग्रंथ कथन ॥ त्यांची जिव्हा झडोनि पूर्ण ॥ कुष्ठ पण पावेल ॥३१३॥
कृमी होतील सर्वां गासी ॥ मुखाव लोकनें प्राण नाशी ॥ सकळ दोषांची मिरासी ॥ होऊनि ठाके ॥३१४॥
त्यासी चंद्रा र्कवरी नरक प्राप्ती ॥ यमगण त्यासी बहु जाचितो ॥ तप्त भूमीसी ॥ लोळ विती ॥ सांडसें तोडिती मांस त्याचें ॥३१५॥
असो तयाचे जाचणीसी ॥ संवत्सर न पुरे बोलण्यासी ॥ वदतां शीण वाचेसी ॥ होतसे बहुत ॥३१६॥
म्हणोनि भावार्थोंचि कीजे श्रवण ॥ तरी आकल्प दोषांचें होय दहन ॥ हें सत्य त्रिवार जाण ॥ अगस्ति मुनी ॥३१७॥
सत्पात्रासी देऊनि दान ॥ श्रद्धायुक्त कीजे श्रवण ॥ तरी शत एक काशीयात्रांचें पुण्य ॥ घडे तयासी ॥३१८॥
हे मागें तुम्हां श्रवण ॥ ग्रंथ माहात्म्यीं केलें निरूपण ॥ पुनः पुन्हां त्रिवार पूर्ण ॥ कळवळोनि बोलिला ॥३१९॥
हे कथा मुक्ति दायिनी ॥ सकळदुःखनिवारिणी ॥ सकल दोष दहनी ॥ अंतीं इच्छिलें फल प्राप्त होय ॥३२०॥
स्वार्था स्तव श्रवण करा ग्रंथ ॥ ग्रंथ मिषें पावेल विश्वनाथ ॥ पुत्र प्रजा सकळ मनोरथ ॥ पुरवी विश्वनाथ पैं ॥३२१॥
भुक्ति मुक्ति दानीं समर्थ ॥ देतसे शिव अनाथनाथ ॥ या ग्रंथा सारिखा समर्थ ॥ नाहीं नाहीं भूपंडळीं ॥३२२॥
श्रवणासाठीं भुक्तीं मुक्ती ॥ सकळ पदार्थ अर्थ प्राप्ती ॥ दूःक दैन्यें परा भवती ॥ निमिषार्धें ॥३२३॥
हेचि कथा शिवें भवनीसी ॥ सांगीतली अति आदरेंसीं ॥ तेचि कथा व्यास ऋषी ॥ निरूपी वैशं पायना ॥३२४॥
तेचि कथा शिव नंदन ॥ वदला अगस्ति मुनी लागून ॥ श्रवण पठनें महा दारुण ॥ पापें सर्वही भस्म होती ॥३२५॥
तंव अगस्ती म्हणे स्वामिनाथा ॥ परम सुखी जाहालो तव वच नामृता ॥ हरली ताप त्रयव्यथा ॥ तुमचे चरण प्रसादें ॥३२६॥
अगस्ती पावला समाघान ॥ लोपा मुद्रा आनंद घन ॥ कळसा आलें ग्रंथ निरूपण ॥ विश्वनाथ कृपेंसीं ॥३२७॥
सोपें सुगम बहु सार ॥ पाहातां तरी भक्ति - मुक्तींचें मंदिर ॥ तेथींचा अर्थान्वय चतुर ॥ बहु श्रुत जाणती ॥३२८॥
संस्कृत म्हणिजे कूपनीर ॥ त्यासी पाहिजे पात्र दोर ॥ महाराष्ट्र म्हणिजे सरिता नीर ॥ तृषा वंतीं सेंविजे ॥३२९॥
सुगम कथा मार्ग मोकळा ॥ नारी नर स्त्रियां अबळां ॥ श्रवणेंचि पाविजे जाश्व नीळा ॥ श्रद्धा पूर्वक पैं ॥३३०॥
म्हणोनि महाराष्ट्र कथा जग तारिणी ॥ अंतरीं धरा बहुतत्नीं ॥ तेचि जीवन्मुक्त त्रिभुवनीं ॥ कथा श्रद्धाळू जे ॥३३१॥
काशीखंड कथा जग तारिणी ॥ अंतरीं धरावी सर्व जनीं ॥ तेचि जीवन्मुक्त त्रिभुवनीं ॥ कथा श्रद्धाळू जे ॥३३२॥
काशी्खंड कथा महा पवित्र ॥ जो वदे तयाचें धन्य वक्र ॥ धन्य एक त्याचे श्रोत्र ॥ कथा चरित्र परिसतां ॥३३३॥
दोनचि अक्षरें काशी काशी ॥ जपतां नाश होय पात कांसी ॥ गुरु मुखें आणोनि मानसीं ॥ अव मुक्तीं वास कीजे ॥३३४॥
मागें शिली मराजा भूपति होता ॥ तेणें पृथ्वी जनासी मार्ग केला मुक्त ॥ म्हणोनि सर्व जन पूजिती भवनी कांता ॥ राजा रंक एक श्रद्धा ॥३३५॥
आतां मस्तक ठेवूनि गुरु चरणीं ॥ ग्रंथ समाप्त करीं आज्ञा मागोनी ॥ गुरू वांचूनि त्रिभुवनीं ॥ समर्थ कोणी असेना ॥३३६॥
ऐसी गुरु आज्ञा घेऊनि पूर्ण ॥ श्रोतयां साष्टांग वंदन ॥ जें जें देखाल ग्रंथीं न्य़ून ॥ तें तें पूर्ण तुम्हीं कीजे ॥३३७॥
शिव दास गोमा बद्धां जळीं ॥ मस्तक ठेवूनि क्षिति मंडळीं ॥ संतपा उलें वंदोनि मौळीं ॥ श्रोत यांसी प्रार्थी ॥३३८॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे उत्तराधें ग्रंथमाहात्म्यवर्णनं नाम अशीतितमाध्यायः ॥८०॥
पूर्वोत्तरार्धसहितः काशीखंडः समाप्तः ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति अशीतितमाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP