१६३१
( राग-सिंधकाफी; ताल-धुमाळी )
बहुरंगा रे मवमंगा । पावन देव अमंगा ॥ध्रु०॥
जनपाळा रे गोपाळा । सुंदर नाटकलीळा ॥१॥
धन्य लीळा रे घननीळा । भूषामंडित कीळा ॥२॥
सर्व जाणे रे खूण बाणे । आम्ही दास पुराणे ॥३॥

१६३२
( राग-केदार; ताल-धुमाळी ) मग चंचळ जालें निश्चळीं । संकल्पें विराट वाढलें ॥ध्रु०॥
निश्चळ गगनीं आमाळ आलें । आलें सवेंचि उडालें ॥१॥
निद्रिस्तानें स्वप्र देखिलें । जागें होता माईक जालें ॥२॥
बाजीगरी त वोडंबरी । दास म्हणे हे तैसीपरी ॥३॥

१६३३
( राग-मैरव;  ताल-धुमाळी )
सपनींचें राज्य गेलें । जागृतीनें ऐसें केलें । वैमव सकळ नेलें । प्रत्यक्ष माझें ॥१॥
काय रे पाहतां स्थिर । बोलावा नापिक चोर । दर्पणींचा नेला हार । प्रत्यक्ष माझा ॥२॥
रामदासीं विचारावें । अज्ञान वेढा लागावें । जाणत्या पुरुषीं त्यागावें । माइक सर्व ॥३॥

१६३४
(  राग-भूप; ताल-धुमाळी ) सकळ जन सांमाळितो । सांमाळी पाळीतो ॥ध्रु०॥
करीत आहे दिसत नाहीं । तो चि विवंचुनि पाहीं ॥१॥
करीत गेला नाहीं देखिल । धन्य येकला मला ॥२॥
दास म्हणे तो जवळी आहे । गुरुमुखें करी पाहे ॥३॥

१६३५
( राग-केदार; ताल-दादरा )
सकळ घटीं जगदीश येकला । स्मरणरूप स्मरणेंचि देखिला ॥ध्रु०॥
शीव कळेना शक्ति कळेना । भक्ति कळेना विभक्ति कळेना ॥१॥
चालवितो तो दिसत नाहीं । तीक्षण बुद्धी विचारुनी पाहीं ॥२॥
दास म्हणे तो चंचळा आहे । तेणेंकरूनी निरंजन पाहे ॥३॥

१६३६
( चाल-हित गेलें रे० )
आभाळभरी देवो आभाळभरी । गगन भरोनि अंतर्बाह्य वास्तव्य करी ॥ध्रु०॥
नयनीं दिसेना मनेंकरून भासेना । कल्पांतीं चळेना देवो कदा नासेना ॥१॥
देवामध्यें सर्व सर्वाम मध्यें देवो । देवासी पाहातां द्दश्य देऊळ वावो ॥२॥
कोठें पळवावा देव कैसा हो न्यावा । हालेना तो चालेना तो कैसा उठवावा ॥३॥
भ्रम उडाला अवघा देवचि जाला । अनन्यभक्ति करूनि सेवक धन्य तो जाला ॥४॥

१६३७
( रागा-कल्याण; ताल-धुमाळी )
 अंतर जाणतसे अंतरखुणे ॥ध्रु०॥
भास आभासा वेगळें । म्हणोनि शब्दासी नाकळे परी ॥१॥
नाना द्दष्टांतांपरतें । जाणपण नाहीं तेथें परी ॥२॥
रामदास म्हणे सार । मुक्तपणाचा विचार परी ॥३॥

१६३८
( राग-कामोद;  ताल-दादरा )
उदास परि तें गुज सांगतों तुज । तेथें तुज मज ठाव नाहीं रे ॥ध्रु०॥
चोरितां उदास होय प्रगट करितां नये । वेदाचें ह्रदय पुरातन रे ॥१॥
बोलासी तें नातुडे बोलींच ठायां पडे । आहे चहुंकडे सारिखेंचि रे ॥२॥
हातीं धरुनि द्यावें हातीं तेंचि स्वमावें । घरावें सोडावें कासयासी रे ॥३॥
करीं धरितां नये टाकितां न जाये । तयासी करणें काय सांग रे ॥४॥
तयासी सांडुनि जातां सारिखेंचि तत्त्वतां । दास म्हणे आतां बोलवेना रे ॥५॥

१६३९
( राग-भूप; ताल-धुमाळी )
गोंडाळें झांकिलें जीवन गे बाइये । तैसा जगज्जीवन ॥ध्रु०॥
जड चंचळ होतसे गे बाइये । सर्व आटोनि जातसे ॥१॥
सावधापासीं सकळ कळे  गे बा० । दुश्चित्ताला कांहीं न कळे ॥२॥
आलें तें जाईल सकळ गे० । ऐसें होईल विकळ ॥३॥
निर्मळ निश्चळ  निश्चळ न चळे गे बाइये । सज्जनसं गतिं कळे ॥४॥

१६४०
( राग-केदार; ताल-धुमाळी )
चंचळीं निश्चळ परी तें चळत नाहीं । चंचळ तें येतें जातें अंतर शोधुनि पाहीं ॥ध्रु०॥
दूध आणि ताक एक करितां नये । उमजल्यावांचुनि लोका समजे काय ॥१॥
चंचाळीं राहसी तरि तूं चंचळ होसी । निश्चळाच्या योगें समाघान पावसी ॥२॥
दास म्हणे आम्ही भक्त विभक्त नव्हों । शरीरसंबंधें विषम विवेकें साहों ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP