कथामृत - श्रीसमर्थास प्रार्थना

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


(वृत्त-भुजंग प्रयात)
तुम्हा प्रार्थना नित्य स्वामीसमर्था ।
दयाळा रमो त्वत्पदीं चित्त नाथा ॥
सदा साधुची संगती दे अनंता ।
न बाधो मनालागि संसार चिंता ॥१॥
(वृत्त-पृथ्वी)


असोनि नरदेह हा प्रभु न मी तुला पूजिले ।
जगीं मिळविता धना तुजसी नित्य दुर्लक्षिले ।
अनाथ, अति दुर्बला कधि न साह्य मी ते दिले ।
असोनि अपराधि मी तव पदांसि आलिंगिले ॥१॥

दयामृतघना प्रभो मजवरी करावी दया ।
असेचि मतिमंद मी हरिल कोण माझे भया ॥
निरंतर असावया स्मरण रे तुझे पामरा ।
सुबुद्धि मज देइगा प्रभुबरा करोनि त्वरा ॥२॥

तुझे चरण सेविता मज न विघ्न बाधो कदा ।
तुझे स्मरण सर्वथा मज गमो खरी संपदा ॥
तुझे स्वरुप दर्शनीं मन रमो प्रभो सर्वदा ।
तुझा वरद हस्त तो मम शिरी असोदे सदा ॥३॥

॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥
ॐ तत्सत्‌


N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP