मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ४

संकेत कोश - संख्या ४

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


चतुर्थ - १ चार वस्तूंच्या समुच्चयापैकीं चवथ्या वस्तूला संकेतानें म्हणतात . कात , मोक्ष , दंड इ . ( अ ) १ पान , २ सुपारी , ३ चुना आणि ४ कात ; ( आ ) १ धर्म २ अर्थ , ३ काम आणि ४ मोक्ष ; ( इ ) १ साम , २ दाम , ३ भेद , आणि ४ दंड .

चतुराक्षरी मंत्र - ( अ ) " राधा कृष्ण " भाविकांचा एक गोड मंत्र . ( आ ) " वासुदेव " ( इ ) " दत्ता - त्र - य " ( श्रीदत्तस्तवपदामृत ) ( ई ) " रामकृष्ण ".

" उघडा मन्व जाणा । रामकृष्ण म्हणा " ( तुकाराम )

चतुरात्मा - १ मन , २ बुद्धि , ३ अहंकार व ४ चित्त या चार अंतःकरणाच्या वृत्ती होत ; म्हणून त्यांस चतुरात्मा म्हणतात .

( वि . स . नाम )

चतुरानंद - १ आत्मानंद , २ ब्रह्मानंद , ३ अविद्यानंद व ४ विषयानंद .

चतुरायुध - १ शंख , २ २ चक्र , ३ गदा आणि ४ पद्म . हीं श्रीविष्णूचीं चार आयुधें .

चतुरायुध क्षेत्रें - १ शंखक्षेत्र - जगन्नाथपुरी , चक्रक्षेत्र - भुवनेश्वर , ३ गदाक्षेत्र - वैतरणी नदी आणि ४ पद्मक्षेत्र - मैत्रावन ( कोणार्क ) हीं सर्व चतुरायुध क्षेत्रें ; ओरिसांत ( उत्कल ) आहेत .

चतुर्विध अन्न - १ भक्ष्य - चर्वण करून खाण्याचे पदार्थ - भाकरी , पोळी वगैरे ; २ लेह्म - जसें पंचामृत , रायतें वगैरे ३ चोष्य - चोखण्याचे ऊंस इ . आणि ४ पेय - पिण्याचें - दूध , ताक वगैरे . ( आ ) १ शुक्र , २ पक्र , ३ स्निग्ध आणि ३ विदग्ध . ( शिव - लि . )

चतुर्विध आसव ( चित्त - मळ )- १ कामासव , २ द्दष्टि़ आसव - माताभिमान , ३ भवासव - पारलौकिकेच्छा व अविद्या - अयथार्थ ज्ञान

( बुद्ध्दर्शन )

चतुर्विध जीव - १ देव , २ मनुष्य , ३ तिर्यक् ‌‍ ( मनुष्येतर जीव ) आणि ४ नरकी ( जैनधर्म )

चतुर्विध कर्तव्यें विद्यार्थ्यांचीं - १ स्वतंत्र बुद्धि , २ स्वतःवर ताबा असणें , ३ सेवापरायणता व ४ सर्वासाबधानता ( भूदानगंगा भाग ६ )

चतुर्विध दानें - १ आहारदान , २ ज्ञानदान , ३ औषधीदान आणि ४ अभयदान ( जिनधर्म ).

चतुर्विध पुरुषार्थ - १ धर्म , २ अर्थ , ३ काम व ४ मोक्ष . हे चार पुरुषार्थ होत . ज्ञानी भक्त , भक्ति हा पंचम पुरुषार्थ मानतात . ’ भक्ति भाग्य प्रेमा । साधित पुरुषाथ । ब्रह्मींचा जो अर्थ । निज ठेवा ॥ ’ ( तुकाराम )

चतुर्विध प्रलय - १ आर्त - द्रौपदी , २ जिज्ञासु - उद्धव , ३ अर्थार्थीधरूव आणि ४ ज्ञानी - शुकदेव .

’ आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ । ’ ( भ . गी . ७ - १६ )

चतुर्विधभक्त - १ आर्त - द्रौपदी , २ जिज्ञासु - उद्ध्व , ३ अर्थार्थीधरूव आणि ४ ज्ञानी - शुकदेव . ’ आर्तो जिज्ञासुरर्थाथीं ज्ञानी च भरर्षभ । ’

( भ . गी . ७ - १६ )

चतुर्विध भक्ति लोकमातेची ( नदीची )- १ स्नान , २ पान , ३ दान व ४ गान ( जीवनलीला ).

चतुर्भद्र - ( अ ) १ धर्म , २ अर्थ , ३ काम व ४ मोक्ष या चार पुरुषार्थांचा समुच्चय . ( आ ) १ सुंठ , २ अतिविष . ३ मुस्ता गवत व ४ गुळवेल . या चार औषधींचा समूह . ( इ ) १ गोड शब्दानें दान , २ गर्वरहित ज्ञान , ३ क्षमाशील शौर्य व ४ त्यागयुक्त वित्त . या चार दुर्लभ गोष्टींना चतुर्भद्र म्हणतात . ( प्रश्नोत्तर - रत्न - मालिका )

चतुर्विध मित्र - १ औरस , २ नात्यागोत्यांचे , ३ वंशपरंपरा ऋणानुबंधी आणि ४ . आपत्कालीं रक्षण करणारे .

औरसं कृतसंबंध तथा वंशक्रमागतम् ‌‍ ।

रक्षकं व्यसनेभ्य़श्च मित्रं ज्ञेयं चतुर्विधम् ‌‍ ॥ ( का . नी . ४ - ७४ )

चतुर्विध मुक्ति - १ सकोकता , २ समीपता , ३ सरूपता व ४ सायुज्यता . ( दा . बो . ४ - १० - २८ )

चतुर्मूर्ती - १ विराट् ‌‍ , २ सूत्रात्मा , ३ व्याकृत व ४ तुरीय . या चार ब्रह्माच्याच मूर्ती होत म्हणून त्यास चर्तुमूर्ती म्ह्णतात . ( विष्णू स .- नाम )

चतुर्विध योग - १ कर्मयोग . २ भक्तियोग , ३ राजयोग आणि ४ ज्ञानयोग .

चतुर्व्यूह - ( अ ) १ बासुदेव . २ संकर्षण , ३ प्रद्युम्न आणि ४ आनिरुद्ध . पृथ्वीस आधारभूत असे चार व्यूह आहेत ; ( आ ) १ रोग , २ आरोग्य , ३ निदान आणि ४ भैषज्य ( वैद्यशास्त्र ) ( इ ) १ शरीर पुरुष , २ छंदः पुरुष , ३ वेद पुरुष आणि ४ महापुरुष असे परब्रह्माचे चार व्यूह आहेत म्हणून त्यास चतुर्व्यूह म्हणतात . ( विष्णू स . नाम . )

चतुःश्लोकी भागवत - श्रीमद्भागवताच्या दुसर्‍या स्कंधांतील नवव्या अध्यायांतील ३२ ते ३५ हे चार श्लोक . यांत ब्रह्मदेवाला भगवंतानें सांगितलेलें गुह्म ज्ञान अथवा सर्व भागवत ग्रंथाचें सार आहे , म्हणून त्यास चतुःश्लोकई भागवत म्हणतात .

तें हें चतुःश्लोकी भागवत ।

स्त्रष्टयासी सांगे भगवंत ॥ ( च . भा . ४३० )

चतुःश्लोकी शाकुंतल - शाकुंतल नाटकांतल्या चवथ्या अंकांतील चार श्लोक . या कालिदासाच्या अमर कृतीला ही संज्ञा आहे .

काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुंतला ।

तन्मध्ये तु चतुर्थो‍ऽङ्‌‍कः तत्र श्लोकचतुष्टयम् ‌‍ ॥ ( सु . )

चतुर्विध साधनें ( दुःखपारिहाराचीम )- १ मैत्री , २ करुणा , ३ मुदिता आणि ४ उपेक्षा ( योग० )

चतुःशास्त्र - १ न्याय , २ व्याकरण , ३ पूर्वमीमांसा आणि ४ उत्तर मीमांसा हीं चार शास्त्रें व यांत पारंगत तो चतुःशास्स्त्री .

चतुःसूत्री ( कर्मयोगाची )- १ कर्मण्येवाधिकारस्ते , २ मा फलेषु कदाचन , ३ मा कर्मफलहेतुर्भूः , ४ तो ते सङ्‌‍गोऽस्त्वकर्मणि . ( भ . गी - २ - ४७ )

चतुःसूत्री ( महानुभाव )- २ अहिंसा , २ निःसंग , ३ निवृत्ति आणि ४ भक्तियोग .

चतुःसूत्री ( चरित्र लेखनाची )- १ व्यक्तिविकास , २ स्वभावचित्रण , ३ सौंदर्य आणि ४ अचूकता ( म . टाईम्स २९ पप्रिल १९६३ )

चतुःसूत्री ( लोकमान्यप्रणीत )- १ स्वदेशी , २ बहिष्कार ३ राष्ट्रीय शिक्षण आणि ४ स्वराज्य .

चतुःसूत्री ( व्यावहारिक आचरणाची )- १ जसेंच्या तसें , २ जेव्हांच्या तेव्हा , ३ ज्याचें त्यांनीं व ४ जेथल्या तेथें ( आयुर्वेदपत्रिका एप्रिल १९६० )

चतुःसूत्री - ( श्रीशिवछत्रपतींच्या अवतारकार्याची )- १ देव , २ धर्म , ३ गो ( गाय ) आणि ४ ब्राह्मण यांचें प्रतिपालन .

चतुःसूत्री ( श्रीशंकराचार्य )- १ अथातो ब्रह्मजिज्ञासा , २ जन्मः - द्यास्य यतः , ३ शास्त्रयोनित्वात् ‌‍ व ४ तत्तु समन्वयात् ‌‍

( ब्रह्मसूत्र शारीरकभाष्य )

चतुःसूत्री ( समर्थांची ) १ हरिकथानिरूपण - भक्ति , २ राजकारणशक्ति , ३ सर्वविषयीं सावधपणा - युक्ति आणि ४ साक्षेप - मुक्ति .

( दा . बो . ११ - ५ - ४ ) ( आ ) १ कर्म , २ उपासना , ३ ज्ञान आणि ४ मोक्ष ( दा . बो . )

चतुःसूत्री ( स्वास्थ्यरक्षणाची )- १ दिनचर्या २ ऋतुचर्या , ३ वेगोदीरणधारण आणि ४ सदाचार ( आयुवेंद )

चतुःसूत्री ( ज्ञानेश्वरीची )- १ भक्तियुक्त अंतःकरण , २ अध्यात्म - शास्त्र , ३ वाक्‌‍चातुर्य आणि ४ सर्वांचें सुख ( ज्ञानेश्वरी १८ - १७५० )

चत्वार गुण - १ तमोगुण , २ रजोगुण , ३ सत्त्वगुण आणि ४ शुद्ध - सत्त्वगुण . ऐसे हे चत्वार गुण । चौदेहाम्चे ॥ ( दा . बो . १७ - ९ - ५ )

चत्वार देव - १ नाना प्रतिमा , २ अवतार महिमा , ३ अंतरात्मा व ४ निर्विकारी देव .

ऐसे हे चत्वार देव । सृष्टीमधील स्वभाव ।

या वेगळा अंतर्भाव । कोठेंचि नाहीं ( दा . बो . ११ - २ - ३४ )

चत्वार देह आणि त्यांचे अभिभानी - १ स्थूल देह - विश्व , २ सूक्षमदेह - तैजस , ३ कारणदेह - प्राज्ञ व ४ महाकारण देह - प्रत्यगात्मा ( परमामृत )

चत्वार भोग - १ स्थूल भोग , २ प्रविविक्त भोग ( उपाधिरहित ), ३ आनंद भोग व ४ आनंदावभास भोग ( दा . बो . १७ - ९ - ३ )

चत्वार मात्रा - १ अ - कार २ उ - कार , ३ म - कार व ४ अर्धमात्रा . ऐस्या मात्रा चत्वार । चौदेहाच्या ( दा . बो १७ - ९ - ४ )

चत्वार शक्ति - १ क्रियाशक्ति , २ द्र्व्यशक्ति , ३ इच्छाशक्ति आणि ४ दानशक्ति . ( दा . बो . १७ - ९ - ६ )

चतुष्पाद - चार पायांचीं जनावरें किंवा चार चरणांचीं नक्षत्रें .

चतुष्पाद धर्म - ( अ ) १ तप , २ यज्ञ , ३ ज्ञान व ४ वैराग्य ; ( आ ) १ अहिंसा , २ सत्य , ३ अस्तेय आणि ४ आनृण्य . हे चार धर्माचे पाद ( पाय ) होत .

चतुष्पादा संपत्ति व तिच्या सोळा कला - ( आयुर्वेदांतील -

संपत्ति कला

१ वैद्य - १ द्क्ष , २ गुरूपासून विद्यक शिकलेला , ३ स्वच्छतेची आवड असलेला व ४ अनुभविक .

२ औषध - १ अनेक प्रकारें देतां येण्यासरखें , २ अनेक विकार बरें करणारें , ३ संपन्न - ताजें व ४ ज्या रोगावर द्यावयाचें त्याच रोगावर योजिलेलें .

३ परिचारक - प्रेंमळ , २ स्वच्छतेनें राहणारा , ३ रोग्याबद्दल आस्था असलेला व ४ चतुर .

४ रोगी - १ औषधास खर्च करणारा , २ बैद्यावर विश्वारस ठेवणारा , ३ रोगाचीं खरीं कारणें सांगणारा आणि ४ धैर्यवान् ‌‍ .

या प्रकारच्या षोडशकलात्मक चतुष्पाद संपत्तीनें युक्त असा रोगी बरा झाल्यावांचून राहात नाहीं असें वैद्यक शास्त्रांत सांतितलें आहे . ( वा . अ . १ )

चातुर्मास्य - १ आषाढ शु . ११ ते कार्तिक शु . ११ पर्यंतचा चार महिन्यांचा काळ .

चार अक्षरी मंत्र - १ ( अ ) त - ड - जो - ड व्यवहारांत हा मंत्र उभयपक्षीं सुखावह होतो . ( आ ) वि - स - र - लों - ज्याला मनःपूर्वक काम करावयाचें नसतें त्याला वेळ मारून नेण्याचा सोइस्कर मंत्र म्हणून उच्चारला जातो .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP