जय मृत्युंजय - भेदुनी आत्मतेजे तमाला । भ...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


देश दास्यांतुनी मुक्त झाला
भेदुनी आत्मतेजे तमाला ।
भानु पूर्वेस जैसा निघाला ।
जाउनी आंग्ल सत्ता लयाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥धृ०॥
देश हा आपला । शत्रुने व्यापला ।
तोडुनी शृंखला । मुक्त होऊं चला ।
लागला ध्यास हा भारताला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥१॥
देत आत्माहुती । या ध्वजाभोवती ।
वा लढोनी कीती । शत्रुला मारिती ।
वंदना त्या महाक्रांतिकाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥२॥
आंग्लसेना रणी । जिंक्य ना पाहुनी ।
क्रांतिकारी कुणी । पुत्र भूचे गुणी ।
घालती हाल विस्फोटकाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥३॥
शोणिताची धरी । धार साध्यावरी ।
पेटलेली उरी । आस होई पुरी ।
भाग कांही जरी भंगलेला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥४॥
देशसीमा भुवी । आखण्याला नवी ।
रोखण्या यादवी । सिद्व सेना हवी ।
हार येते जगी दुर्बळाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥५॥
वस्तुशास्त्रांतली । पाहिजे भूतली ।
योग्यता वाढली । यास्तवे आपली ।
द्या मती यांत्रिकोत्पादनाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥६॥
शांतिसद्भभावना । मानिती लोक ना ।
शस्त्रशक्तीविना । फोल त्या वल्गना ।
अद्ययावत् करा शस्त्रशाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥७॥
चार सीमांतला । भ्रांतिने जो दिला ।
भाग तो आपला । पाहिजे घेतला ।
कृष्ण राही नियंता रथाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥८॥
कोण आता जरी । पाय ठेवी शिरी ।
आडवीता वरी । वार शस्त्रे करी ।
मस्तकी शत्रुच्या घाव घाला ।
देश दास्यांतुनी मुक्त झाला ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:02.8430000