मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
संधि पुन्हा आली बंधो । जा...

जय मृत्युंजय - संधि पुन्हा आली बंधो । जा...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


संधि पुन्हा आली बंधो । जा तुम्ही रणाला ।
रोख सैनिकांचा फिरवा । मुक्ति या क्षणाला ॥धृ०॥
पुरवीन युवक मी, त्यांना शस्त्र इंग्रजांचे ।
होईल युद्वयज्ञाला सैन्य सिद्व त्यांचे ।
मान ऋत्विजाचा घ्यावा देशधारणाला ।
रोख सैनिकांचा फिरवा । मुक्ति या क्षणाला ॥१॥
नाशितां रिपूच्या मूर्ती जात शक्ति वाया ।
भूमि रंगवा रक्ताने शत्रु घालवाया ।
उभे करा आज्ञेमध्ये तरुण मारणाला ।
रोख सैनिकांचा फिरवा । मुक्ति या क्षणाला ॥२॥
मित्र आपला शत्रूचा शत्रु, जाणंता ना ?
शक्त सैन्य साहया राही चाल योजताना ।
स्मरा नित्य शिवरायाच्या राजकारणाला ।
रोख सैनिकांचा फिरवा । मुक्ति या क्षणाला ॥३॥
ऐकली उक्ति नेत्याची देशगौरवांनी ।
युक्तिने लंघिली सीमा घेतली भवानी ।
रंगविलीं प्राचीं प्राणां लावुनी पणाला ।
रोख सैनिकांचा फिरवा । मुक्ति या क्षणाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP