मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
चेतना जिवाला आणी । दोन ज...

जय मृत्युंजय - चेतना जिवाला आणी । दोन ज...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


चेतना जिवाला आणी ।
दोन जन्म काळे पाणी ॥धृ०॥
शरसंधाने लंडनच्या       
नाशिक तूं केले विद्व ।
सार्वभौम नृपति विरुद्व     
मांडलेस युद्व निषिद्व ।
आरोप तुझ्यावर दोन्ही    
सप्रमाण झाले सिद्व ।
आसन अन्यायाचे ते ।
सत्तान्ध इंग्रजी होते ।
भय चैतन्याचे त्याते ।
बोलले भयानक वाणी  
दोन जन्म काळे पाणी ॥१॥
शब्दार्थाने जन्मान्ती       
शिक्षा दुस-या जन्माची ।
परि दया दंडिता द्यावी      
कनवाळू सम्राटाची ।
पन्नास पूर्ण वर्षांनी        
मुक्तता करावी याची ।
ऐकूनि शब्दच्छल असला ।
उपहासे दण्डित हसला ।
त्या दर्प मदाचा दिसला ।
वदला, कां भॊगित कोणी ?
दोन जन्म काळे पाणी ॥२॥
सांगतसे, शास्त्यांपेक्षा       
कलिकाळ दयाळू राही ।
धुडकावुनि राजाज्ञेते        
मुक्तता करी लवलाही ।
अडविण्या धर्मराजाला       
सामर्थ्य आपले नाही ।
न्याय हा अलौकिक झाला ।
लाजला काळ राजाला ।
ऋण माझे चुकवायाला ।
मृत्योत्तर देणी घेणीं  
दोन जन्म काळे पाणी ॥३॥
सांगता बायबल सूत्र        
मानव जर कोणी मेला ।
मुक्तिदिनासाठी थांबे         
पाप पुण्य ऐकायाला ।
तोंवरी गाडला राही         
जन्म दुजा नाही त्याला ।
मृत्यूनंतर जन्माची ।
धारणा हिंदुधर्माची ।
संसृति ही चालायाची ।
सूत्राला तुमच्या हाणी      
दोन जन्म काळे पाणी ॥४॥
इथुनी वर्षे पन्नास         
राहील राज्य हे काय ? ।
वाटत का शिक्षेने या       
शौर्यहीन होइल माय ? ।
धक्क्यामागुन धक्क्यांनी    
तुम्ही ध्याल काढता पाय ।
भिंतीवरच्या लेखाने ।
समजावे साम्राज्याने ।
वागवीन आनंदाने ।
बेड्यांची तोंवरी लेणी     
दोन जन्म काळे पाणी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP