मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
एकमुखाने करुनि हकारा, करी...

जय मृत्युंजय - एकमुखाने करुनि हकारा, करी...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


एकमुखाने करुनि हकारा, करीं घेतले व्रत असिधारा,
उल्हासाचा उरांत वारा ।
नाव चालली क्रांतिदलाची देशाच्या उद्वारा,
घेऊनि जा दुर्लघ्य सागरा स्वातंत्र्याच्या द्वारा ॥धृ०॥
परवशतेच्या अंधारांतुनि, भारत-वासी पृष्ठी घेऊनि ।
विश्वासाने त्यां रत्नाकर नेई नौकेमधुनी वाहुनि ।
निश्चल नावाडी नौकेचा,
प्रस्तर हिमनग टाळुनि चुकवुनि, विनवित पारावारा ।
घेऊनि जा दुर्लघ्य सागरा स्वातंत्र्याच्या द्वारा ॥१॥
भार टाकला तव पृष्ठावर, पर्यटनाला आलो भरभर ।
प्रहार केवळ कल्लोळांचे, स्वातंत्र्यांचे कोठे मंदिर ।
नौकानायक झाला शंकित,
म्हणतो, सिंधो, कुठे लपविला उद्दिष्टाचा तारा ।
घेऊनि जा दुर्लघ्य सागरा स्वातंत्र्याच्या द्वारा ॥२॥
हसूं नको तूं फेनमिषाने, नको भेडसावूं गर्वाने ।
फुगला कां रे उन्मादाने, आंग्लभूमिच्या स्वामित्वाने ।
दुबळी नाही भारतमाता,
पुत्र अगस्ती मन्मातेचा, प्याला सागर सारा ।
घेऊनि जा दुर्लघ्य सागरा स्वातंत्र्याच्या द्वारा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP