विवेकसार - शिवरामकृत पंचीकरण

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥श्री॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुगणपत्यादि सर्वेष्ट देवताभयो नमः ॥ ओ सच्चिदानंदरूपाय सर्धाधीष्टत्तिसाक्षिणे नमो वेदांतवेद्याय गुरुवेनंतमूर्त्तये ॥१॥

अथपंचीकरणप्रारंभः ॥ कोणि येक शिष्य साधनचतुष्टयसंपन्न होउनि सद्रुरूशिं शरण गेला ॥ तरि ते च्यारि साधने कोणती नित्यानित्यविवेक ॥१॥

इहामुत्रफलभोगविराग ॥२॥ शमादिषट्क ॥३॥ मुमुक्षता ॥४॥ ऐसीं च्यारि साधने ॥ तरि नित्यानित्यविवेक ह्मणजे काय ॥ नित्य आत्मा ॥ अनित्य ह्मणिजे देहादि प्रपंच ॥

अतां विवेक ह्मणजे आत्म्याकडे पाहणे ॥ देहादि प्रपंची उदास होणे या नाव नित्त्यानित्त्यविवेक ॥ हे प्रथम साधन ॥ आतां दुसरें साधन इहामुत्रफलभोगविराग ह्मणिजे काय इह ह्मणिजे राज्यादि संपदिचे सुख ॥ अमुत्र ह्मणिजे स्वर्गलोकवैकुंठ सत्य लोक कैलासादिक या दोन्ही लोकीं विषय तत्समानेची प्रत्यक्षानुमानें जाणून विट धरणे ॥ या नाव इहामुत्रफलभोगविराग हे दुसरे साधन ॥ शमादिषट्क मणिजे काय शम दम तितिक्षा उपरति श्रत्धा समाधान ६ असे हे मिळोन येक साधन शम म्हणिजे दुष्ट वासनेपासून मन फिरवणे या नाव शम ॥ दम म्हणिजे शब्दादि दृश्य विषयापासुन श्रोत्रादि इद्रियें अवर्णे या नाव दम ॥ तितिक्षा अन्यायविण अपले किंवा इतर लोकि जाचिले तो जाच क्षोभोर्मी न उठता अंगी साहणे या नाव तितिक्षा ॥ आतां उपरति म्हणिजे मन दुष्ट वासनेंपासाव फिरउन भगवच्चणि ठेवणे ॥ इंद्रियें जे ते हि दृश्य विषयापासाव अवरून भगवद्भजनी लाविले मग त्या मन आणि इंद्रियासी दृश्य विषय आवडेनासे जाले अखंड भगवतभजनी च रमू लागले ॥ या नाव उपरती ॥ आतां श्रद्धा म्हणजे ॥ जे सद्रुरूनी सांगितले तें वेदवाक्य सत्य मानून गुरुवेदवाक्यवचनी विश्र्वास ष्ठेऊन आत्मरूप अनुभवणे या नाव श्रद्धा ॥ अतां समाधान म्हणजे प्राचीन कर्मयोगें ज्या समई हर्षविषादादि होतें तेव्हां धैर्यबळें मन डमळेना या नाव समाधान ॥ असी शम दम तितिक्षा उपरति श्रद्धा समाधान शमादिष्टक ॥ आतां मुमुक्षता म्हणजे जन्ममरणावेगळा कधीं होयीन आत्माराम कधीं पाहीन तो दाखवी असा सद्ररु कधीं भेटेल ॥ऐसा अनुताप रात्रंदिवस झुरणे या नाव मुमुक्षु हें चौथें साधन येणेपरी तो शिष्य चहुं साधनी संपन्न होउन सद्रुरूशिं धुंडित चालिला ॥ तो त्याच्या अपार पुण्याच्या राशी फळासि आल्या ॥ पूर्विं निष्काम कर्में ईश्र्वरार्पण केली होती ह्मणूनी त्या ईश्र्वरासी कृपा आली ॥ ऋण फेडावया सद्रुरुरूपे प्रत्यक्ष प्रगट जाहाला ततक्षणी शिष्याने साष्टांग नमस्कार केला ॥ तेव्हां स्वामी म्हणू लागले की बापा तुज कवणे गांजिले ॥ कां कष्ट झाले ॥ ते सांग ऐसें पुसतां शिष्या म्हणे स्वामी मी त्रिविध तापें फार तापलों ॥ सुखदुःखें फार जाचलो ॥ तरी ते त्रिविध ताप कोणते ॥ अध्यात्मिक ॥ अधिदैविक ॥ अधिभौतिक ॥३॥ अध्यात्मिक म्हणजे ॥ अंतःकरणी ग्रहदाराची चिंता वाहणे तेकरिता मन समाधान नाही अखंड काम क्रोध राग द्वेष उठो लागले त्यास्तव सुखदुखि होणे ॥ हा अध्यात्मिक ताप ॥ अधिदैविक म्हणजे ॥ दैवी पर्जन्यादि नाही म्हणून दुष्काळ पडला ॥ किंवा फार पर्जन्य झाला तेणेकरितां दुष्काळ खावयाशी अन्न नाहीसे जाले अथवा तो देव हा देव राखाया जोखाया नवग्रहादि पीडा जाहलि म्हणूनि सुखदुःखी होणे हा अधिदैविक ताप ॥ अधिभौतिक म्हणिजे काय ॥ शरीराचे ष्ठायी शीतज्वरादिक व्याधीचि पीडा होऊ लागली तेणेकरिता अत्यंत आहळलो ॥ हा अधिभौतिक ताप ॥ ऐसा त्रिविध तापे तापलो जन्ममरणाशी बाज आलो ॥ तरि या त्रिविध तापाशी उपशम न होय ॥ जन्म ममरणानुरूप संसारसागर तरेन आणि अंगे देव पाहेन ऐसे स्वामीने दया मजवर करावे म्हणूनि मागुती चरणाशी लागलो तेव्हा तो स्वामी कृपेचा सागर करूणेने द्रवला मग त्यासी उष्टउनी सन्मुख बैसवुन बोलता जाला ॥ बापा हे त्वंपदाचे शोधन आणि जड चैतन्याचा निवाडा हे कळल्या वेगला तुज देव दिसेना ॥ अणि मोक्ष हि होईना तरि स्वामि त्वंत्पदाचे शोधन आणि चैतन्याचे शोधन निवाडा म्हणिजे काय ॥ तरि ऐक बापा जड म्हणिजे अपणाशि नेणे दुसऱ्याशी नेणे ॥ या नाव जड ॥ आता चैतन्य म्हणिजे आपणाशि जाणिजे ॥ दुसऱ्यासी जाणे या नाव चैतन्य तो चि देव कळला म्हणजे प्रत्यक्ष मोक्ष ॥ तरि स्वामी अपणासि नेणे दुसऱ्यासी नेणे ॥ ते जड ॥ अपणासि जाणे दुसऱ्यासी जाणे ते चैतन्य सांगितले तेकरिता मज काय जाले ॥ तेव्हा स्वामी म्हणतेत तु कोण आहेस ते सांग ॥ तरि स्वामी मि दगडोबा धोंडोबा रामकृष्ण नामाचा तरि बापा हे नाम कशासि अले ॥ तरि स्वामिया देहासि नाव अले तरि हा देहे मी देहे ऐसे जाणोन दुसऱ्यास तरि नेणे जी तरि जे आपणासि नेणे दुसऱ्यासी नेणे ते काय ते जड तेव्हा देह जड की आणि कमश्ल कि भुताचे घडले की दृश्य म्हणजे जे जे दिसते त्यासि दृश्य म्हणावे तेव्हा देह दिसतो की हाडामासाने गुडाळले भुताचे फटकाळ ॥ तरि तु ह्मणसि भुताचे कैशे भुते ते कोणति तरि ऐक सांगो ॥ पृथ्वी ॥ अप ॥ तेज ॥ वायु ॥ आकाश ॥ अशे हे पंच भुते ॥ आता त्याचे विकार सांगतो ऐक ॥ श्रा ॥ छ ॥ श्री ऐसे मिळूनि भूतपचकाच्या पंचवीस विकाराचे स्छूल देह दिसते ॥ दृश्य जड आहे हे चि तू कैसा होशी ॥ जे तूं माझे देह म्हणतोस ॥ ते तु कोणें प्रकारें होतोस यालागी तू देह नव्हेस ॥ जाणते चैतन्य मात्र आहेसि ॥ तरी स्वामी मी बहिरा मी मुका मी पांगुळा मी नपुंसक ऐसा इत्यादि व्यापार करितो ॥ मि इंद्रिये होय जी ॥ तरी वाया च तुज विवरण कळेना ते ही सांगतो ॥ एक ॥ प्राणपंचक ॥ अंतःकरणपंचक ॥ ज्ञानेंद्रियपंचक ॥ कर्मेंद्रियपंचक ॥ आणि विषयपंचक ॥ कामकर्म ॥ तम असे हे अष्टपुरीचे मिळोनि लिंगदेह याचा विस्तार सांगतो एका ॥ दाहा इंद्रिय पंच प्राण पंच विषय मिळोनि येक ची अंतःकरण ॥ मन बुद्धि चित्त अहंकार नामे व्यवहार करिते निर्विकल्प स्फुरते ते अतःकरण संकल्पविकल्पात्मक ॥ मन निश्र्चयात्मिका बुद्धि आठव विसरात्मक चित्त ॥ मीपणात्मक अहंकार ॥ जे इंद्रियद्वारा व्यापार करिते ते अंतःकरण ॥ व्यान प्राणाचे आधारे श्रोत्र इंद्रियी रिघोनि शद्ध विय घेउनि वाचेने बोलतो ॥ मन समान प्राणाचे आधारे त्वचा इद्रियी रिघोनि स्पर्श विषय घेउनि हाते घेते देते ॥ बुधि उदान प्राणाच्या आधारे चक्षुरीद्रियी रिघुनि रूपविषय घेऊ पाहूनि पायी जाते येते ॥ चित्त प्राणाचे आधारे जिव्हेंद्रियी रिघोनि रसविषय घेउनि गुह्यद्वारा मुत्रोत्सर्ग करिते ॥ अहंकार अपानप्राणाचे आधारे घ्राणेद्रिय रिघूनि गंधविषय धुऊनि गुदद्वारा मलोत्सर्ग करिते ॥ असे इद्रियद्वारा अंतःकरण चतुष्टय व्यवहार करित असता तयाशी जाणता वेगळा आहेशि ॥ हे अवघी जैसी स्छूल भूते आणि स्छूल भूताचे अंश जैसी जड आणी दृश्य तैसी हे ही जाण ॥ इंद्रिय आपणासी नेणती दुसऱ्यास ही नेणती ॥ तैसे ची प्राण तैसे चि विषय अंतःकरणपंचक ही तैसे चि यालागली हे जड ॥ आणि तुज दिसताहेत ॥ प्रत्यक्ष ह्मणशी माझे कान माझे डोळे माझे तोंड माझे नाक माझे हात माझे पाय ॥ माझे प्राण माझें मन बुद्धि चित्त अभिमान ऐसे जे जे माझे म्हणशी ॥ ते तु कैसा होसी ॥ यालागली तु या लिंग देहाहूनि वेगळा होय की नव्हेस ॥ तरि स्वामी मी हे नेणे मला कळेना तरी हे नेणे ॥ असे काश्याने ह्मणतोशि ॥ येक तु जाणता आहोशि ॥ ह्मणवोनि मी नेणें ह्मणतोशि ॥ जो स्वये वेडा तो काय मी वेडा ह्मणेल ॥ तरि न ह्मणेन मी वेडा ऐसा तुज कळते की नाही कळते तेव्हा तु जाणता नव्हेशि तरि होय जी मी नेणे ॥ असे नेणवेशी जाणतो ते नेणीव ह्मणजे आज्ञान ॥ ते चि तुझे कारणदेह ॥ जन्ममरणदायक ॥ हे चि या अज्ञानाचा निरास झाले ह्मणजे तो चि मोक्ष यालागि तुज ते अज्ञान दिसते की ॥ तरि दिसते यालागी नेणीव ह्मणजे अज्ञान ते तुझे कारणदेह ॥ तू याहूनी वेगळा जाणता चैतन्यमात्र आहोशि ॥ तरी स्वामी मी केवल ज्ञप्तिमात्र आत्मा आहे ॥ आत्मा आहे ऐसे म्हणणे ते ज्ञान ॥ ते ज्ञानवृत्ती हि मजमध्ये दिसत नाही तरी भला बापा ॥ जे या देहत्रयासी जाणते ते ज्ञान ॥ तुझे महाकारण देह ॥ जैसी ते तीन्ही जड आणी दृश्य तैसे चि हे ही जडदृश्य गडिया जाणपणावेगळा ॥ शुद्ध शांत चैतन्यमात्र आहेसि जैसें हे चारी देह दृश्य तैसे चि या चहु देहाच्या च्यार अवस्छा ॥ चार अभिमानी ॥ चार भोग ॥ चारही चाचा ॥ चारही स्छान ॥ चारही मात्रा ॥ चारही गुण ॥ ऐसे आहे ॥ तेही जडदृश्य ॥ परंतु त्याचे विशद विवरण करून सांगतो अक ॥ जागृती ॥१॥

स्वप्न २ सुषुप्ती ३ तुर्या ४ आवच्छा ॥ अभिमानी ॥४॥ विश्र्व १ तैजस २ प्राज्ञ ३ प्रत्यगात्मा ४ भोग ४ स्छूल १ प्रविविक्त २ अनंद ३ परमानंद ४ स्छान ४ नेत्र १ कष्ठ २ हृदय ३मूघ्ना ४ वाचा ४ वैखरी १ मध्यमा २ पश्यंती ३ परा ४ गुण ४ रज १ सत्व २ तम ३ शुद्धसत्व ४ मात्र ४ अकार १ उकार २ मकार ३ अर्ध मात्रा ॥४॥

याचे विवरण सविस्तर सांगतो ऐक ॥ असे मिळोनि देहचतुष्टय हे त्वंपद शबल वाच्यांश ॥ हे क्षर आणी तत्पद शुद्ध लक्ष्यांश ॥ हे अक्षर असा या देह चतुष्टयाचा निरास त्वंपद शबल वाच्यांश गेला ॥ जीवन हारपले ॥ केवल चैतन्यमात्र तु आत्मा आहेशि ॥ आता तत्त्पदाचे शोधन ॥ सृष्टिचा क्रम सांगतो ऐक ॥ या सृष्टिहुनि पूर्वी केवल शुद्ध चैतन्यमात्र स्वानंदघन परमात्मा असतां ॥ अहं ब्रह्मास्मी म्हणूनि स्फूर्ति जाली ॥ त्या स्फूर्तिचे नाम मूल प्रवृति ॥ महामाया ॥ या स्फूर्तिरूप दर्पणि जे चैतन्य बिंबले या प्रतिबिंबाचे नाम ईश्र्वर ॥ या ईश्र्वरासि जग व्हावे असी इच्छा जाली ॥ या इछेचे नाम महत्तत्व गुण साभ्य माया त्या मायेशी जगद्रूप मी च होयीन म्हणोनि संकल्प उठला ॥ त्या संकल्पाचे नाम त्रिविध अहंकार ॥ असे जे जे होत चालले त्या त्याशि तो प्रतिबिंब उपाधी ईश्र्वर व्यापिता जाला ॥ जैसे घटापूर्वी आकाश होते ते जे जे गाडगे निपजू लागले ॥ त्या त्यासि आकाश व्यापक जाले तैसा हा ईश्र्वर ॥ जे जे तत्त्व निपजू लागले त्या त्याशी व्यापू लागला ॥ ऐसा त्रिविध अहंका जाल त्यापासून त्रिगुणात्मक ब्रह्मा विष्णु महेश्र्वर जाले ॥ आणि दिशा वायु सूर्य वरुण अश्र्विनीकुमार अग्नि इंद्र चंद्र उपेंद्र नैऋत्य असे देवतामय मिळोनि ईश्र्वराचे लिंगदेह ॥ या नाव हिरण्यगर्भ ॥ तरि ते कसे ऐक ॥ जैसे पिंडी दाहा इंद्रिये पंच प्राण अतःकरणपंचक तैसे चि येथ ऐक ॥ अंतःकरण विष्णु ॥ चंद्रमा मन ॥ बुद्धि कमलासन ॥ चित्त नारायण ॥ अहंकार रुद्र ॥ ऐसे अंतःकरणपंचक ॥ आता इंद्रियविकार ॥ त्वचा वायु ॥ चक्षु सूर्य ॥ जिव्हा वरुण ॥ घ्राण अश्र्विनीकुमार ॥ मुख अग्नि हात इद्र ॥ पाद उपेंद्र ॥ गुह्य प्रजापति ॥ गुद नैऋऋत्य ॥ ऐसे दाहा इद्रिय ॥ इछारूप वर्तणे ते चि प्रसिद्ध पंचप्राण ॥ ऐसे मिळोनि हे लिंगदेह ॥ इश्र्वराचे जाले ॥ परंतु स्छूल देहावेगळा भोग न घडे ॥ म्हणून विराट निर्माण केले ॥ ते कैसे ऐक ॥ ये ये कर्तुमकर्ते ब्रह्माविष्णुमहेश ॥ ब्रह्माचा रजोगुण ॥ विष्णुचा सत्वगुण ॥ रुद्राचा तमोगुण ॥ रजोगुणाची क्रियाशक्ति सत्वगुणाची ज्ञानशक्ति ॥ तमोगुणाची द्रव्यशक्ति ॥ या द्रव्यशक्तीपासून पंच महाभूजाली ॥ क्रियाशक्ति ज्ञानशक्ति द्रव्यशक्ति ऐसे जाले ॥ ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ५ अंतःकरण ५ महाभूते ५ या पंचभूताचे अंश ते पिंडी इद्रिये ॥ अंतःकरण पंचक दैवते ॥ पंच प्राण ॥ पिडीचे अंश ते हे मिळोनि हिरण्यगर्भ जाण विराटू म्हणिजे ॥ सप्त पाताळ सप्त स्वर्ग ऐसे चौदा भूवनीचे मिळोनि विराट्देह ॥ ते ऐक ॥ नाभीपासून ऊर्ध्वभाग त सप्तस्वर्ग ते अक ॥ भूलोक नाभिस्छान सत्यलोक ब्रह्मरंध्रस्छान असी सप्त भुवने ऊर्ध्वभाग ॥ आता सप्तपाताळ भुवने अधो भाग ते अक ॥ अतल कटि स्छान ॥ वितल जानु स्छान ॥ सुतल गुढगे स्छान ॥ रसताल पोटऱ्या स्छान ॥ तलातल घोट स्छान ॥ महातल पाउले ॥ पाताळ तळवे स्छान ॥ ऐसे सप्तभुवन अधोभाग ॥ या मध्ये सप्तसमुद्र पोट पर्वतादिक पाषाण ते अस्छी ॥ पृथ्वी मांस ॥ वृक्षलता रोमावळी नद्या त्या नाडी ॥ पर्जन्यवृष्टि रेत नक्षत्र त्या माळा ॥ यमलोक त्या दाढा ॥ जीवराशी ते क्रिमि किटक ॥ असे मिळोनि विराट् देह ॥ एवं चारी देह ईश्र्वराचे जाले ॥ आता त्याची आवस्छा चार ४ गुण ४ अभिमानि ४ ॥ स्छाने ४ मात्रा ४ त्या सांगतो अक ॥ ऐसे चारि देहात्मक मिळोनि देह तत्पद शबल वाच्यांश ॥ याचे अहंपणे मि कर्ता मि भर्ता मी हर्ता असे म्हणणे ॥ त्या नाव शिव या विराटी चहु देह निरसन केलिया उरले ते तत्त्पद शुद्ध लक्षांश ते कळले तेव्हा शिपण हारपले ॥ आता असिपद जे जहदजहलक्षणे जाणीजे ॥ जहल्लक्षणा ह्मणिजे त्याग ॥ अजहल्लक्षण म्हणजे अत्याग ॥ पिडाद्विक शबल वाच्यांश टाकणे या नाव जहत् ब्रह्माडिचा ईश्र्वर कर्ता जो तो की असे म्हणने या नाव अजहत् ॥ आता त्वंपद शबल वाच्यांश ॥ आणि तत्पद शबल वाच्यांश ॥ असे उभय या शचल वाच्यांश टाकणे ॥ या नाव जहत् ॥ आता त्वंपद शुद्ध लक्ष्यांश आणि त्वपद शुद्ध लक्ष्यांश हे उभय लक्ष्याश न टाकणे या नाव अजहत् ऐसे जहदजहलक्ष्णे येथील पिंडात्मक जीवपण निरसले ॥ तेथील ब्रह्माडात्मक शिवपण निरसले ॥ जीवशिवपणविरहित येकात्मता या नाव असिपद ॥ ते असिपद शुद्ध चैतन्य मात्र ॥ तु ते आंगे आहेसी होय की नव्हे ॥ तरि स्वामी मी ते चि म्हणणे साहेना ॥ म्हणूनि पूर्ण अनुभवाच्या प्रेमे स्वामीसी प्रणिपातु केला स्वामिनि त्यासि आल्हादोनि क्षेमालिंग दिल्हे मग म्हणू लागले की बापा आता प्रत्यक्ष आपुला प्रळय आपण पाहावा ॥ की तरि होय स्वामी दाखवावा ॥ तरि दाखवितो पाहे ॥ आधी पिडिचा प्रळय देहांत समयी इंद्रिय ॥ श्रोत्र वाचा शब्द विषयासहित अंतःकरणी मळिते ॥ अंतःकरण व्यान प्राणाच्या ठाई मिळते ॥ त्वचा हात स्पर्श विषयसहित मनाचे ठाई मिळते ॥ मन समान प्राणाच्या ठाई मिळते चक्षु पायरूप विषयसहित बुद्धिच्या ठाइ मिळते ॥ बुद्धि उदान प्राणाच्या ठाइ मिळते ॥ जिव्हा गुह्य विषयासहित चित्ताचे ठाइ मिळते ॥ चित्त प्राणचे ठाई मिळते ॥ घ्राण गुद गंध विषयासहित अहंकारी मिळते अहंकार आपानाचे ठाइ मिळते ॥ अपान प्राणाचे ठाइ मिळते ॥ प्राण उदानाचे ठाइ उदान समानच ठाइ समान व्यानाच ठाई व्यान क्रियाशक्ती रजोगुणी मिळते ॥ रजोगुण ब्रह्माच्या ठाइ मिळते ॥ मग देह निश्र्चेतन पडते ॥ हा पिडीचा प्रळयासी मूळ अज्ञान गेले असले तरी पूर्ण चैतन्य मिळेल ॥ जरी अज्ञान गेले नसले तरी आणीक जन्म मरणीशी अधिकारी होवोन चौऱ्यांशी लक्ष योनीच्या ठाई सुखदुखे भोगावे लागतात ॥ येणेपरी पिडीप्रळय ॥ अता सृष्टीचा प्रळय अक हे प्रसिद्ध पंच महाभूते ॥ पृथ्वी १ आप २ तेज ३ वायु ४ आकाश ५ त्यामध्ये पृथ्वी दशसहस्र लक्ष योजने विस्तीर्ण त्याचे शतगुणिने समूद्र ॥ याचे दशगुणीने वडवानल ॥ याचे दशगुणीने वायु ॥ वायूचे दशगुणीने आकाश ॥ याचे दशगुणीने अहंकार ॥ त्याचे दशगुणीने महत्तत्व ॥ त्याचे दशगुणीने मूलप्रकृती ॥ मूलप्रकृतीहुनी ॥ अपरिमित चैतन्य मात्र ज्ञानघन ते तु होयस की तरि होय जी ॥ असे असता पृथ्वीचे ठाई ॥ कितेक वर्षे अनावृष्टी जाली ॥ बारा सूर्य तपू लागले तेणे करिता जितुक्या वनस्पति तितुक्या जळून गेल्या ॥ तो कितेक वर्ष पर्जन्य मुसळाधारी वर्षू लागला ॥ तणें पृथ्वी समग्र विरूनि समुद्रात गेली ॥ कितेक वर्ष जलमयेच होते ॥ त्या जळाशी वडवानळ शोषित आला तेणे जल शोधुन कितेक वर्षे आग्नीच होता त्या अग्नीसी वायु शोषुन कित्येक वर्षे वायुच होता ॥ वायुस आकाश गिळिले ॥ त्या आकाशी द्रव्यशक्तिने गिळिले ॥ द्रव्यशक्ति वामसगुणी मिळाली ॥ तामस गुण आणी रुद्र अहंकारी मिळाले ॥ आता देवतामय जे अंतःकरणपंचक ते विष्णुच्या ठाइ मिळाले विष्णु सत्त्वगुणी सत्त्वगुण अहंकारी मिळाल ॥ असे त्रिविध अहंकृतिंमध्ये ब्रह्मा विष्णु रुद्र मिळाले ते त्रिविध अहंकृति महतत्वी मिळाले ते महत्तत्व मूलप्रकृतिमध्ये मिळाले ॥ ते मूळमाया शुद्ध चैतन्यी मिळाली यावरी मग चि तु होवोनि निर्विकल्प स्फुरणातीत स्फुरणे राहातोसि होय की ॥ तरि होय स्वामी ॥ स्वामींचे कृपेनें माझे म्या आत्त्मस्वरूप वळखून उत्त्पत्ती स्छिति प्रळय प्रत्यक्ष म्या पाहिले ॥ आता स्वामीच्या उपकारासि काय उत्तिर्ण होवू म्हणूनि प्रेमाचे निर्भरे सद्ददित होउनि साष्टांग प्रणिपात केला स्वामीनी त्यासी हृदयीधरूनि आलगिले ॥ म्हणू लागले की बापा हे स्छिति जिरवावया काही येक सांगतो अक संमती शंकराचा याची वेदवचन येणेरीतीने जाणोनि राहणे

॥श्र्लोक॥

ब्रह्मज्ञानमयो हि केवलनिराभासोहमात्मा स्वयं ॥ आनंदोहमनंतएव सकलो ज्ञानामृतोहंशिवः ब्रह्मानंदुसुधाब्धिरद्वयमहं विश्र्वं भवेद्वीचिवत् पूर्णानदमहं विभाति सततं ब्रह्मात्वहं नान्यथा ॥१॥ वेदवाक्यप्रज्ञानमानंदं ब्रह्म इति ऋग्वेदो वदति ॥ अहं ब्रह्मास्मि इति यजुर्वदति ॥ तत्वमसीति साम वेदो वदति ॥ सत्यं ज्ञानमनंत ब्रह्म अथर्वणवेदो वदति ॥ शास्त्रदृष्टिगुरोवाक्यं तृतीयं चात्मानिश्र्चितं ॥ त्रिविधं यो विजानाति स मुक्तो जन्मबंधनात् ॥१॥ असे प्रकार वेदोक्त जाणूनि आत्मरूप अनुभवणे ॥ जरा मरण देहधर्म ॥ क्षुधा तृषा प्राणधर्म ॥ सुख दुख मनोधर्म असे जाणून हे धर्म साहावे ॥ आपुल्या माथा न घेऊनि अपार अबाधित प्रारब्ध दग्ध पट न्याय देह ॥ असे दहासि प्रारब्धासि गाठी घालोनि सद्रुरुभजनि काळक्षेप करी होत्साता कृतकृत्यत्त्वं प्राप्त इति सित्धं ॥

॥ इति श्रीमत्परमहंस काव्यार्थ श्रीमत्सुर्णानद नाथ लक्ष्मीनारायणानूचर सिवरामच्यरितायां पंचिकरणं संपुर्ण ॥ श्रीगुरुआनंदरामानद नाथारपणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP