नक्षत्रस्वामी - फलश्रुति

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


हे नक्षत्रचरितामृताचे पेय । शीतल जान्हवीचे तोय ।

नित्य सेविता अभय । दे भवरोगापासून ॥१॥

ते सावकाश सेवावे । हृदयी भरून उरवावे ।

मनन , चिंतन करावे । भक्तिभावे ॥२॥

हे तीव्र भक्तिरसायन । पापक्षालनाचे साधन ।

भवरोगाचे उच्चटन । करेल त्वरीत ॥३॥

जळतील पापे जन्मांतरीची । उघडतील द्वारे मुक्तिची ।

विवेक आणि परमार्थाची । जाणीव होईल ॥४॥

सोमवारी , शुद्ध एकादशी । आषाढ , श्रावण अश्विन मासी ।

दशमी तिथे विशेषी । करावे पारायण ॥५॥

दुःख , दारिद्र्य , ताप , संताप । व्यसने , दुराचरणाचा व्याप ।

शांत होतील सारे कोप । करता पारायण ॥६॥

दुसर्‍याचे भले चिंतावे । स्वजन आपले धरावे ।

बहुजनासी सख्य व्हावे । ऐसी मति होईल ॥७॥

अन्याय कोठे साहो नये । प्रतिकाराविण राहो नये ।

आपण न्याय सोडो नये । ऐसी मति होईल ॥८॥

नित्य पूर्वजांसी स्मरावे । वृद्ध , वडिला रक्षावे ।

लहानाचे भले व्हावे । ऐसी मति होईल ॥९॥

या चरित्राचे नित्यवाचन । दुरिताचे करील हरण ।

सुखी ठेवो नारायण । ऐसी मति होईल ॥१०॥

ही नक्षत्रचरित्राची पूर्णाहूति । सिधराजे दिली मति ।

मातृपदी ठेवतो कृति । अत्यादरे वसंत ॥११॥

आता अवभृत स्नान । करोन चित्ती समाधान ।

काव्यमख संपन्न केला असे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP