मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
अमोल काया जाइल वायां ...

रामजोशी - अमोल काया जाइल वायां ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


अमोल काया जाइल वायां जशी कांच की फ़ुटे पटकन ॥

उभा काळ विक्राळ रक्षितो वेळ होय सावध चटकन ॥ध्रु०॥

कृतिं त्रेतिं व्यापारीं होती आयुष्याची बहु भरती ।

कलिमाजी शतवर्षे नेमिलीं परी तिहीं न होती पुरती ।

बारा चौदा पंधरा विंशती पंचविसामधी किती मरती ।

मागें मेले पुढेहि मरतील कोण करिल त्यांची गणती ।

आजा काका मामा मेला त्यांची साक्षी घ्या चित्तीं ।

त्यांचे शोकें दु:खित झालां पुढें तुम्हाला तीच गती ।

देह आपुला जाईल यास्तव धरा सोय कांहीं झटकन ।

अमोल०॥१॥

हत्ति घोडे महाल खजिना कोणाची मंदिर माडी ।

शेपटिं जाइल कांहीं न राहिल काय धरुनि तिची गोडी ।

तारुण्याच्या भरेम घालसिल विषयामध्यें दाटून फ़ुगडी ।

अहा रांडेच्या समय कठिण मग जेव्हा काळ करकर रगडी ।

सुंदर सुंदर रंभा जैशी तिची मनामध्यें बहु आवडी ।

जबरदस्त हा पाश स्त्रियेचा जशि कवाडा कुलुप कडी ।

या भवसागरी माया मगरी पाय धरुनि ओढिल मटकन ।

जशिं नंगी समशेर देहिचे तुकडे करि कटकन ।

अमोल काया जाइल वाया ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP