मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
क्षणभरी चाल माझ्या सदन...

रामजोशी - क्षणभरी चाल माझ्या सदन...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


क्षणभरी चाल माझ्या सदनासी । सख्या हरि पाहूं वाटते दिन

रजनीं-तुझ्या वदनासी ॥ध्रु०॥

तळमळ काय माझी नेणसी । कीं सखया ।

तनु किती रोडताजी । जाणसी की सखया ।

याची करु काय बाजी । स्त्री जनकी सखया ॥

ही परसांत भाजी । तुझी या की सखया ।

अरे कांहीं जाणतील ही । नसे दया मदनासी ॥१॥

मनी माझ्या हौस मोठी । बुडविशी कीं सखया ।

अशी मती काय खोटी । धरलिशीं कीं सखया ।

भय तर फ़ार पोटी । शिरलें कीं सखया ।

हिर्‍यालाही गारगोटी । म्हणशील की सखया ।

अरे मज दान देरे । रतीपतीच्या कदनासी ॥२॥

पदकमळाशीं माथा ।

वाहीन कीं सखया सोसूं नये प्राणनाथा । अनुचित कीं सखया ।

विषयाचा काय गाथा । अनुचित कीं सखया ।

जाऊं द्या हा काय चोया । म्हणू नये की सखया ।

कविराया तूं गजपतीच्या पहा वदनासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP