मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
लाजुनिया न परतला - हा ...

रामजोशी - लाजुनिया न परतला - हा ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


लाजुनिया न परतला - हा हरि दासी संगे रतला ॥ध्रु०॥

ही मसलत अशी अशी त्याला सुचली ।

नायकिली कधीं अघटित उचली ।

वाईट कुबडी काय मनीं रुचली ।

खोटी चेटींसाठी गेला वाईट म्हणावया । मथुरेला ॥१॥

आम्हावरी हरी आतां बाई विटला ।

नंदयशोदा यांसही तुटला ।

येणें पुनरपि संशय फ़िटला ।

ज्याची त्याची साच वाणी हा । उजवाया लागला ॥२॥

ठाऊक नव्हता असा हरि कपटी ।

केवढी याणें दिधली आपटी ।

यादव कुळींचें यश हा निपटी ।

जाती गोती बुडविली गाया । कविराया म्हणे आला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP