श्रीकेशवस्वामी - भाग १७

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ४८३ वें

विषयाचें गोडपण जेणें सुखें भासे । तें सुख सेवीतां विषय ग्रासे ॥ध्रु॥

यापरी निजसुखें विषय सेवी ॥ समाधिसुखासी वांकुल्या दावी ॥१॥

विषय कोरडा खडखडित केवळ ॥ विषयाचें गोडपण परब्रह्म निःखळ ॥२॥

गुरुकृपें केशवीं निजबोधें सोहळे ॥ विषयामाजीं समाधी नुखळे ॥३॥

० पद ४८४ वें

नामरूपाचा भेद हा उठी । स्वरूपी जीवदृष्टी प्रवेशेना ॥ध्रु॥

विषयांची बाधा बाधी प्रबुद्धा । जंव त्या परमानंदा पाविजेना ॥१॥

स्त्रीपुरुषाकृति तोंचिवरी भासती । जंव ते आत्मस्थिति

विवळेना ॥२॥

प्रपंचाचें भान तोंचि स्फुरे जाण । जों आपण परतोन पाहिजेना ॥२॥

जन्म-मृत्यु भ्रांती तोंचि यातायाती निर्गुणाची प्राप्ती लाहिजेना ॥४॥

मायेचा पडपा तोचि भुली जें लाया । केशवीं गुरुकृपा पाविजेना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP