श्रीकेशवस्वामी - भाग १३

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ३९० वें

प्रपंच सांडुनी परमार्थ-साधन । साधावया मन उदित झालें ॥ध्रु॥

भव-वस्तुवेगळा प्रपंच हे नाहीं । सांडावें तें कांई तेथें आतां ।

प्रपंच तो काय परमार्थ तो काय । विचारूनी पाहे मनामाजी ॥१॥

प्रपंचाचें मूळ ठेवितांची ठाईं । परमार्थ पाहीं उघड भासे ।

सांडी मांडी तेथें सहजची राहिलें । साधनें पातला आपेआप ॥२॥

वस्तुवेगळा प्रपंच न कळोनि म्हणती । पाहतां आदि अंतीं वस्तुची असे ।

गुळेसी गोडी नये नीवडीतां । तैसे परी पाहतां केशव म्हणे ॥३॥

० पद ३९१ वें (गोपगीता)

रूपहीन त्या रूप लाविती । नामशून्य त्या नाम ठेविती ॥

नित्य पूर्ण त्या लाविती तनू । भाग्य मंद कीं मूढ हा जनू ॥१॥

सर्वसंग जे शीघ्र त्यागिती । सर्व रूप ते ब्रह्म भोगिती ॥

पावती सदा आनंद सर्वदा । द्वैत स्वप्न्नीं ते नेणती कदा ॥२॥

सर्व देव हा भासला जया । राव रंक हे सारिखे तया ॥

अन्यथा नसे भाव हा मनीं । देव पावले देव होउनी ॥३॥

गर्व सांडुनी लक्षिती हरी । मोक्षमंदिरी राज्य हा करी ॥

द्वैत कुंसरी नाठवे कदा । पाविजे सदानंद-सं० पदा ॥४॥

मस्करी दया ज्यावरी करी । त्याचिया मतें विश्र्व मस्करी ॥

मस्करीक साच तो नव्हे । मस्करी-देशा त्सासि नाठवे ॥५॥

शून्यरूपिणी देवकामिनी । आदिकाळिका विश्र्वमोहिनी ॥

नांव ना कळी त्सासि हें सळी । देव आकळी ईस तो गिळी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP