श्रीदुर्गासप्तशती - सप्तमोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - सप्तमोऽध्याय:

सप्तमोऽध्याय:
ध्यानम्
ॐ ध्यायेयं रत्‍नपीठे शुककलपठितं श्रृण्वतीं श्यामलाङ्‌गीं
न्यस्तैकाङ्‌घ्रिंसरोजे शशिशकलधरां वल्लकीं वादयन्तीम् ।
कह्राराबद्धमालां नियमितविलसच्चोलिकां रक्तवस्त्रां
मातङ्‌गीं शङ्‍खपात्रां मधुरमधुमदां चित्रकोद्‌भासिभालाम् ॥
'ॐ' ऋषिरुवाच ॥१॥
आज्ञप्तास्ते ततो दैत्याश्चण्डमुण्डपुरोगमा: ।
चतुरङ्‍गबलोपेता ययुरभ्युद्यतायुधा: ॥२॥
ददृशुस्ते ततो देवीमीषद्धासां व्यवस्थिताम् ।
सिंहस्योपरि शैलेन्द्रश्रृङ्‌गे महति काञ्चने ॥३॥
ते दृष्ट्‌वा तां समादातुमुद्यमं चक्रुरुद्यता: ।
आकृष्टचापासिधरास्तथान्ये तत्समीपगा: ॥४॥
तत: कोपं चकारोच्चैरम्बिका तानरीन् प्रति ।
कोपेन चास्या वदनं मषीवर्णमभूत्तदा ॥५॥
भ्रुकुटीकुटिलात्तस्या ललाटफलकादद्रुतम् ।
काली करालवदना विनिष्क्रान्तासिपाशिनी ॥६॥
विचित्रखट्‌वाङ्‌गधरा नरमालाविभूषणा ।
द्वीपिचर्मपरीधाना शुष्कमांसातिभैरवा ॥७॥
अतिविस्तारवदना जिव्हाललनभीषणा ।
निमग्नारक्तनयना नादापूरितदिङ्‌मुखा ॥८॥
सा वेगेनाभीपतिता घातयन्ती महासुरान् ।
सैन्ये तत्र सुरारीणामभक्षयत् तद्‌बलम् ॥९॥
पार्ष्णिग्राहाङ्‌कुशग्राहियोधघण्टासमन्वितान् ।
समादायैकहस्तेन मुखे चिक्षेप वारणान् ॥१०॥
तथैव योधं तुरगै रथं सारथिना सह ।
निक्षिप्य वक्त्रे दशनैश्‍चर्वयन्त्यतिभैरवम् ॥११॥
एकं जग्राह केशेषु ग्रीवायामथ चापरम् ।
पादेनाक्रम्य चैवान्यामुरसान्यमपोथयत् ॥१२॥
तैर्मुक्‍तानि च शस्त्राणि महास्त्राणि तथासुरै: ।
मुखेन जग्राह रुषा दशनैर्मथितान्यपि ॥१३॥
बलिनां तद् बलं सर्वमसुराणां दुरात्मनाम् ।
ममर्दाभक्षयच्चान्यानन्यांश्‍चाताडयत्तथा ॥१४॥
असिना निहता: केचित्केचित्खट्‌वाङ्‌गताडिता: ।
जग्मुर्विनाशमसुरा दन्ताग्राभिहतास्तथा ॥१५॥
क्षणेन तद् बलं सर्वमसुराणा निपतितम् ।
दृष्ट्‌वा चण्डोऽभिदुद्राव तां कालीमतिभीषणाम् ॥१६॥
शरवर्षेर्महाभीमैर्भीमाक्षीं तां महासुर: ।
छादयामास चक्रैश्‍च मुण्ड: क्षिप्तै: सहस्रश: ॥१७॥
तानि चक्राण्यनेकानि विशमानानि तन्मुखम् ।
बभुर्यथार्कबिम्बानि सुबहूनि घनोदरम् ॥१८॥
ततो जहासातिरुषा भीमं भैरवनादिनी ।
काली करालवक्त्रान्तर्दुर्दर्शदशनोज्ज्वला ॥१९॥
उत्थाय च महासिं हं देवी चण्डमधावत ।
गृहीत्वा चास्य केशेषु शिरस्तेनासिनाच्छिनत् ॥२०॥
अथ मुण्डोऽभ्यधावत्तां दृष्ट्‌वा चण्डं निपातितम् ।
तमप्यपातयद्‌भूमौ सा खङ्गाभिहतं रुषा ॥२१॥
हतशेषं तत: सैन्यं दृष्ट्‌वा चण्डं निपातितम् ।
मुण्डं च समुहावीर्यं दिशो भेजे भयातुरम् ॥२२॥
शिरश्‍चण्डस्य काली च गृहीत्वा मुण्डमेव च ।
प्राह प्रचण्डाट्टहासमिश्रमभ्येत्य चण्डिकाम् ॥२३॥
मया तवात्रोपह्रतौ चण्डमुण्डौ महापशू ।
युद्धयज्ञे स्वयं शुम्भं निशुम्भं च हनिष्यसि ॥२४॥
ऋषिरुवाच ॥२५॥
तावानीतौ ततो दृष्ट्‌वा चण्डमुण्डौ महासुरौ ।
उवाच कालीं कल्याणी ललितं चण्डिका वच: ॥२६॥
यस्माच्चण्डं च मुण्डं च गृहीत्वा त्वमुपागता ।
चामुण्डेति ततो लोके ख्याता देवि भविष्यसि ॥ॐ॥२७॥
इति श्रीमार्कंण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्मये
चण्डमुण्डवधो नाम सप्तमोऽध्याय: ॥७॥
उवाच २, श्‍लोका: २५, एवम् २७, एवमादित: ४३९ ॥
- श्री कालिका विजयते -

ध्यान: - रत्‍नसिंहासनावर बसून, पोपट-मैनेशी हितगुज करून रमणारी श्यामवर्णीय देवी आपला एक पाय कमल-पुष्पावर ठेवून, गळ्यात कल्हार (कण्हेरी) पुष्पांची माळ धारण करून वीणा वाजवते आहे. तिने घातलेली रक्‍तवर्णीय चोळी घट्टपणे रुतली असली तरी सौंदर्यमय दिसते. लालरंगाचे पाटव (साडी), हाती शंखपात्र, सुरापानाने नशायुक्त आणि कपाळी चंद्र-बिंदी अशी मातंगीदेवी आमचे रक्षण करो.
ऋषी म्हणाले, "अशा प्रकारे दैत्यराजाने आज्ञा फर्मावल्यावर चण्ड-मुण्ड हे राक्षसवीर आपल्या महाबलाढ्य चतुरंग सेनेसहित देवीशी युद्ध करण्यासाठी रणभूमीवर आले. ॥१।२॥
नगराज हिमालयाच्या उत्तुंग सुवर्णशिखरांवर सिंहावर बसलेली देवी त्यांनी पाहिली. तिच्या मुखावर त्या वेळी हलकेसे स्मित विलसत असलेलेही त्यांना दिसले. ॥३॥
देवीला तेथे पाहिल्यावर दैत्यसेन्याने आपापली आयुधे सांभाळली, आपल्या धनुष्यांच्या प्रत्यंचा ताणल्या, तलवारी उपसल्या ते देवीशी युद्धास सज्ज झाले. ॥४॥
दैत्य-सैन्याची ही अरेरावी व मुजोरी पाहून देवी अग्निकाही संतप्त होऊन खवळली. त्या रागाने तिच्या मुखावर काळी झाक पसरली. ॥५॥
तिने आपल्या भिवया वक्र केल्या, ताणल्या, मुख विस्तारले, डोळे भयानक आरक्त केले व करालवदना असे भीषण स्वरूप घेऊन तलवार व पाश हाती घेऊन दैत्य समाचाराला काली स्वरूपाने सज्ज झाली. ॥६॥
विचित्र खट्‌वाङ्‌ग (लाकडी दंडुका) धारण करून, चित्त्याच्या कातड्याची साडी नेसून, गळ्यात नररुंडमाला घालून ती कालिका अवतीर्ण झाली. तिच्या शरीराचे मांस वाळलेले, अस्थिचर्म बाहेर लोंबणारे, जीभ लवलवती अशी कालिका भीषण दिसत होती. ॥७॥
प्रचंड स्वरुपाने जबडे विस्फारून त्यांतील अती भयानक दिसणार्‍या लळलळत्या जिभा, डोळ्यांत रक्त उतरून खुनशीपणा आलेला व खोल गेलेले डोळे, आपल्या प्रचंड आणि भीषण आरोळ्यांनी आसमंत थरारून टाकणारी काली रणात उतरली. ॥८॥
अत्यंत चपळाईने व वेगाने आपल्या अनेक हातांमधील निरनिराळी शस्त्रे एकावेळी अनेकांवर चालवून, हातात सापडेल त्या शत्रूला खाऊन टाकून दैत्य-सैन्यात कालीने उत्पात मांडला. ॥९॥
सारथी, सारथ्याचे मागचा सेनानी, घंटानाद करणारे घंटिक, हाती अंकुश घेऊन हत्तींना चालविणारे माहुत, हत्ती, घोडे, अनेक वीर त्यांच्या शस्त्रास्त्रांसहित त्यांना पकडून कालीने त्यांना खाऊन टाकण्याचाच सपाटा चालविला. ॥१०॥
हत्ती, घोडे, वीर, रथी, सारथी, सैनिक आणि समोर दिसेल त्याला या प्रकारे आपल्या विक्राळ मुखात घालून आपल्या विक्राळ व आसुरी दाढांनी काली भयानकपणे चावून खात रगडीत होती. ॥११॥
कुणा एका दैत्यवीराला केसांना धरून, कुणाचे मुंडके पकडून, कुणाला टाचांखाली रगडून, तर कुणाला धक्क्यांनी, ठोशांनी लोळवीत काली शत्रुसैन्यात गोंधळ घालीत होती. ॥१२॥
काली शस्त्रे टाकून पळणार्‍या वीरांना तर खात होतीच पण त्यांची शस्त्रेही आपल्या तीक्ष्ण आणि विकट दाढांनी चूर्ण करीत होती. ॥१३॥
देवी कालीने याप्रमाणे महादैत्याचे बल व त्याची बलशाही सेना, त्यांचे दुराचारी सेनानी व योद्धे यांना खाऊन टाकले, चिरडून टाकले, व कित्येकांना तिच्या अक्राळविक्राळ स्वरूपाने भीती दाखवुन मार देऊन पळवून लावले. ॥१४॥
कित्येक राक्षसगण तलवारीला बळी पडले तर काही खट्‌वाङ्‌गाने मारले, तर कित्येक दैत्यवीर कालीच्या भयानक सुळक्यांनी आघात झाल्याने मरण पावले. ॥१५॥
अशा प्रकारे सर्व दैत्यसैन्याचा संपूर्ण विनाश झालेला पाहून, सर्व राक्षस धारातीर्थी पडलेले पाहून चण्ड राक्षसवीर कालीच्या अंगावर शस्त्रे घेऊन धावून आला व त्याने देवीशी युद्ध केले. ॥१६॥
आपल्या बाणांच्या वर्षावाने राक्षसवीर चण्डाने देवीवर बाणांचा एवढा मारा केला की, देवी कालिका त्या चक्राने सोडलेल्या बाणांनी झाकली गेली, कालिकेचे विस्फारित भयानक डोळेही त्या बाणांच्या भींतीने झाकले गेले. ॥१७॥
दैत्यांनी सोडलेली अनेक चक्रे गरगरत कालीच्या मुखापर्यंत पोहोचताच देवी ती चक्रे खाऊन टाकी, त्या वेळी कालिका एका वेळी अनेक सूर्य गिळीत असल्याचा भास होई. ॥१८॥
अत्यंत क्रोधयुक्त भीषण व भैरवनादापेक्षाही प्रचंड, कालिकेच्या किंकाळ्यांनी, गर्जनांनी ती अत्यंत भेसूर दिसे. भैरवाच्या गर्जनाही त्या पुढे फिक्या वाटत. विशाल मुखातील विक्राळ दातांनी व प्रचंड आवेशाने कालीबद्दल एक धाक वाटू लागे. ॥१९॥
आणि तेवढ्यातच देवी कालीने उठून क्षणार्धातच चण्ड राक्षसाला केस धरून ओढले व हातातील महाभयानक तलवारीने त्याचे मस्तक धडावेगळे केले. ॥२०॥
आपला बंधू चण्ड अशा प्रकारे मारला गेलेला पाहून मुण्डही तिथे देवीशी लढण्यास आला. त्याच्यावरही देवीने अत्यंत क्रोध व त्वेषाने हातातील महातलवारीने वार करून त्याला भुईवर लोळविले व त्याच वध केला. ॥२१॥
उरलेली दैत्यसेना मात्र चण्ड आणि मुण्ड राक्षसांचा हा संहार पाहून व कालीचे भयानक रूप व त्वेष पाहून भीतीने वेडी झाली व सैरावैरा पळू लागली. त्यातीलही काही आपल्याच सैन्याच्या टापाखाली चिरडले गेले तर काही पळता पळता थकून मेले. ॥२२॥
चण्ड मुण्ड राक्षसांची मुंडकी देवी कालीने धडापासून वेगळी करून हातांनी त्यांचे केस धरून देवी चंडिकेसमोर गेली व अत्यंत विकटपणे हासून तिला अर्पण केली व तिला म्हणाली- ॥ २३॥
कालिका म्हणाली, "हे देवी, हे महापशू चण्ड आणी मुण्ड मी मारून तुझ्यासाठी या युद्धात त्यांचे बळी देऊन तुला भेट म्हणून अर्पण करीत आहे. या दैत्यवीरांनी माझे केस धरून मला फरफटत नेऊन त्यांच्या राजाकडे घेऊन जाण्याची प्रतिज्ञा केली होती. आत हे देवी चंडिके, पुढील संग्रामात तू शुंभ- निशुंभाचा वध कर. ॥२४॥
ऋषी म्हणाले, "अशा प्रकारे चण्डमुण्डांची शिरे उपहार स्वरूप देणार्‍या कालीला देवी चंडिकेने आपल्या स्मित हास्याने शांत केले व अत्यंत मधुर स्वराने म्हणाली-
"हे सखि, तू महापराक्रमी आहेस. चण्ड मुण्ड या दोन महाबलाढ्य राक्षसवीरांना सहज मारून त्यांची मस्तके तू घेऊन आलीस व सृष्टीतील चराचरांना संकटमुक्त केलेस या अद्बितीय पराक्रमामुळे यापुढे सर्व भक्तगण तुला चामुण्डा या नावाने ओळखतील व तुझे भजन पूजन करतील. ॥२७॥
असा हा श्री मार्कंडेयपुराणातील सावर्णिक मन्वंतराकाळी घडलेल्या देवीमाहात्म्यातील चण्डमुण्डवध या नावाचा सातवा अध्याय आहे.

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP