|
पुअव . १ भूत , वर्तमान व भविष्य हे तीन काळ . २ सकाळ , दुपार व संध्याकाळ ह्या तीन दिवसांतील तीन वेळा . - क्रिवि . १ सकाळ , दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळी . २ भूत , वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळी . ( सामासांत ) त्रिकाल - पूजा - स्नान - नैवेद्य संध्या - भोक्ता - भोजी - स्नायी - रक्षक इ० [ सं . त्रि + काल ] ०दर्शी वि. योगादिबलाने भूत , भविष्य व वर्तमान जाणणारा , दाखविणारा ; सर्वज्ञ . [ सं . त्रि + काल दृश = पाहणे ] ०ज्ञ ज्ञाता वेत्ता वि . त्रिकालदर्शी पहा . [ सं . त्रि + काल + ज्ञा = जाणणे ] ०ज्ञान न. भूत , वर्तमान व भविष्य या तीन काळांचे ( यौगिकबलाने होणारे ) ज्ञान . त्रिकाळी क्रिवि . उशीरा ; माध्यान्ह होऊन गेल्यावर बर्याच वेळाने ; विशेषतः जेवणाच्या वेळी हा शब्द वापरतात . जसे - त्रिकाळी भोजन केल्यामुळे प्रकृति ढळली . त्रिकाळचा , त्रिकाळाने अशा विभक्तिप्रत्ययांत रुपांचाहि या अर्थी प्रयोग करितात . [ त्रि + काल ]
|