|
पु. एखादा खाद्यपदार्थ न खाण्याचा नियम ( पोळीचा , खिरीचा , भाताचा खण ); एखाद्या देवतेप्रीत्यर्थ धरलेला निर्बध . ( क्रि० धरणे ). ( सं . खंड ) पु. ( राजा .) खाण . ( सं . खनि ) म्ह० ( गो .) खण तशी माती नी आवैं तशी पुती . पु. मकरसंक्रांतीला स्त्रिया पांच सुगडांना कुंकु लावुन वाटतात त्यांस म्हणतात . ( सं . क्षण ) पु. १ खणाळ्यांतील एक चोळीपुरता तुकडा ; किंवा कापलेला भाग . हा दीड हात ( १८ तसृ २७ इंच ) लांबीचा असतो . जरीकाठी , बुट्टीदार , चौकटीदार इत्यादि खणाचे प्रकार आहेत . २ खोलीचा , जागेचा एक भाग , दोन खांबामधील अथवा दोन तुळ्यामधील अंतर . हें पांच ते सहा फुटापर्यंत असतें . ३ इमारतीचा एक भाग ; चष्मा ; सोपा ; ( कु .) खोली . ४ होडींतील दोन आडव्या फळ्यांतील जागा . या फळ्या बसण्यासाठीं असतात . ५ पेटींतील , कपाटांतील लिहिण्याच्या टेबलांतील एकभाग ; कप्पा . ' या कपाटाला चार खण आहेत . ' ६ स्थान ; भूमि .. जेथ निरंतरासि खण । ' - ऋ ४२ . ' देहादिकाहुनि परतें । खण नाहीं ज्याच्या चित्तांतें । ' - रास १ . ३८४ . ७ इमारतीचा घराचा मजला खणोखाण पहा . ८ ( नाविक ) माल ठेवण्याची जागा . ९ कोठार ; तळघर . ' मस्त हुडे दुर्गाचें खण । ' - ऐपो ९ . १० ( छापखाना ) खिळे ठेवण्याच्या चौकटींतील कप्पा . क्रि.वि. खणखण असा आवाज करून . ( ध्व .)
|