-
पु. १ झोपाळा , पाळणा इ० च्या दोर्या , कडया छतास टांगण्यासाठी केलेले विशिष्ट आकाराचे आंकडे प्रत्येकी . लावून रुपेरी हलके हिंदुळे बांधिले । - प्रला . २ दिवा इ० टांगण्याचा आंकडा . फणसे पिवळी हलक्यांना । आंत पिवळ्या मोरक्या आरसे पिवळे झरुक्याना । - प्रला ९३ . [ अर . हलका ] हलकी - स्त्री . झोंपाळा इ० टांगावयाची आंकडी , कडी . हलका पहा .
-
पु. एक वाद्य . याला हलका व धूम नांवाची दोन डफडी असतात . संबळ पहा . हलकी - स्त्री . एक वाद्य ; खंजिरी ; डफडी . हलका पहा .
-
वि. १ वजनांत कमी ; जड नसलेला . २ लहान ; न्यून ( प्रमाण , वजन , लांबी इ० मोजतांना ). ३ कमीप्रतीचा ; कडक नसलेला ( गुण , प्रभाव इ० त ). अंमलाच्या बाबतीत अफूपेक्षां भांग हलकी . ४ सौम्य ; मंद ; कमजोर ( थंडी , पाऊस इ० ). ५ जड नसलेले ; पचण्यास सोपे ( अन्न ) ६ शरीरास गुणकारी , ( अन्न ); पचण्यास सोपें ( पाणी ). ७ सहन करण्याजोगा ; फारसा मोठा नसलेला ; क्षुल्लक ( रोग , विकार , काम ). ८ कमी महत्त्वाचे ; किरकोळ ( काम , बाब ). ९ कमी दर्ज्याच्या , अधिकाराचा , वजनाचा ( माणूस ). १० कमी किंमतीची ( वस्तु ). ११ बेताची ; प्रमाणशीर ; कमी ( किंमत , अट ). १२ क्षुल्लक ; गौण ( विषय ). [ सं . लघु ; प्रा . हलुअ ; हिं हलका ; तुल० सं . क्षुल्लक ] कानाचा हलका - वाटेल त्यांचे ऐकून त्यावर विश्वास ठेवणारा . जिवाचा मनाचा हलका - संकुचित दृष्टीचा ; क्षुद्र ; हलकट . बुद्धीचा हलका - कमी बुद्धीचा ; मठठ डोक्याचा ; मूर्ख .
-
पु. ( बे . कर्ना . ) शेतांतील ढेकळें फोडण्याचें दांताळे ; एक औत . [ का . हलिके ; तुल० सं . हल ]
Site Search
Input language: