|
स्त्रीपु . सरकारी काम ; सरकारी चाकरी ( विशेषतः तहशीलची व अधिकाराची ). तालुक्याच्या वसुलाचें काम . हातीं घेतलेलें काम ; जोखीम ; महत्त्वाचें कार्य , गोष्ट . सोन्धेकरांचीही मामलीयत चुकवून बिदनूरकरांकडें जावें . - पया ६९ . महत्त्व ; वजन ; योग्यता ; गणना ; ( बिशाद , किंमत , पाड , कथा , लेख इ० शब्दांप्रमाणें योजितात . ) जाबसाल . [ अर . मुआमलत ; मुआमला ] मामलतदार , मामलेदार - पु . तालुक्यावर अंमल चालवून जमाबंदीचा वसूल घेणारा अधिकारी . [ फा . मआमिलतदार ] ०दारी स्त्री. मामलतदाराचे अधिकार , काम , हक्क इ ०मामला पु. मामलत . ( ल . ) काम ; कृत्य . मामला कठिण दिसतो . बाब ; बाजू . तव ते व्यापार बुडाले । मामले आंगीं सेकले । - स्वादि २ . २ . १८ . म्ह० धकाधकीचा मामला .
|