धुकधुकी

See also धुकधुक , धुकधुकणे
 स्त्री. एक अलंकार . हा वक्षस्थळावर घालतात . मुक्ताशेखर पोंहच्या धुकधुक्या हीरांगदे उज्वले । - सारुह ३ . ४२ . धुकधुकी वाहणे बाळलेणीची । - दावि १८ . [ हिं . ]
धुगधुग , धुगधुगणे , धुगधुगी पहा . भये या बंधूच्या हृदय परियीचे धुकधुकी । - सारुह ७ . ८६ . तया धुकधुकी वाटे सदां । - दावि २४३ . ऐसे सुधन्वा बोले निःशंक । तो माधवोदरी धुकधुक । - जै १९ १२४ .