धगधगीत

वि.  १ प्रज्वलित ; प्रदीप्त ; रसून , भडाडून पेटलेला ( विस्तव इ० ). धगधगीत निखार्‍यावर पाणी टाकले म्हणजे त्याचा सर्वस्वी कोळसा होतो . - भा १६३ . २ ( ताप इ० कानी ) फणफणणारे ; अतिशय कढत झालेले ( अंग ). ३ ( पुण्य , तप इ० कांच्या योगाने ) तेजस्वी ; प्रभावशाली ; तेजपुंज ; कडकडीत . धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष । - दा १९ . ४ . ९ . ४ जळफळणारा ; चरफडणारा . प्राणासी मुकला तृणावर्त । कंस परम चिंताक्रांत । धगधगीत मनामाजी । - ह ५ . १२९ . [ धगधगणे ]
  Glowing. Fig. Burning.